Valan (वळण)
वय वर्ष १० ते १४! धड ना लहान,धड ना मोठी अशी कुमार अवस्था. मनाचा अवखळपणा अजून संपला नसतो नि शैशवातील निरागसपणा टिकून असतो. आपल्याला सगळं काही कळतं याची खात्री असते नि खूप काही करण्याची जिद्द असते. अशा या कुमार वयातील लहान मोठी आंदोलनं मृणालिनी चितळे यांनी 'वळण' या बालकथासंग्रहात टिपली आहेत. त्यातील कथा वाचताना मुलं तर रंगून जातीलच शिवाय आयुष्यातील हे वळण ओलांडून ओलांडून गेलेले प्रौढही आपलं 'ते' वय आठवून कथांमध्ये रमून जातील.