Gwahi Ani Vegli Nasaleli Gosht (ग्वाही आणि वेगळी न

By (author) Rajan Khan Publisher Majestic Prakashan

प्रत्येक बाईला स्वत:चं मन असतं. स्वत:च्या इच्छा असतात. स्वत:चे विचार असतात. बर्‍याचदा होतं असं की, स्वत:च्या मनानं, इच्छेनं, विचारानं जगू पाहणारी माणसं परिस्थितीच्या दुष्टचक्रात अडकतात. बाई पण माणूसच असते. तीही दुष्टचक्रात अडकू शकते. पण एकदा ती दुष्टचक्रात अडकली तर बाई म्हणून तिला त्यातून सुटणं मोठं मुश्किल होऊन बसतं. बाई म्हणून तिला दुष्टचक्राचे काही वेगळे भाग भोगावे लागतात. स्वत:च्या जगण्याचे चुकीचे अथवा बरोबर निर्णय घेऊन जगू पाहणा बायकांना अनुभवाव्या लागणार्‍या परिणामांची कथा-व्यथा व्यक्त करणार्‍या या दोन कादंबर्‍या – ‘ग्वाही’ आणि ‘वेगळी नसलेली गोष्ट’. बाई, तिचं कुटुंब आ‌णि समाजस्थिती यांच्या गुंफणीचं विविधांगी बारकाव्यांसह चित्रण या दोन्ही कादंबर्‍यांमध्ये आहे.

Book Details

ADD TO BAG