Shodh Swami Vivekanandcha (शोध स्वामी विवेकानंदांच
स्वामी विवेकानंदांचा शोध आजवर काही कमीजणांनी घेतला नाही. त्यात अनेक देशांमधले सर्व प्रकारचे लोक आहेत. आघाडीचे वैज्ञानिक म्हणून ज्यांनी आपली कारकीर्द गाजवली ते डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर हे आता या मांदियाळीत येऊन बसले आहेत. वैज्ञानिक दृष्टीची सोबत आणि असंख्य विषयांचे जागते कुतूहल असणारे दाभोळकर आज प्रस्थापित झालेल्या विवेकानंदांपेक्षा निराळ्या विवेकानंदांचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करतात. ''मी केवळ हिंदुस्थानचा नाही, तुम्हा काही मूर्ख हिंदूंचा तर मिळूच नाही.मी सार्या जगाचा आहे आणि दक्षिण ध्रुवापासून ते उत्तर ध्रुवापर्यंत प्रज्वलित होत जाणारी ज्वालाग्राही तरुणांची संघटना मला उभारायची आहे.'' आपल्या गुरुबंधूंना पत्रातून असे सांगणाऱ्या समाजवादी विवेकानंदांची खरी ओळख करून देणारे हे पुस्तक.