Ase Ghadwa Tumche Bhavishya (असे घडवा तुमचे भविष्य
‘माझ्या आयुष्यात येणार्या इतक्या सार्या अडचणींसमोर हार न मानता मी जर इतकं काही करू शकलो तर कोणीही हे करू शकतं, हाच संदेश मी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या देशातील युवकांना देऊ इच्छितो. या पुस्तकातून प्रेरणा घेऊन एका जरी युवकाने स्वतःचं स्वप्न साध्य केलं तर माझा लिहिण्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला असं मी समजेन. हे पुस्तक देशभरातील युवकांनी मेल्सद्वारे विचारलेल्या प्रश्नांवर आधारित आहे आणि त्यांना दिलेली उत्तरं ही माझ्या जीवनातील अनुभवातून मी जे काही शिकलो त्याचे सार आहे. ही उत्तरं अशा प्रकारे समोर मांडली आहेत, की जे वाचक अशाप्रकारच्या समस्यांना तोंड देत आहेत त्यांनासुद्धा या उत्तरांमध्ये दडलेले संदेश उपयोगी पडतील.’’