Tiger (टायगर)
चंद्रकांतने टायगरचे रहस्य पाहिले होते आणि चंद्रकांतने ते उघड करण्याची धमकी दिली असावी, त्यामुळे त्याला आपल्या जीव गमवावा लागला. ज्या रात्री चंद्रकातची हत्या झाली त्या दिवसानंतर निग्रो फरार झाला होता. वास्तविक तो योगायोगान टायगरच्या फाशीच्या घरात गेला होता आणि त्याने चंद्रकांतचे डोके कापल्याचे पाहिले होते. त्यामुळे टायगरने त्याचा हातात बेड्या घातल्या होत्या. त्या तोडून तो त्या बुरुजावर गेला. तिथे शूटिंग घेतली गेली होती. जेव्हा मी रावसाहेबाना हि हकीकत सांगितली तेव्हा ती आचार्यचकित झाले होते. ते आचार्य कृत्रिम नव्हते हे मी ओळखले होते आणि माझ्या मनाने निर्णय घेतला कि रावसाहेब टायगर नाहीत. नंतर त्या रात्री नबाबसाहेब मला त्याचा पूर्वजाना दाखविण्यासाठी घेवून गेले त्या दिवशी मी त्याचे आजोबा,पणजोबा,खापरपणजोबा याची चित्रे लक्षपूर्वक पाहिली. नबाबसाहेब आदराने पाहत असत. त्यामुळे माझा ध्यानात आले कि टायगर कोण आहे.......