Yugmudra (युगमुद्रा)
आमचे कुटुंबीयांचे नाव आज घराघरांत पोचले आहे. बाबा आमटे यांनी अंगीकारलेले सेवाव्रत त्यांच्या पुढील पिढीनेही समर्थपणे चालविले आहे. कुष्टरोग्यांची सेवा करण्यासाठी बाबांनी 'महारोगी सेवा समिती'च्या माध्यमातून जे काम केले आहे, त्याने कुष्टरोग्यांना नवे जीवन दिले. समाजालाही नवा दृष्टीकोन दिला. बाबा आमटे यांच्या सामाजिक जीवनाचे अनेकांना अप्रूप होते. त्यातील काहींनी त्यांच्याबद्दलचे विचार विविध ठिकाणी व्यक्त केले आहेत. ते 'युगमुद्रा बाबा आमटे' : साधना, वारसा, प्रेरणा'मधून एकत्र दिले आहे. यात बाबांच्या सहचारिणी साधना आमटे, चिरंजीव विकास आमटे, प्रकाश आमटे, सुना भारती आमटे, मंदा आमटे, नातू दिगंत आमटे, कौस्तुभ आमटे, अनिकेत आमटे, नात डॉ.शीतल आमटे-करजगी; तसेच नातसुना, नातजावई या कुटुंबियांच्या मनातील बाबा व्यक्त होतात. तसेच बाबांचा आदर्श घेऊन सामाजिक कार्य करणारे गिरीश कुलकर्णी, साहित्यिक, कवी वि. वा. शिरवाडकर, बा. भ. बोरकर, गो. नी. दांडेकर, पु. लं. देशपांडे, विश्राम बेडेकर, राम शेवाळकर, यदुनाथ थत्ते, नेते मधू दंडवते, एस. एम. जोशी यांनी आमटे यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.