Brahmakanya (ब्रह्मकन्या)

झोया फन हे निसर्गाचे लेकरू. पूर्व बर्मातल्या जंगलांमध्ये वसलेल्या करेन गावांमध्ये तिचे बालपण व्यतीत झाले. तिच्या आईला सैनिकी पार्श्वभूमी लाभलेली तर बाबा करेन प्रतिकार चळवळीतील नेते. पण झोया आणि तिच्या भावा-बहिणींना बर्मी जुंत्याने त्यांच्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची जराही कल्पना नाही. मे यु क्लो नदीच्या काठावर वसलेल्या पेर हे लू गावात त्यांचे निरागस, अवखळ बालपण पुâलांच्या बागेत खेळण्यात, पुâलपाखरांमागे धावण्यात, आंब्याच्या झाडांवर चढण्यात, आंबे फस्त करण्यात झरझर सरते आहे. पण एके दिवशी त्यांच्या या सुंदर स्वप्नांना कोणाची तरी दृष्ट लागावी तसे होते.वयाच्या चौदाव्या वर्षी झोयाचे बालपण अचानकच संपून जाते. तिच्या गावावर बर्मी सैनिक हल्ला करतात आणि जीव वाचवण्यासाठी झोयाला आणि तिच्या कुटुंबीयांना पळ काढावा लागतो. आगीच्या ज्वाळांनी वेढलेले आपले घर डोळ्यांत साठवून त्याकडे पाठ फिरवल्यानंतर त्यांच्या भाळी लिहिलेली असते ती जंगलांमधून अर्धपोटी केलेली वणवण आणि सदैव पाठलागावर असणाNया बर्मी सैन्याची भीती. घरादाराला पारखे झालेल्या हजारो करेन लोकांसारखेच हे कुटुंबदेखील जंगलाचा आसरा घेत लपतछपत थायलंडमधील एका सैनिकी छावणीत आसरा घेते. पुढच्याच वर्षी प्रâी बर्मा मोर्चाच्या गर्दीतून तिलाच निवडून बोलण्याकरिता उभे केले जाते, त्यानिमित्ताने ती तिच्या आयुष्यातील पहिलीवहिली मुलाखत थेट बीबीसीवर देते आणि बघताबघता ती बर्माच्या स्वातंत्र्यलढ्याचा आंतरराष्ट्रीय आवाज बनते. त्यानिमित्ताने झोया अनेक मुरब्बी राजकारण्यांच्या भेटीगाठी घेते, अभिनेत्यांना सोबतीला घेऊन, व्यासपीठावरून मदतीचे आवाहन करते. पण तिच्या प्रत्येक हालचालीवर बर्मी जुंत्याचे लक्ष आहे. तिच्या प्रयत्नांनी तिला प्रसिद्ध तर केले आहेच पण तिच्या जिवाला आता कायम धोका असणार आहे. झोयाला तिच्या मायदेशी परतायला मिळाले का? मिळेल का?

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category