Alamgir (आलमगीर)
'' तुम्ही, गिरफ्तारित टाकुन, आमचा छळ सुरु केला. तरीही आपला बाप - बेटे का रिश्ता तुटणार नाही. तुमच्या अम्मीजान या दुनियेतून जाताना, आमच्या हाती देऊन पालन करण्याची, जिम्मेदारी सोपवली. तेव्हा पासून परवरिश करून तुमचे खुप लाड- प्यार केले. परंतु तुम्ही सगळ विसरून गेलात. आपल्या सख्या भावना नष्ट करून, आम्हास या लाल किल्ल्यात बंदिस्त केलंत खरोखरच आम्ही नालायक, डरपोक आहोत. म्हणुनच कुजात पडलोय. तुमच्या सारख्या पुत्राचा वालिद झाल्याबद्दल, आम्हास फार फार शरम वाटते. तुम्ही करीत असलेल्या हा छळ म्हातारपणाचा आहे. तुम्हालाही आमच्यासारख्या बुढ़ापा प्राप्त होणार आहे. हे ध्यानी ठेवा.''