The Fox (द फॉक्स)
"असे मानले जाते की शेक्सपीअरनंतर ज्याच्यावर सर्वात अधिक लिहिले गेले असेल तर तो जग विख्यात कादंबरीकार डी. एच. लॉरेन्स होय.लॉरेन्सच्या कादंबऱयांचे मोल जसे, जसे वाचक समीक्षकांच्या ध्यानी येऊ लागले तशी तशी त्यांची लोकप्रियता वाढत गेली. जीवनाचा आस्वाद, शोध-बोध घेत त्याचे 'जिवंत' रसरशीत प्रत्ययकारी चित्रण करताना त्याने आपली विशिष्ठ वैचरिक भूमिका व दृष्टिकोण मोठ्या निष्ठेने संभाळला. अत्यंत इंद्रियसंवेध वर्णनांमध्येही त्याची तत्वज्ञानाची बैठक जाणवत राहते.-हास पवनरया,मोडकलीस येऊन व्यक्ति व समाजविकस कुंठित करणार्या व्यवस्थेवर अप्रत्यक्ष भाष्य करताना तो मुक्त अविष्कारांची,मानसशात्रिय सिद्धान्तविचारांच्या प्रकाशात उजळणारी वाट व दिशा दाखवत राहिल. ख्रिश्चन प्युरिटॅनिझमच्या जोखडातून मोकळे होत मानवी प्रेमाविष्कराचे मोल व सौंदर्य ओळखणे व त्यांचा आस्वाद घेत राहणे तसेच त्यामागील 'अध्यात्म' विचार समजावून हे जीवनाचे मर्म त्याने तीन पिढ्यांच्या ध्यानात आणून दिले. सुविख्यात साहित्यीक व इंग्रजी वाङमयाचे गाढ़े अभ्यासक डॉ. चंद्रशेखर चिंगरे यांच्या प्रतिभावंत सव्यासाची लेखणीतून उतरलेला एक अप्रतिम अनुभव"