Fidel Castro (फिडेल कॅस्ट्रो)
शेतमजुराचा मुलगा असलेल्या कॅस्ट्रो ते क्युबाचा राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो हा प्रवास अत्यंत रोमांचकारी असाच म्हटला पाहिजे. कॅस्ट्रोच्या या झंझावाती आयुष्याचा वेध कहाते यांनी अत्यंत संयतपणे घेतला आहे. कॅस्ट्रो यांच्यासारख्या वादळी व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्याचा पट मांडणं हे खरं तर खूप कठीण काम. कॅस्ट्रो यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे, त्याने विद्यार्थिदशेत केलेला संघर्ष, त्यानंतर राजकारणात त्यांनी स्वत:चं निर्माण केलेलं स्थान, हे करत असताना अमेरिकेविरोधात त्यांनी दिलेला लढा, त्यांना ठार मारण्यासाठी त्यांच्यावर झालेले भीषण हल्ले या सगळ्याची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. कॅस्ट्रो यांची ही जीवनकथा ओघवत्या भाषाशैलीमुळे वाचनीय झाली आहे.