Yugant. (युगान्त)

By (author) Iravati Karve Publisher Deshmukh & Co.

मानवी प्रयत्न निष्फळ असतात, मानवी जीवन हे विफलाच असायचे, हां धडा मनावर बिंबवण्यासाठी तर महाभारत रचलेले नाही ना, असे सारा वेळ वाटते. मनावांचे प्रयत्न, आकांक्षा, वैर, मैत्री-सगळीच कशी उन्हाळ्याच्या वावटळीने उड़विलेल्या पाचोळयासारखी क्षुद्र, पोरकट भासतात; पण त्याच बरोबर ज्या व्यक्तींनी ते प्रयत्न केले, आकांक्षा बाळगल्या, त्या व्यक्ती अविस्मरणीय ठरतात, हृदयाला कायमचा चटका लावतात. प्रत्येक व्यक्ती एक विशिष्ट परिपाकाकडे अटळपणे जात असते. आपल्याला त्रयस्थ वाचक म्हणून तो परिपाक दिसत असतो. त्या व्यक्तीलाही तो जाणवला असला पाहिजे, हे महाभारत वाचताना इतक्या तीव्रतेने जाणवते की, त्या व्यक्तीची व्यथा आपली स्वत:ची व्यथा होते. त्या व्यक्तिच्या द्वारे संबध मानवतेचे दू:ख आपल्याला खुपत रहते.

Book Details

ADD TO BAG