Mi Kon (मी कोण)
तांबे व पितळाची भांडी स्वच्छ करणे हे पूर्वी किचकट व वेळखाऊ काम वाटत असे. अशी भांडी चटकन स्वच्छ करण्यासाठी एखादी पावडर निर्माण करण्याचा ध्यास रवींद्र प्रभूदेसाई यांनी घेतला आणि पीतांबरी शायनिंग पावडरचे उत्पादन सुरु झाले. आज पीतांबरी प्रॉडक्ट्सची ५० हून अधिक उत्पादने देशविदेशात पोचली आहेत. कंपनीच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीचा आढावा व पीतांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभूदेसाई यांनी कथन केला आहे. शाळेतील आठवणी, अभ्यासातील प्रगती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार याच्या आठवणी सांगून प्रभूदेसाई यांनी व्यवसायाचा श्रीगणेशा कसा केला, हे सांगितले आहे. भागीदारीतून धडा घेत त्यांनी 'पीतांबरी'चा स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. गुणवत्ता सिद्ध झाल्यावर व्यवसायाच्या आर्थिक गणिताकडे त्यांनी लक्ष दिले. पुढे व्यवसायात वाढत असताना अनेक अडचणी उभ्या राहत होत्या. मात्र, अशा सर्व सत्वपरीक्षेत उत्तीर्ण होऊन 'पीतांबरी'ने होम केअर व हेल्थ केअर. अॅग्रीकेअर आणि फूड क्षेत्रातही भरारी घेतली. "पीतांबरी'ची ही सर्व वाटचाल शब्दबद्ध केली आहे.