Antrang (अंतरंग)

By (author) Prabhakar Gharat Publisher Dimple

प्रभाकर घरतांचं 'अंतरंग' हे आत्मकथनही नाही वा केवेळ काळाची जंत्रीही नाही. ती एक संवेदनशील माणसाची अदभूत कांदबरी आहे त्यांच्या सहज अघोवत्या भाषेमुळे ते एक 'ललित लेखन' आहे असे वाटते असे आलेले अनुभव, घडलेल्या घटना, त्यातले योगायोग, त्यांना भेटलेली माणसं हे सर्व सत्यापेक्षा विलक्षण आहे ही कल्पित जीवन-गाथा भासतेऽनि मग वास्तवात ही कल्पितापेक्षाही विलक्षण असते याची जाणीव होते. त्यावेळेच्या जास्त खपाच्या, 'नवशक्ती' व 'मुंबई सकाळ' दैनिकातून अन्यायाविरुद्ध कुणाचीही पर्वा न करता ते सडेतोड टीका करत होते. पुढे ते राजकरणाकडे वळले. निवडणूक लढविली आणि जिंकलीही. पण सृजनशील कलांवत राजकारणातल्या ठराविक चौकटीत घुसमटतो. त्यांचा खरा पिंड समाजकार्याचा आजपर्यंत ते त्यातच कार्यरत आहेत. प्रभाकर घरत यांचा जीवन -प्रवाह एखाद्या चालत चित्रासारखा आहे त्यांनी लिहिलेला प्रसंग आपल्या डोळ्यासमोर घडत आहे असं वाटतं त्यांना भेटलेल्या अनेक ढंगांच्या, अनेक वृत्तीच्या व्यक्ती आपल्याला कुठंतरी भेटल्या आहेत असं जाणवतं. कल्पना करता येणार नाहीत असे विलक्षण योगायोग चित्रपटात वा कादंबरीतच आढळतात. म्हणून घरांतचं 'अंतरंग' ही अदभूत ही कांदबरीच आहे.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category