Octopussy (ऑक्टोपसी)

एम्‌ने थंडपणे टेबलापलीकडे दृष्टी टाकली. हे एक निष्ठुर काम असणार होतं आणि बॉंड डबल ओ सेक्शनमध्ये असल्यामुळे त्या कामासाठी त्याची निवड झाली होती. "या लपून गोळीबार करणार्‍या सैनिकाला तू ठार केलंच पाहिजे, आणि तेही त्याने एजंट २७२ ला टिपण्याआधी. नीट समजलास नं ?" म्हणजे, हा चक्क खून होत तर... जेम्स बॉंड, ब्रिटिश गुप्तहेर ००७, याला आंतरराष्ट्रीय हेरगिरी करताना अशीच निर्दय कामे करावी लागत. कॅरिबियनला स्वत:बरोबर भयंकर रहस्य नेणार्‍या द्वाड मेजरला शोधणे असो, सोदेबीच्या लिलावाच्या दालनात फॅबर्जेच्या अंडाकृतीला गुप्तपणे बोली बोलणारा रशियन गुप्तहेर ओळखून काढणे असो, किंवा पूर्व व पश्चिम बर्लिनमधील गल्लीत लपून गोळीबार करणार्‍या सैनिकाने अत्यंत निर्घृणपणे एका असंभाव्य मारेकर्‍यावर गोळ्या झाडणं असो, बॉंड नेहमीच आपली भूमिका योग्य प्रकारे बजावतो. ००७ च्या गुप्त रिपोर्टबद्दल पूर्ण माहिती असलेल्या अधिकार्‍याप्रमाणे इयान फ्लेमिंग, एकमेकांविरुद्ध करण्यात येणार्‍या गुप्त हेरगिरीच्या क्लिष्ट प्रकरणांचा छडा लावतो !

Book Details

ADD TO BAG