Ek Hoti Fulrani Bhakti Barve (एक होती फुलराणी भक्त

By (author) Rajnish Joshi Publisher Indus Source Books

भक्तीची अभिनय क्षमता विलक्षण होती. अभिनयाचे उपजत देणे तर तिला मोठेच होते,पण कठोर परिश्रम करण्याची तिची वृत्ती आणि ताकदही मोठीच होती. तिची प्रतिभा उज्ज्वल होती सर्वोत्तमाचा तिला ध्यास होता. आपला अभिनय सर्वोत्तम व्हायचा असेल तर प्राणपणाने त्यासाठी परिश्रम करायला हवेत, हे ओळखण्याची कुशाग्र बुद्धी तिला होती आणि या मिश्रण इतके बेमालूम एकजीव झाले पाहिजे की त्यांचे वेगवेगळे अस्तित्व मुळीच जाणवता कामा नये याची मुळीच जाणवता कामा नये याची सखोल जाणीव तिला होती . ती एक परिपूर्ण अभिनेत्री होती. तिच्या आयुष्यात सर्वप्रथम क्रमांक होता तो तिच्या कामाचा - अभिनयाचा! आयुष्यातल्या बाकी सा-या गरजा,चैनी कर्तव्ये, अगदी नातीगोतीसुद्धा त्याच्या खाली रांगेत उभ्या होत्या. ती एक रंगधर्मी होती. रंगभूमीविषयक कर्मकांडात गुंतून जाणारी केवळ रंगकर्मी नव्हती आणि रंगधर्मी असूनही ती 'स्टार' होती. नाटकात ती एकटी असली तरी ती नाटकाच्या यशाची ती खात्री असे, लेखक कोण, कंपनी कोणती, बाकीच्या नटसंचात कोण कोण,या कशाचीच काळजी करत नसत. मराठी रंगभूमीच्या इतिहासातील तो एकमेव स्त्रीस्टार!

Book Details

ADD TO BAG