Swargangechya Tiri
हे आत्मचरित्र नाही. स्वतःचं चरित्र लिहिण्याइतकी पात्रता मी मिळवली आहे, असं प्रामाणिकपणे मला वाटत नाही. माझं जीवन सात स्वरांच्या आरोह-अवरोहांत व त्यांच्या आंदोलनांत सामावलं आहे. सुमारे 40 वर्षं स्वरगंगेच्या विशाल पात्रात व किनार्यावर मी मनसोक्त विहार केला. या काळात रसिकांचं जीवन आनंदनिर्मितीच्या द्वारे सुखमय करण्याचं सेवाव्रत मी कटाक्षानं पाळलं. त्यामुळेच स्वरगंगेत व तिच्या तीरी इतके प्रतिभासंपन्न व अलौकिक गुणिगंधर्व मला भेटले. त्यांची माझी ओळख झाली व जवळीक झाली. या सर्व सुखद स्मृतींची नोंद या पानांतून रसिकांना आढळेल.