-
Lay Off (ले ऑफ)
'घराबाहेर पडून आर्थिक शाश्वती मिळवणाऱ्या ह्या स्त्रियांनी जगण्याच्या 'जाण्या वाटा' जरी निवडल्या असल्या तरी त्यांची प्रश्न सुटले नाहीतच. त्यांना काही नवेच भेडसावत आहेत. त्यांना आणि त्या ज्या समाजाच्या अविभाज्य भाग आहेत त्यांनाही. ह्या संग्रहातील ८०% स्त्रिया ह्या इंजिनियर आहेत. हा एक निव्वळ योगायोगच! बाकीच्यांनाही व्यवसाय वेगळा असला तरी काही प्रश्न भेडसावत आहेतच. त्याचा हा कथा स्वरूपात आढावा. नव्या दिशेने निघालेल्या त्या सर्व स्त्रिया आहेत. त्यांच्या समस्याही वेगवेगळ्या आणि नव्याच आहेत.
-
Hasyagharatil Aarse (हास्यघरातील आरसे)
जो आपल्याला या जगात घेऊन येतो,त्याला फादर म्हणतात आणि जो चित्रपट विश्वात घेऊन जातो,त्याला गॉडफादर म्हणतात. गॉडफादरच मुल्य खरया जन्मदात्या बापापेक्षा किती तरी जास्त असतं. म्हणूनच लायक-नालायक,गायक-वादक,नायक-खलनायक अशी सर्व प्रकाची फिल्मी मुले आपल्या खरया फादरला झुमरी तलैय्यात रडत-आक्रोशत सोडून,मुंबई च तिकीट काढतात आणि एका गॉडफादरचा शोध घेऊ लागतात. फिल्मी दुनियेत एका शब्दाची खूप चालती आहे. 'स्ट्रगल'. त्याचा अर्थच असा आहे, कि एका गॉड फादर चा शोध. स्ट्रगल चा अंतिम बिंदू आणि गॉड फडरचा आरंभ बिंदू एकच असतो.
-
Katlatil Jhare (कातळातील झरे)
सार्वत्रिक धारणा...पुरुष म्हणजे पाषाण, पुरुष कातळकठोर पण... भगव्या कपड्यातील असो कि सामान्य-शृंगारातील आदिम प्रेरणा खेचतेच पुरुषाला स्त्रीकडे. 'ती' चा सहभाग अनिवार्य,पण वाद्जनक. त्यातूनच कातळकडे दुभांगतात...' चिरफळतात, सुप्त व्यथांचे झरे उसळतात...,विखुरतात, छिन्नविछिन्न होत तृशार्तावस्थेत आटतात. कातळातल्या शुष्क होत जाणारया झऱ्यांच्या अर्थात पुरुषांच्या अवघे आयुष्य उधळून लावणाऱ्या व्यथा.
-
Valan (वळण)
वय वर्ष १० ते १४! धड ना लहान,धड ना मोठी अशी कुमार अवस्था. मनाचा अवखळपणा अजून संपला नसतो नि शैशवातील निरागसपणा टिकून असतो. आपल्याला सगळं काही कळतं याची खात्री असते नि खूप काही करण्याची जिद्द असते. अशा या कुमार वयातील लहान मोठी आंदोलनं मृणालिनी चितळे यांनी 'वळण' या बालकथासंग्रहात टिपली आहेत. त्यातील कथा वाचताना मुलं तर रंगून जातीलच शिवाय आयुष्यातील हे वळण ओलांडून ओलांडून गेलेले प्रौढही आपलं 'ते' वय आठवून कथांमध्ये रमून जातील.