-
Adbhut Pan Satya (अद्भुत पण सत्य)
पन्नास कथा... पण त्या फक्त पन्नास माणसांच्या नाहीत ! या पुस्तकातील प्रत्येक कथा आपल्याला माणसाच्या वेगवेगळ्या पैलूंची भेट घडवेल. काही कथा अस्वस्थ करतील, काही आश्चर्यचकित करतील, काही प्रेरणा देतील तर काही तुम्हाला स्वतःच्या आयुष्याकडे नव्या नजरेनं पाहायला भाग पाडतील. या कथांमध्ये आहे चुका आणि त्यातून मिळणारे धडे मानवी भीती आणि असुरक्षितता आशा आणि नव्याने उभं राहण्याची ताकद वेदना आणि संघर्ष परिस्थितीशी झगडण्याची मानवी जिद्द कारण मानसशास्त्र समजून घेण्याचा सर्वांत सुंदर मार्ग म्हणजे माणसांना समजून घेणं आणि माणसांना समजून घेण्यासाठी त्यांच्या कथा ऐकणं. मानवी मनापेक्षा मोठं रहस्य अजूनही जगात नाही आणि हे पुस्तक माणसांच्या मनात डोकावण्याचं एक छोटंसं दार आहे. वरिष्ठ समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, मेंटल हेल्थ एज्युकेटर, संशोधक, लेखिका आणि प्रशिक्षक म्हणून सायली कुलकर्णी गेली अठरा वर्षांहून अधिक काळ मानसशास्त्र, शिक्षण आणि मानसिक स्वास्थ्य या क्षेत्रात कार्यरत आहेत. समुपदेशन, अध्यापन, संशोधन, लेखन आणि प्रशिक्षण या माध्यमांतून त्यांनी हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींना मार्गदर्शन केले आहे.
-
Chanakya Buddhisutra Anivikshiki (चाणक्य बुद्धिसूत्र आन्वीक्षिकी)
आचार्य चाणक्य म्हणजे दूरदृष्टी, तर्कशक्ती, रणनीती आणि अचूक निर्णयक्षमतेचे मूर्तिमंत प्रतीक. चाणक्य बुद्धिसूत्र : आन्वीक्षिकी हे पुस्तक त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देते. त्याबरोबर चाणक्यांची 'आन्वीक्षिकी' म्हणजेच बुद्धिसूत्रे आधुनिक जीवनातही उपयोगी पडतात. नेतृत्व, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, कूटनीती, गुरुतत्त्व आणि यशस्वी जीवनासाठी आवश्यक असलेली बुद्धिसूत्रे या पुस्तकातून सहज, सोप्या आणि प्रेरणादायी शैलीत उलगडली आहेत. विचार अधिक स्पष्ट, निर्णय अधिक प्रभावी आणि जीवन अधिक यशस्वी बनवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अमूल्य मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकात... चाणक्यांचे प्रेरणादायी जीवन आणि राष्ट्रनिर्मितीचा इतिहास 'आन्वीक्षिकी' या विचारशास्त्राचे रहस्य आणि आधुनिक उपयोग अर्थशास्त्र व चाणक्यनीतीतील कालातीत बुद्धिसूत्रे नेतृत्व, रणनीती, व्यवस्थापन आणि निर्णयक्षमतेचे प्रभावी धडे गुरु-शिष्य परंपरेतील जीवनमूल्ये आणि संस्कार वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक यशासाठी उपयुक्त मार्गदर्शन
-
Maratheshahiche Sarsenapati Khand 5 (मराठेशाहीचे सरसेनापती खंड 5)
सरसेनापती खंड ५ या पुस्तकात मोरे घराणे व दाभाडे घराण्याच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना मांडण्यात आल्या आहेत. सरसेनापती मानाजी मोरे यांचे स्वराज्यातील योगदान शिवरायांपासून शाहू महाराजांपर्यंत मांडण्यात आले आहे. तर दाभाडे घराण्यातील बजाजी, येसजी, खंडेराव, त्रिंबकराव, उमाबाई, यशवंतराव, बाबूराव, दुसरे त्रिंबकराव अशा पाच पिढ्यांचे कार्य सदर पुस्तकात मांडले आहे. खंडेरावांची गुजरात व दिल्लीपर्यंत घोडदौड, डभईचे युद्ध, महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचा पराक्रम, पुढे पेशवे, दाभाडे व गायकवाड घराण्याचे संबंध या सर्व गोष्टींचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न सदर पुस्तकात केला आहे.
-
Maratheshahiche Sarsenapati | Khand 3 (मराठेशाहीचे सरसेनापती खंड 3)
शिवरायांची युद्धनीती व शंभू महाराजांचे धाडस, या गुणांचा सुंदर मिलाफ म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे होय ! काश्मीरपासून जिंजीपर्यंत पसरलेल्या मुघल बादशाह औरंगजेबाच्या सत्तेला पायबंद घालण्याचे अनोखे कार्य संताजी घोरपडे यांनी केले. बादशाहच्या छावणीवर धाडसी हल्ला करून, निराश झालेल्या मराठ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे मोलाचे कार्य संताजींनी केले. मुघलांच्या जवळजवळ एक डझनपेक्षा जास्त सरदारांना आपल्या तलवारीचे पाणी पाजणारे संताजी घोरपडे एक अद्वितीय सेनापती म्हणून मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाले. अशा या तेजस्वी व महापराक्रमी सरसेनापतींच्या पराक्रमाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न सरसेनापती खंड ३ या पुस्तकात केला आहे.
-
Maratheshahiche Sarsenapati Khand 4 (मराठेशाहीचे सरसेनापती खंड 4)
छत्रपती शिवाजी महाराजांपासून थेट शाहू महाराजांपर्यंत स्वराज्याची अखंड सेवा करणारे धनाजीराव जाधव यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात मोठ्या आदराने घेतले जाते. संताजींबरोबर धनाजीरावांनी मुघलांना अनेकवेळा सळो की पळो करून सोडले. संताजी घोरपडेंच्या हत्येनंतर इ.स. १७९७ पासून सलग दहा वर्षं मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचे नेतृत्व सेनापती धनाजीरावांनी केले. रतनपूरची लढाई म्हणजे धनाजीरावांच्या गनिमी काव्याचा अद्वितीय नमुना होय. धनाजीरावांच्या एकूण कार्याचा धांडोळा या पुस्तकात घेण्यात आला आहे
-
Maratheshahiche Sarsenapati Khand 1 (मराठेशाहीचे सरसेनापती खंड 1)
हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत 'सरसेनापती' पद खूप महत्त्वाचे होते. स्वराज्याच्या पायाभरणीत पहिले सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांचे महत्त्वाचे योगदान होते. तर स्वराज्यावर चारही बाजूंनी संकटे आलेली असताना त्यांच्याशी दोन हात करणाऱ्या सरसेनापती नेतोजी पालकरांनी आपल्या अजोड शौर्याची चुणूक दाखवली. नेतोजी पालकर स्वराज्याचे दुसरे सरसेनापती होते. यांच्या काळात स्वराज्याचा चांगला विस्तार झाला. थेट मिर्झाराजे जयसिंगाच्या छावणीत जाऊन धाडसी हल्ला करणारे प्रतापराव गुजर हे स्वराज्याचे तिसरे सरसेनापती होत. साल्हेर येथील खुल्या मैदानात त्यांनी गाजवलेले शौर्य, बहलोलखानाचा केलेला पराभव अशा अनेक मोहिमांमध्ये त्यांना निर्भेळ यश मिळाले. प्रतापराव जेवढे शूर, तेवढेच दिलदार व जेवढे जिगरबाज तेवढेच भावनाशील होते. शत्रूच्या सैन्याचा थरकाप उडवणाऱ्या शिवरायांच्या पहिल्या तीन सरसेनापतींचा थोडक्यात लेखाजोखा सरसेनापती खंड १ मध्ये मांडण्यात आला आहे
-
Maratheshahiche Sarsenapati Khand 2 (मराठेशाहीचे सरसेनापती खंड 2)
हिंदवी स्वराज्याचे चौथे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे एक खंबीर व्यक्तिमत्त्व होते. शिवराज्याभिषेकापासून जालना मोहिमेपर्यंत हंबीररावांची कामगिरी खूप महत्त्वाची होती. शिवरायांच्या मृत्यूनंतर छत्रपती शंभू महाराजांना साथ देऊन मुघलांचा थरकाप उडवणाऱ्या हंबीररावांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाले. हंबीरराव मोहितेंच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे पाचवे सरसेनापती होण्याचा मान म्हाळोजी घोरपडे यांना मिळाला. म्हाळोजी घोरपडे यांच्या काळात स्वराज्यावर चारही बाजूंनी संकटे आली. त्या संकटांना त्यांनी यशस्वीपणे तोंड दिले. शेख निजामाने छत्रपती शंभू महाराजांना चारही बाजूंनी घेरले असताना आपल्या छत्रपतींना वाचवण्यासाठी सरसेनापती म्हाळोजी घोरपडे धारातीर्थी पडले. हिंदवी स्वराज्य व छत्रपती यांना वाचवण्यासाठी छातीचा कोट करून धारातीर्थी पडलेले वीर म्हणजे सरसेनापती म्हाळोजी घोरपडे होत. सरसेनापती खंड २ मध्ये हंबीरराव मोहिते व म्हाळोजी घोरपडे यांच्या शौर्याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
-
Je Hava Te Milava (जे हवं ते मिळवा)
आपल्यापैकी अनेक जण, आनंद, प्रेम, उत्तम आरोग्य, आर्थिक स्वातंत्र्य, सुरक्षितता... अशी असंख्य स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालतात. पण, खरंच हे सगळं आपण मिळवू शकतो का ? नोव्हेंबरच्या थंडीतील एका सकाळी गौर गोपाल दास जैसलमेरमध्ये आपला मित्र राकेश अरोरा यांच्या मुलाच्या तीन दिवस चालणाऱ्या लग्नसमारंभासाठी पोहोचतात. एक अनपेक्षित पाहुणा येतो आणि दोन कुटुंबांमध्ये फूट पाडण्याची शक्यता असलेले वादळ निर्माण होत असल्याचे गौर गोपाल दास यांच्या लक्षात येते. गौर गोपाल दास चर्चेद्वारे यजमानांना आणि पाहुण्यांना शांत करतात. तसेच त्यांच्या आतमध्ये दडून बसलेल्या भीती आणि इच्छांनाही उलगडून दाखवतात. एवढंच नाही तर, स्वतःच्या जीवनामधील चढउतारांच्या माध्यमातून केलेल्या प्रवासाद्वारे ते लोकांना योग्य आणि समजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शनही करतात. 'जे हवं ते मिळवा' हे गौर गोपाल दास यांचं वैयक्तिक आणि गहन कथन आहे. महत्त्वाकांक्षा आणि समाधान, तसेच खरं असणं आणि केवळ भासवणं यांमध्ये अडकलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक नवा दृष्टिकोन देणारं आहे. त्यांच्या खास विनोदबुद्धी, सहानुभूती आणि प्रभावी ज्ञानाने समृद्ध असलेलं हे पुस्तक 'आपला दृष्टिकोनच आपलं जीवन घडवतो' हे सांगतं. तसेच स्वतःच्या मर्यादा ओळखून त्यांच्यावर मात कशी करावी आणि जीवनप्रवासात स्वतःबद्दल करुणा कशी विकसित करावी, याचंही मार्गदर्शन करतं.
-
Lightning Kid (लाइटनिंग किड)
ही विशीची जीवनकथा आहे तेजस्वी कल्पना वेगवान चाली अढळ चिकाटी भारताचे पहिले बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि पाच वेळा विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकणारे विश्वनाथन आनंद यांनी आपल्या तेजस्वी बुद्धिमत्तेने आणि निर्भय खेळाने जगाला थक्क केलंय. चेन्नईमध्ये लहानपणी बुद्धिबळातील बालप्रतिभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशीला, अतिशय वेगाने चाल खेळत असल्यामुळे 'लाइटनिंग किड' म्हणून एक नवीन ओळख मिळाली. तिथपासून ते जगातील सर्वात कठीण प्रतिस्पध्र्थ्यांना सामोरं जात जागतिक दिग्गज बनण्यापर्यंतचा, विशीचा प्रवास थरारक वळणांनी, कुशल डावपेचांनी आणि श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यांनी भरलेला आहे. हे पुस्तक आनंद यांच्या आयुष्यातील आणि कारकिर्दीतील सर्वात नाट्यमय क्षणांमध्ये डोकावतं. तसेच त्यांचा विजय, पराभव, पुनरागमन आणि अद्वितीय चाली यांचा वेध घेतं. बुद्धिबळाच्या पटावरील प्रत्येक घरासाठी एक अशा ६४ छोट्या पण अर्थपूर्ण धड्यांमुळे हे पुस्तक अधिक खास बनतं. दबावाच्या प्रसंगी शांत कसं राहायचं, पराभवानंतर पुन्हा उभं कसं राहायचं किंवा काही चालीच्या पुढील परिस्थितींचा विचार कसा करायचा, हे शिकवणारं हे एका खऱ्या विजेत्याचं कथन आहे. मोठा विचार करण्यासाठी, नम्र राहण्यासाठी आणि तुमचा सर्वोत्तम खेळ खेळण्यासाठी ही एक प्रेरणादायी मार्गदर्शिका आहे.
-
Eat That Frog Vidyarthyansathi (इट दॅट फ्रॉग विद्यार्थ्यांसाठी)
आपल्या 'टू-डू लिस्ट' मधली सगळीच कामं पूर्ण करण्याठी वेळ कधीच पुरेसा नसतो, आणि तो कधीच असणारही नाही. यशस्वी लोक सगळ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते सर्वात महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करतात आणि ती कामं पूर्ण कशी होतील हे पाहतात. ते आधी "फ्रॉग खातात". एक जुनी म्हण आहे, जर आपण सकाळी सर्वात आधी जिवंत फ्रॉग खाल्ला, तर दिवसभराच्या सर्वात वाईट कामातून आपण मोकळे झालात, ही समाधानाची भावना आपल्याला मिळते. "फ्रॉग" म्हणजे तुमचं सर्वात आव्हानात्मक काम, पण हेच काम तुमच्या आयुष्यावर सर्वाधिक सकारात्मक परिणाम करणारं असतं. या पुस्तकात, दिवसाचे वेळापत्रक कसे आखायचे? प्राधान्यक्रम कसा ठरवावा ? कामे प्रभावी व कार्यक्षम पद्धतीने कशी पूर्ण करावीत? अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करून घ्यायचा? लक्ष विचलित करणाऱ्या डिजिटल अडथळ्यांच्या काळात आपली एकाग्रता कशी टिकवून ठेवावी? निर्णयक्षमता, शिस्त आणि दृढनिश्चय अंगी कसा बाणवावा? हे आयुष्य बदलणारे पुस्तक तुम्हाला आजपासूनच तुमची महत्त्वाची कामं पूर्ण करण्यात मदत करेल ! लेखकाबद्दल ब्रायन ट्रेसी हे Brian Tracy International चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. प्रेरणादायक वक्ते आणि सेमिनार लीडर म्हणून ते दरवर्षी 2,50,000 हून अधिक लोकांना संबोधित करतात. ते 80 पेक्षा अधिक पुस्तकांचे बेस्टसेलिंग लेखक आहेत, जी अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. त्यांनी 1,000 हून अधिक कंपन्यांसाठी सल्लागार व प्रशिक्षक म्हणून काम केलं असून, 70 पेक्षा जास्त देशांतील 10,000 पेक्षा अधिक उद्योगांसाठी मार्गदर्शन करत आहेत.
-
Crypto Currency (क्रिप्टो करन्सी)
आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिप्टोकरन्सीचा वापर वाढत चालला आहे. क्रिप्टोकरन्सीने भारतामध्येही भक्कमपणे पाय रोवायला सुरुवात केली आहे. म्हणूनच क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय आणि ती कशी काम करते हे समजून घेणं ही काळाची गरज आहे. या विषयावर सखोल आणि सर्वांगीण माहिती देणारे पुस्तक... या पुस्तकात * क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? * क्रिप्टोकरन्सीचे प्रकार * क्रिप्टोकरन्सी कशी काम करते? * ब्लॉकचेन म्हणजे काय आणि त्याचे सर्व आयाम * क्रिप्टोकरन्सीची उत्पत्ती, उत्क्रांती आणि भविष्यात होणारा उत्कर्ष. * क्रिप्टोकरन्सीचे अर्थशास्त्र आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढतं महत्त्व * आर्थिक प्रगतीच्या उपलब्ध झालेल्या नवनवीन संधी * क्रिप्टोकरन्सीच्या अवैध वापराच्या शक्यता आणि त्यावर उपाययोजना * क्रिप्टोकरन्सीमध्ये सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूकीचे मार्ग
-
15 Minute Method (15 मिनिट मेथड)
आधुनिक आयुष्यामुळे आपल्याला सतत गोंधळलेलं आणि दबावाखाली असल्यासारखं वाटतं. स्वप्नं आणि उद्दिष्टांच्या दिशेने पुढे कसं जायचं आणि त्याचवेळी रोजची कामं कशी सांभाळायची, हेच समजेनासं होतं. कारण यादीत कितीतरी गोष्टी बाकी असतात आणि कामांची यादी सतत वाढतच जात असते. यावर उपाय म्हणून सॅम बेनेट एक अत्यंत सोपी पण प्रभावी कल्पना मांडतात : फक्त १५ मिनिटांची छोटी कृतीदेखील तुमच्या आनंदात, समाधानात आणि अखेरीस संपूर्ण आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. या पुस्तकात परफेक्शनिझम, स्वतःवर शंका घेणं, इम्पोस्टर सिंड्रोम आणि स्वतःलाच मागे खेचणाऱ्या सवयींपासून मुक्त कसं व्हायचं आरोग्य किंवा इतर समस्यांमुळे आयुष्य विस्कळीत वाटत असताना स्वतःला कसं सांभाळायचं अवघड आणि मोठी वाटणारी कामं छोट्या, सहज हाताळता येतील अशा टप्प्यांत कशी विभागायची गरजेच्या वेळी ठामपणे आणि नम्रपणे "नाही" कसं म्हणायचं दिवसातील फक्त पंधरा मिनिटं स्वतःसाठी काढून संतुलित आयुष्यासाठी नवीन सवयी कशा तयार करायच्या सॅम बेनेट या लेखिका, वक्त्या आणि सर्जनशीलता-उत्पादकता विषयातील तज्ज्ञ आहेत. व्यावसायिक अभिनेत्री आणि इम्प्रोव्हायझर म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कामात विनोदबुद्धी, उत्साह आणि हजरजबाबीपणा यांची खास छाप निर्माण केली. सहज, व्यवहार्य आणि प्रेरणादायी शिकवणीमुळे त्या आज लिंक्डइन लर्निंगवरील जागतिक स्तरावरील लोकप्रिय प्रशिक्षकांपैकी एक असून, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
-
Brave New Words (ब्रेव्ह न्यू वर्ड्स)
आपल्याला आवडो वा न आवडो, शिक्षण क्षेत्रात एआयची क्रांती दार ठोठावत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि GPT तंत्रज्ञानामुळे शिकण्याची प्रक्रिया बदलणार आहे. ती कशी, हे या पुस्तकात खान अॅकॅडमीचे संस्थापक सलमान खान सांगतात. एआयच्या या रोमांचक नव्या जगात पुढे जाण्यासाठी हे पुस्तक शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. शिक्षण क्षेत्रातील अग्रणी या नात्याने लेखक सलमान खान या अत्याधुनिक साधनांतील सूक्ष्म गोष्टी समजावून सांगतात. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात शिकण्याची व शिकवण्याची पद्धत कायमची कशी बदलणार आहे, हेही सांगतात. या ChatGPT क्रांतीकडे भीतीने पाहण्याऐवजी, पालक आणि शिक्षकांनी एआयला स्वीकारावे आणि त्याच्याशी जुळवून घ्यावे असे ते सुचवतात. खान सर यावर भर देतात की, शिक्षणात एआयचा वापर मानवी संवाद संपवण्यासाठी नव्हे, तर तो अधिक समृद्ध करण्यासाठी आहे. यामुळे पुढील गोष्टी घडतीलः प्रत्येक विद्यार्थी आपल्या सध्याच्या कामाला पूर्णपणे नवीन आणि सर्जनशील पद्धतींनी पूर्ण करू शकेल. शिकण्याची प्रक्रिया अधिक वैयक्तिक (Personalized) करता येईल. विद्यार्थ्यांचं मूल्यांकन अधिक अचूकपणे करता येईल. झपाट्याने डिजिटल होत असलेल्या भविष्याकरिता विद्यार्थ्यांना तयार करता येईल.
-
How To Control the Uncontrollable (हाऊ टू कंट्रोल अनकन्ट्रोलेबल)
“आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींना आपण जितकं जास्त महत्त्व देतो, तितकं आपलं नियंत्रण कमी होतं.” – एपिक्टेटस आयुष्यात कठीण प्रसंग येणार, हेच माणूस असण्याचं वास्तव आहे. पण त्यांना अधिक मजबूतपणे सामोरं जाण्याचा काही मार्ग असेल तर? तो मार्ग आहे, स्टोईक तत्त्वज्ञान ही प्राचीन ग्रीक विचारसरणी आजही तितकीच उपयुक्त आहे, जितकी ती दोन हजार वर्षांपूर्वी होती. याचा मूलभूत उद्देश एकच आहे तो म्हणजे, आपल्याला अधिक चांगलं आयुष्य जगायला मदत करणं. स्टोईक तत्त्वज्ञानाचं सूत्रमंत्र सांगतो: “आपण बाह्य घटनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण त्यांना कसा प्रतिसाद द्यायचा हे मात्र आपण ठरवू शकतो.” व्यावहारिक तत्त्वज्ञ आणि सल्लागार व्यक्तिमत्त्व बेन ऑल्ड्रिज स्टोईक विचारांतील १० महत्त्वाच्या तत्त्वांद्वारे तुम्हाला अधिक लवचिक, संतुलित आणि समृद्ध जीवन कसं घडवायचं हे शिकवतील. हे पुस्तक केवळ विचार करण्यासाठी नाही, तर कृती करण्यासाठी आहे. बेन तुम्हाला काही आव्हानात्मक पण उपयुक्त सरावही सुचवतात, ज्यामुळे तुम्ही स्टोईक तत्त्वज्ञान प्रत्यक्षात उतरवू शकता. जसे की, • स्वतःची अँटी-बकेट लिस्ट तयार करणं • जाणूनबुजून थोडंसं अस्वस्थ अनुभव घेणं • निःस्वार्थी दृष्टीकोन विकसित करणं • स्वतःच्या मृत्यूचा विचार करणं (मेमेंटो मोरी) “तुमचं नियंत्रण तुमच्या मनावर आहे-बाह्य घटनांवर नाही. हे ओळखा, आणि तुम्हाला तुमच्यातील खरी ताकद सापडेल. – मार्कस ऑरेलियस”
-
Dnyanendriyantun Jivan (ज्ञानेंद्रियातून जीवन)
हे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नाही, ते अनुभवण्यासाठी आहे. दैनंदिन धावपळीत आपण आपल्या विचारांमध्ये आणि इतर कामांमध्ये इतके गुंतून जातो की, आजूबाजूच्या सुंदर जगाकडे आपलं लक्षच जात नाही. लेखिका ग्रेचेन रुबिन यांच्या बाबतीतही असंच झालं. इंद्रियाच्या बाबतीतील एका धक्कादायक घटनेमुळे त्यांना अचानक लक्षात आलं की, त्या आसपासचं जग अनुभवतच नव्हत्या. त्या म्हणतात, गंध, चव, स्पर्श, दृष्टी आणि श्रवण या इंद्रियांना जाणीवपूर्वक अनुभवायला शिकलं, तर आयुष्य समृद्ध आणि आनंदी होऊ शकतं. मग त्यांनी या पंचेंद्रियांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. कसं, ते या पुस्तकात वाचायला मिळेल. या पुस्तकात, पंचेंद्रियांचं महत्त्व दैनंदिन छोट्या गोष्टींत (जसे आवडते अन्न, गाणी) आनंद शोधण्याची कला छोट्या सवयी आणि प्रयोगांमधून स्वतःला नव्याने ओळखण्याचा अनुभव वर्तमान क्षणात पूर्णपणे कसं जगायचं अधिक ऊर्जा, उत्साह आणि प्रेमाने जगण्याचा मार्ग "वर्तमान क्षणात जगण्याची प्रेरणा देणारं आणि प्रत्यक्षात उपयोगी पडणारं मार्गदर्शक" - सुसन केन, क्वाएटच्या लेखिका
-
12 Varsh Mazi Viskalit Premkatha (12 वर्षं माझी विस्कळीत प्रेमकथा)
तो ३३ वर्षांचा. ती २१ची. तो एक स्ट्रगलिंग स्टैंड-अप कॉमेडियन, ती खाजगी कंपनीमधील प्रतिभावान अधिकारी. तो पंजाबी. ती रूढीपरंपरा जपणाऱ्या जैन कुटुंबातील. तो घटस्फोटित. तिच्या आयुष्यात कधी बॉयफ्रेंडही आला नाही. खरंतर त्यांनी एकत्र यायलाच नको होतं. पण ते वेगळे राहूच शकत नव्हते. '१२ वर्षः माझी विस्कळीत प्रेमकथा' साकेत आणि पायल; वय, राहणीमान, संगोपन, विचारसरणी यापैकी कशातच साम्य नाही, तरीही ते एकमेकांकडे का आकर्षित झाले? याचं उत्तर त्यांच्याकडेही नाही. ही फक्त केमिस्ट्री आहे की मनाच्या अंतरंगातील वेगळं काही... हा निव्वळ वेडेपणा आहे, की नुसतीच वासना, की निखळ प्रेम ? वाचकांना गुंतवून ठेवणारी आणि मनोरंजक अशी ही कादंबरी. एखादी व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे हे कसं ओळखायचं, या मूलभूत आणि महत्त्वपूर्ण प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते, विशेषतः तेव्हा, जेव्हा आजूबाजूचे सगळेच लोक आणि परिस्थितीही ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नाही असं जोरजोरात सांगत असेल. भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांचे लेखक चेतन भगत यांची एक नवीन, शक्तिशाली प्रेमकथा जी तुम्हाला हसवेल, कधी कधी रडवेलही आणि प्रेमाबद्दल तुम्हाला माहीत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर पुनर्विचार करायला लावेल.
-
Yesterday Night I Killed My Husband (यस्टरडे नाईट आय किल्ड माय हजबंड)
कबुली दिली गेली आहे.... पण रहस्याची खरी सुरुवात तर आत्ता होत आहे. एका वादळी रात्री, एका दुर्गम गावात मोनिका एक धक्कादायक कबुली देतेः "काल रात्री मी माझ्या नवऱ्याचा खून केला." पण इन्स्पेक्टर तिथे पोहोचतो तेव्हा तिचा नवरा तिच्या शेजारी अगदी जिवंत उभा असतो. मग खरे काय?, मोनिका भ्रमात आहे?, खोटं बोलतेय? की या सगळ्यामागे अजूनच भयंकर सत्य दडलंय ? इन्स्पेक्टर एका अशा रहस्याच्या जाळ्यात ओढला जातो, ज्याचा सामना त्याने याआधी कधीच केलेला नसतो एक काळोखाने भरलेला प्रवास... जो भीषण रहस्यांनी व्यापलेला आहे. तुम्ही हे रहस्य उलगडू शकता का ? एक स्त्री खुनाची कबुली देते. पण ज्याचा खून झाल्याचं ती म्हणते, तो अजूनही जिवंत आहे. आणि एक सिरीयल किलर मोकाट फिरत आहे. पण सत्य तुमच्या कल्पनेपेक्षाही अधिक भयानक आहे. कोण खोटं बोलतंय?, गुन्हेगार कोण आहे? आणि खरा राक्षस कोण? गडद अंधारात लपलेली रहस्यं, थरारक वळणं आणि असा एक खुनी, ज्याला तुम्ही कधीच विसरू शकणार नाही - अशी ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. सायकोलॉजिकल सस्पेन्स आणि रहस्याचा अप्रतिम संगम असलेली यस्टरडे नाईट आय किल्ड माय हजबंड ही कादंबरी शेवटच्या हादरवून टाकणाऱ्या द्विस्टपर्यंत तुम्हाला सतत अंदाज बांधायला लावेल.
-
Krodhagni Rajendra Choal Cha(क्रोधाग्नी राजेंद्र चोल चा)
इ.स. १००१. वयाच्या ३०व्या वर्षी महमूद गझनवी साम्राज्याची सूत्रे हाती घेतो आणि आपली नजर पूर्वेकडे वळवतो. मज़हबी उन्मादाने प्रेरित होऊन, तो भारतवर्षावर (ज्याला त्या वेळी भिन्नधर्मीयांची आणि काळ्या जादूची भूमी, तसेच अमाप संपत्ती आणि कीर्तीचे स्थान मानले जात होते) अराजकता आणि हत्याकांडांची एक भयानक मालिका सुरू करतो. असा अत्याचाराचा कहर जगाने यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. इ.स. १०२५. चेरा आणि पांड्यांना पराभूत केलेला, गंगा जिंकलेला, आणि वंग प्रदेशाचा अधिपती असलेला राजेंद्र चोल आपली समुद्री मोहीम श्रीविजय साम्राज्याकडे सुरू करायला तयार असतो. तेव्हाच सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाची बातमी त्याच्यापर्यंत पोहोचते. याच दरम्यान, अनाकलनीय लिपीतील एक प्राचीन पुस्तक त्यात दडलेली रहस्यं उलगण्यासाठी त्याच्या पालनकर्त्याला साद घालत असते. तर इकडे क्रोधाने भरलेला एक युवक युद्धासाठी अतिशय आतूर असतो. त्याचे प्रारब्ध अजून पूर्ण झालेले नाही. तो जिथे जातो, तिथे विध्वंस माजवतो आणि विनाशाच्या खुणा मागे सोडत पुढे जातो. आदिम परंपरेतील एक घातक योद्धा स्त्री, आपल्या सुलतानाच्या लालसेने भरलेल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्याची कृपा मिळवण्यासाठी आपल्या कौशल्यांचा उपयोग करते. या वैकल्पिक कालरेषेत, सोमनाथ मंदिराच्या विध्वंसामुळे चोल राजा प्रचंड क्रोधित होतो, आणि तो अचानक आपली योजना बदलतो. तो महमूदला थेट सामोरे जाण्याचा निर्णय घेतो. राजेंद्र चोलच्या या एका निर्णयामुळे भविष्य बदलेल का, भविष्यातील घौरी, खिलजी, बाबर यांना रोखता येईल का आणि वारंवार होणाऱ्या हत्याकांडांना आळा बसेल का? की भारतवर्षच अस्तित्वात राहणार नाही? ही पूर्वपक्ष, स्वयंबोध आणि शत्रुबोध यांची कथा आहे... धर्म आणि अधर्म यांच्या युद्धाची कहाणी. हे युद्ध प्रत्यक्षात कधी झाले नाही, पण झाले असते तर इतिहासाची दिशा पूर्णपणे बदलण्याची क्षमता त्यात होती.
-
Narsinha Mahaavatar - Part 1 (नरसिंह महावतार - भाग १)
नशिबाने वेगळे झालेले आणि दुःखाने एकत्र आलेले - विष्णूचा अवतार. असुरांचा राजा. एक विष्णूभक्त. एकेकाळचा शूर योद्धा नरसिंह युद्ध सोडून एका खेड्यात वैद्य म्हणून छुपेपणाने राहू लागतो. पण त्याच्या भूतकाळातील एक परिचित चेहरा त्याच्याकडे अंध राजपुत्र अंधकाच्या जुलमापासून मदतीची याचना करतो. जर नरसिंहाने नकार दिला तर, हे जगच उद्ध्वस्त होणार असतं. आता तो काय करेल? आणि मुळात त्याने युद्ध सोडण्यामागे काय कारण होतं? प्रल्हाद, काश्यपुरीचा अंतरिम राजा, त्याच्या वडिलांचे अन्याय्य विचार आणि विष्णूदेवांबद्दलचं त्याचं प्रेम यांच्या रस्सीखेचीत अडकलेला असतो. तो कोणाची निवड करेल? हिरण्यकश्यप, असुर साम्राज्याचा अधिपती, याला आपल्या पत्नीच्या मृत्यूचा सूड घ्यायचा असतो. त्यासाठी त्याला चाचण्या पार करणे आणि ब्रह्मशस्त्र मिळवणं गरजेचं असतं. पण या चाचण्यांमध्ये यापूर्वी अनेकजण मृत्यूमुखी पडलेले असतात. हिरण्यकश्यप त्यात तग धरून राहू शकेल? लेखक केविन मिसाल यांच्या विष्णूदेवांच्या चौथ्या अवताराच्या बाबतीतल्या पुनर्कल्पनेमध्ये तुमचं स्वागत आहे.
-
Narsinha - Hiranya Kashyap Part -2 (नरसिंह - हिरण्य कश्यप भाग - २)
सूडाने पेटलेला हिरण्यकश्यप इंद्राचं राज्य उद्ध्वस्त करू इच्छित होता. परंतु मुलानेच आपल्याला विरोध करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तो त्रस्त होता. नरसिंह प्रल्हादचा शोध घेण्यास निघतो, परंतु या प्रवासात त्याला त्याचा एक जुना मित्र भेटतो आणि एक प्राचीन विष ज्यामुळे त्याच्या योजनांमध्ये अडथळा निर्माण होतो. क्रोधाने पेटून उठलेली होलिका आपल्या भाच्याचा शोध घेते, परंतु त्याच्या बालपणीविषयीच्या वेदनादायी परिस्थितीबद्दलचं वर्णन तिच्या वाचनात येतं. आणि त्यामुळे आपल्या कृतींवर पुनर्विचार करायला तिला भाग पडतं. हिरण्यकश्यप इंद्राला हरवू शकेल का? होलिका आपल्या भाच्याप्रति असणारा राग विसरू शकेल का? नरसिंह प्रल्हादला शोधू शकेल का आणि त्याच्याबाबतीत सांगितलं गेलेलं भविष्य खरं ठरेल का? हा अद्भुत रोमांचकारी प्रवास बेस्टसेलर लेखक केविन मिसाल यांच्या नरसिंह या पुस्तकत्रयीच्या दुसर्या पुस्तकात सुरूच आहे.
-
Narsinha - Pralhad Part -3 (नरसिंह - प्रल्हाद भाग - ३)
सूड. क्रोध. धार्मिकता. तीन व्यक्ती, नशिबाने एकमेकांशी बांधल्या गेलेल्या, पण प्रभावांमुळे विभक्त झालेल्या. कोण टिकून राहणार? आपल्या आयुष्यात नरसिंहाला इतका राग कधीच आला नव्हता. हिरण्यकश्यपच्या मृत्यूनंतर आता तो काश्यपुरीवर राज्य करत आहे आणि सूड घेण्याची योजना आखण्यातच आपला वेळ घालवत आहे. चेनचेनच्या मृत्यूमागे असलेल्या इंद्रदेवाला मारण्याची त्याने शपथ घेतली आहे. नरसिंहाचा क्रोध जास्तच वाढत असल्याचं जेव्हा प्रल्हादाच्या लक्षात येतं तेव्हा, नरसिंहाने आणखी काही निरपराध लोकांचा जीव घेण्यापूर्वी आणि सर्वत्र अराजकता माजण्यापूर्वी त्याला थांबवायला हवं हे प्रल्हादला जाणवतं. परंतु जे आवश्यक आहे, ते तो करू शकेल? स्वतःला अंधारात न गमवता तो आपल्या एकमेव पित्यासमान व्यक्तीला मारू शकेल? केविन मिसाल यांच्या सर्वाधिक खपाच्या नरसिंह पुस्तकत्रयीच्या या अंतिम पुस्तकात भगवान नरसिंह आणि प्रल्हादच्या हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि थरारक गोष्टीची सांगता होते.
-
Devi Rakshati Rakshita (देवी रक्षति रक्षितः)
''ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चै...'' जोरजोरात मंत्रोच्चारण सुरु होते. समोरच कालीमातेची एक मोठी मूर्ती उभी होती. त्या मूर्तीकडे बघूनच भल्या भल्यांच्या हृदयाचा ठोका चुकत असेल. मूर्तीच्या गळ्यात वेगवेगळ्या माळा दिसत होत्या. त्यातल्या फुलांच्या माळा तिला ओळखू आल्या. पण बाकीच्या माळा एवढ्या दुरून तिला ओळखू येत नव्हत्या. त्या ओळखू याव्यात अशी तिची इच्छाही नव्हती. त्या विचारानेच जणू तिला अचानक थंडी वाजू लागली. तिने ओढणीने अंग झाकून घ्यावे म्हणून हात हलवले. ओढणी शोधतानाच तिला अचानक आपल्या अंगावर एकही वस्त्र नसल्याचे जाणवले. फुलांचा येत असलेला मंद सुवास आणि अंगाला होणारा थंडगार स्पर्श फक्त फुलांच्या माळा आपल्या शरीरावर असल्याची जाणीव करून देत होत्या. भितीने, शरमेने तिच्या अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आले. तिला इथून निघून जायचे होते. पण पायात जणू मणाच्या बेड्या होत्या. तिचे पूर्ण अंग कशालातरी जखडले होते. इथून सुटका होणे अशक्य होतेच पण अंगावर वस्त्रही नसल्याने सुटकेची छोटीशी आशा जी मनात होती ती ही मावळली होती. समोर होमकुंड धगधगत होते. एकजण देवीची जोरजोरात प्रार्थना करत होता. त्याचा चेहरा मात्र तिला दिसत नव्हता. समोर एक रेडा बांधलेला होता. तिथे एक बलीवेदी दिसत होती. त्या रेड्याचे भवितव्य तिला क्षणार्धात कळले. त्या रेड्याला समोर आणले गेले. ते खड्ग उचलले गेले. न राहवून ती जोरात किंचाळली.. "थांबा...". देवी रक्षति रक्षित: कादंबरीचे कथानक स्वप्नातील कालीमातेच्या मूर्तीसमोर घडणाऱ्या एका प्रसंगापासून सुरु होते. 'आता काय होणार?', असे वाटत असतानाच कळते की हे एक स्वप्न होते. इथेच कथेच्या नायिकेची भेट होते, ती म्हणजे शांभवी! संवादादरम्यान तिचा भाऊ अष्टमीचा उल्लेख करतो आणि खऱ्या अर्थाने कथेतील गूढ निर्माण व्हायला सुरुवात होते. पुरातत्व विभागात काम करणारी शांभवी, तिचे आईबाबा, भाऊ पार्थ, मैत्रीण जयंती, अपघातामुळे ओळख झालेला कपिल आणि शांभवीचा बॉस असलेला रूद्र या निवडक पात्रांभोवती फिरणारे हे कथानक आहे. नेमकीच पात्रे अधूनमधून भेटीला येतात आणि कादंबरीत सुटसुटीतपणा जाणवतो. अधूनमधून झलक दिसणारा 'तो' म्हणजे नक्की कोण? ,स्वप्नात दिसणारे पुसट चेहरे कोणाचे? हे प्रश्न कादंबरीच्या शेवटापर्यंत विचार करायला पुरतात. शांभवीच्या वडिलांनी केलेला खुलासा, कपिलकडून झालेला शक्तीपीठाचा उल्लेख, शांभवीच्या मनातील विचारमंथन अन् प्रश्न आणि एका अघटितातून सुरू झालेला प्रवास कथेला रंजक वळणावर घेऊन जातो. परिस्थितीने आणलेल्या एका वळणाची सुरुवात पुन्हा एकदा शक्तीपीठापासूनच होते. आईबाबांचा मृत्यू, शांभवीचे अटक वॉरंट, नाशिकला जाणे, हे सगळे पूर्वनियोजित होते की खरोखरच वेळेनुसार घडत होते? प्रवास आणि त्यात डोक्यात विचारांचे काहूर माजलेली शांभवी पाहून नकळत मनातील हळवा कोपरा जागा होतो. हळूहळू उलगडणारी शक्तीपीठे, शिव-सतीची कहाणी, इतरही पौराणिक कथा, संदर्भ, काही ज्ञात तर काही अज्ञात गोष्टी, जरी आधी ऐकले वाचले असतील किंवा नसतीलही, तरी वाचकाला खिळवून ठेवतात.मठपतींच्या मंत्रातून मिळालेला मार्ग आणि दशमहाविद्यांच्या दिशेने नव्याने सुरू झालेला प्रवास वाचकाला या प्रवासासोबत जोडून ठेवण्यात यशस्वी ठरतो. नाशिक, पाथर्डी, तुळजापूर, कोलकाता, आसाम, उमानंद द्वीप, पुरी,... अशी ठिकाणे असोत किंवा मग नवनाथ, दीन महाराज मठ, कालीमाता, भैरव, कालिका, बामाखेपा, कामाख्या, उमानंद, दशावतार, पंचायतन, दशमहाविद्या, विमला, जगन्नाथ, तारातारिणी,.. इ. असोत, प्रत्येक वेळी काहीतरी नवा उलगडा होतो. मधूनच जयंतीची शंका घ्यायला लावणारी झलक, तर मधेच शंका वाढवणारा कपिल जाणवत राहतात. रूद्र नावाचा रहस्य दडवणारा खडूस बॉस नक्की रक्षक की भक्षक? हे सर्व तर कादंबरी वाचल्यावरच समजते. शेवटाकडे आल्यावर पुन्हा एकदा तोच मंत्र पडद्यासमोर येतो आणि या रहस्यमय वातावरणावरचा पडदा दूर होतो. शेवटी फायद्याशिवाय कोणासाठी काही करणारे दुर्मीळच! त्यामुळे 'आपल्या' चेहऱ्यांमागचे कपटी चेहरे आणि रहस्यमय वागण्यामागचे 'आपले' चेहरे याचा अंदाज बांधणे कठीणच... शिवशक्तीचे मिलन आणि 'देवी रक्षति रक्षितः' शीर्षकाला साजेसा असा कादंबरीचा शेवट मनाला भिडतो. सोबतच शेवटी मात्र लेखिकेने एका नव्या अध्यायाचे धागेदोरे सोडले आहेत.
-
Shambhudnya (शंभूज्ञा)
"शंभुज्ञा म्हणजे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रतिज्ञा" यामध्ये अटळ धैर्य आहे, बलिदानाची प्रेरणा आहे, अन्यायाची चीड आहे अन् स्वराज्याप्रति अखंड निष्ठा आहे. संकटाशी लढण्याची वृत्ती, अपयशासमोर न झुकता उभे राहण्याची ताकद, संकटाशी दोन हात करण्याचे सामर्थ्य. "शंभुज्ञा म्हणजे जीवनयुद्धात विजय मिळविण्यासाठी लागणारी आतली ज्वाला - एक शौर्यगाथा."
-
Ammachya Dayaritil Kahi Pane (अम्माच्या डायरीतील काही पाने)
तेलुगू भाषेत प्रकाशित झाल्यानंतर अतिशय अल्पावधीत ही कादंबरी बेस्टसेलर ठरली , एवढंच नाही तर ही कादंबरी आजही बेस्ट सेलर च्या श्रेणीत आहे. आता ही कादंबरी तुमच्यासमोर मराठीत उपलब्ध आहे. ज्या प्रकारे दक्षिणेतील लोकांनी मूळ तेलुगू कादंबरीला आणि तिच्या कथेला प्रतिसाद दिला आहे, त्याचप्रमाणे मराठी वाचकही या कादंबरीला भरभरून प्रतिसाद आणि प्रेम देतील अशी आम्हाला खात्री आहे. ही एक अशी प्रेमकथा आहे, जी प्रत्येकाला स्वतःमध्ये डोकावून पाहण्यासाठी प्रेरित करेल. पुस्तकातील काही ओळी मला एक सांगा... तुम्हाला कधी कुणी पत्र लिहिलं आहे का? प्रेमपत्र किंवा अगदी साधं पत्र? बरं, ते जाऊ दे... तुम्ही कधी कुणाला पत्र लिहिलं आहे का? मला वाटतं, आपण रोज एकमेकांशी जे बोलत असतो, तेच जर शब्दांत मांडून कागदावर लिहिलं, तर ते पत्र होतं, असं समजणारा मी एक सरळसाधा माणूस आहे. माहीत नाही का, पण आज मला तुम्हाला एक प्रेमकथा सांगाविशी वाटतेय, अर्थात तुम्हाला पत्र वाचायची सवय आहे की नाही, हे मला माहीत नाही, पण तरीसुध्दा मी लिहितोय अम्माची प्रेमकहाणी. जेव्हा मला वाटलं की एका आईचीही प्रेमकथा असू शकते, तेव्हापासूनच ही यात्रा सुरु झाली. ही एका आईच्या डायरीमधील काही पानं आहेत. चांदण्या रात्री, लाटा पाहताना, आपल्या स्वप्नांना लपवून ठेवत मी लिहिलेलं हे एक प्रेमपत्रच आहे