-
Ase Ghadwa Tumche Bhavishya (असे घडवा तुमचे भविष्य
‘माझ्या आयुष्यात येणार्या इतक्या सार्या अडचणींसमोर हार न मानता मी जर इतकं काही करू शकलो तर कोणीही हे करू शकतं, हाच संदेश मी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या देशातील युवकांना देऊ इच्छितो. या पुस्तकातून प्रेरणा घेऊन एका जरी युवकाने स्वतःचं स्वप्न साध्य केलं तर माझा लिहिण्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला असं मी समजेन. हे पुस्तक देशभरातील युवकांनी मेल्सद्वारे विचारलेल्या प्रश्नांवर आधारित आहे आणि त्यांना दिलेली उत्तरं ही माझ्या जीवनातील अनुभवातून मी जे काही शिकलो त्याचे सार आहे. ही उत्तरं अशा प्रकारे समोर मांडली आहेत, की जे वाचक अशाप्रकारच्या समस्यांना तोंड देत आहेत त्यांनासुद्धा या उत्तरांमध्ये दडलेले संदेश उपयोगी पडतील.’’
-
Yashasvi Loka Kasa Vichar Kartat (यशस्वी लोक कसा व
यशस्वी लोकांच्या विचार करण्याच्या 11 पद्धती शेअर्ड थिंकिंग पॉप्युलर थिंकिंग फोकस्ड थिंकिंग क्रिएटिव्ह थिंकिंग स्ट्रॅटेजिक थिंकिंग अनसेल्फिश थिंकिंग बिग पिक्चर थिंकिंग रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग पॉसिबिलिटी थिंकिंग रिअॅलिस्टिक थिंकिंग बॉटम-लाईन थिंकिंग
-
Apanganchya Hakkanvishyicha Kayda 2016 (अपंगांच्या
डॉ. वा. ना. तुंगार, हे स्वतः अपंग असल्याने सर्व अपंगांच्या समस्या ते स्वतः अनुभवत आहेत. त्यामुळेच त्यांनी स्वतः अपंग सहाय्यकारी संस्थेची सन 1968 साली स्थापना केली व या संस्थेमार्फत गेली 50 वर्षे अव्याहतपणे अपंगांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी रचनात्मक कार्य सुरू आहे. संस्थेस उल्लेखनीय कार्याबद्दल सन 2001 मध्ये राज्य शासनाचा तर सन 2004 मध्ये केंद्र शासनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. डॉ. वा.ना. तुंगार यांनी यापूर्वी 1. भारतीय पुनर्वसन परिषद कायदा 1992 अपंग व्यक्तींचा कायदा 1995. 2. राष्ट्रीय अपंग आर्थिक व विकास महामंडळ 1997 आणि मतिमंद, बहुविकलांग व्यक्तींसाठी राष्ट्रीय विश्वस्त कायदा 1999. 3. न्याय अपंगांना 4. कहाणी अथक जिद्दीची (आत्मचरित्र) या पुस्तकांचे लेखन केलेले आहे. अपंगांना आपले हक्क व अधिकारांची माहिती होण्यासाठी त्यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.
-
Majhya Aayushyat Asa Ka Ghadta (माझ्याच आयुष्यात अ
* मी का आहे? * जीवनाकडून मिळणार्या संकेतांचा अर्थ * असे का? तसे का नाही? * समस्या तुमच्याशी संवाद साधते * भावनिक युद्ध कसे जिंकाल? * हीच व्यक्ती माझ्या आयुष्यात का? * आयुष्यात त्याच त्याच गोष्टी परत का घडतात? * विचारांना पाहण्याची कला
-
Kaanmantra Aaibabansathi (कानमंत्र आईबाबांसाठी)
प्रत्येक आई-बाबा, आजी-आजोबा यांनी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.... * मुलांचा हट्टीपणा कसा दूर करावा? * मुलांनी पालकांचे ऐकावे का? * मुलांच्या मनातले ओळखायचे तंत्र * मुलांचं टीव्ही बघणं कसं बंद करावं? * मुले अभ्यास का करतील? * मुलांची बुद्धीमत्ता कशी वाढवावी? * मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास * प्रत्येक पाल्यामध्ये आवश्यक असणारे 21 गुण * पालकांच्या जमाती
-
Bill Gates.. (बिल गेट्स)
बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी ‘मायक्रोसॉफ्ट’ या जगविख्यात सॉफ्टवेअर कंपनीची निर्मिती केली. एका वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचे धाडस त्यांनी दाखवले, त्यासाठी आवश्यक गुण अंगीकारून आणि प्रचंड मेहनत करून त्यांनी यश मिळवले. केवळ पैसा कमविणे हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर न ठेवता समाजोपयोगी कार्य करून त्यांनी मानवतावाद जोपासला. त्यांच्या या अभूतपूर्व प्रवासाची कहाणी या पुस्तकात आहे, जी प्रत्येकाला प्रेरणादायी ठरेल. जिद्द, चिकाटी, एकाग्रतेचा अभूतपूर्व प्रवास... 35 रुपये ते 1 करोड 20 लाख! 30 व्या वर्षी बिलेनियर आदर्श पती आणि पिताही! मानवतावादी बिल गेट्स व्यावसायिकतेचे धडे
-
Veleche Vyavasthapan (वेळेचे व्यवस्थापन)
* जर आपल्याकडे स्वतःचे वेळापत्रक नसेल तर आपल्याला दुसर्याचे वेळापत्रक जगावे लागते. * वर्षे, महिने, दिवस, तास, मिनिटे व सेकंद वाचवण्याचे रहस्य. * वेळेचे व्यवस्थापन शिकण्यासाठी एकदाच वेळ द्या आणि आयुष्यभर वेळ वाचवा. * मल्टिटास्किंगची कला आत्मसात करण्याचे सूत्र
-
Masurchi Sanjyot (मसूरची संज्योत)
स्वातंत्र्य ही माणसाची सर्वात मोठी गरज आहे. पण कित्येक वेळा, स्वातंत्र्यात जन्मलेल्या माणसाला ते जाणवत नाही. भारत देश पारतंत्र्यात असताना कित्येक लोकांनी त्यांच्या जीवनाची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. लाखो लोकांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळालं. जे स्वातंत्र्यसेनानी देशासाठी लढले त्यांच्यापुरताच हा लढा मर्यादित नव्हता. या संग्रामामध्ये त्यांच्या घरातील मंडळी, नातेवाईक अशा सर्वच लोकांचं यामध्ये योगदान होतं. हे पुस्तक अशाच एका स्वातंत्र्य सैनिकाची संघर्षमय सत्यकथा आहे. ही कथा कोणा एका व्यक्तीची नसून या संग्रामामध्ये सामील असलेल्या कित्येक लोकांचे प्रतिनिधित्व करते. हे पुस्तक वाचल्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जन्मलेल्या प्रत्येकालाच एक नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. तसेच आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी योगदान दिलेल्या लोकांची परिस्थिती समजायला मदत होईल.
-
Sales Superstar Bananyachya 21 Hukami Padhati (सेल
* सेल्समनच्या मनातील भीती व त्यावरील उपाय * सेल्सकॉल्सची प्रभावीपणे तयारी कशी करावी? * विक्रीक्षेत्रात यश मिळवण्याची सूत्रं * विक्रीसाठी आवश्यक संबंध निर्माण करण्यासाठी - रिलेशनशीप सेलिंग मॉडेल * प्रेझेंटेशन स्कील * सेलिंग करताना ग्राहकाकडून येणारे प्रश्न व त्यावरील उत्तरं * विक्री करताना वेळेचं आणि कामाचं नियोजन * सेल क्लोज कसा करावा?
-
Governance For Growth In India (गव्हर्नन्स फॉर ग्र
भारतामध्ये वेळोवेळी निवडणुका होत असतात. आणि नेहमीच सर्व मतदारांमध्ये सत्ता आणि निवडणुका याविषयी वादविवाद आणि चर्चा चालू असतात. हे पुस्तक म्हणजे, राष्ट्रीय जीवन अतिशय जवळून पाहिलेल्या एका व्यक्तिमत्त्वाच्या दूरदृष्टीतून आलेलं निवेदन होय. प्रत्येक नागरिकाने ते वाचायलाच हवं आणि समजून घ्यायला हवं. दूरदृष्टी असणारे पण तरीही प्रॅक्टीकल असे ‘गव्हर्नन्स ङ्गॉर ग्रोथ इन इंडिया’ हे पुस्तक प्रत्येक नागरिकासाठी वेळोवेळी उपयोगी पडणारा आराखडाच आहे. या पुस्तकामुळे नागरिक आपला मताधिकार योग्य विश्लेषण करून आणि विचारपूर्वक वापरतील आणि भारतामध्ये खरा बदल घडवून आणतील. प्रत्येक निवडणुकीमध्ये, तुम्हाला अनेक उमेदवारांमधून कामाच्या आधारे आणि समाजाला त्यांनी दिलेल्या योगदानाच्या आधारे सर्वोत्कृष्ट उमेदवार निवडायचा असतो. तुमचा ‘‘मतदानाचा अधिकार’’ अमूल्य आहे. आणि तो बजावणे गरजेचे आहे. तो बजावल्यामुळे एक नागरिक म्हणून तुम्ही केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये एक चांगलं सरकार विकसित करण्यासाठी मदत करता.
-
Samarthyashali Leader (सामर्थ्यशाली लीडर)
कोणत्याही प्रसंगात दूरदृष्टी ठेवून साहसाने यश खेचून आणण्यासाठी
-
Power Of Confidence (पॉवर ऑफ कॉन्फिडन्स)
स्वतःमध्ये व दुसर्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी प्रत्येकजण‘असामान्य’ आहे. मी ‘असामान्य आहे’ हे समजण्यासाठी...
-
Jinkeparyant Ladha (जिंकेपर्यंत लढा)
‘‘माझा असा ठाम विश्वास आहे की, सर्वसाधारणपणे ज्या गोष्टी लोकांना अशक्य कोटीतल्या वाटत असतात, त्या खरं तर वास्तवात उतरवता येतात. मात्र त्यासाठी अपार मेहनत करण्याची तुमची तयारी हवी. समस्यांचं तुम्ही अवडंबर माजवलं नाही तर संधी बनून त्या तुमच्यापुढे येतात.’’ ‘‘ज्या ज्या वेळी नाही किंवा नको, या नकारघंटा मला ऐकू येतात, त्या वेळी त्यांचा नाद मी माझ्यासमोरचं आव्हान समजतो.’’ याचा मला असा फायदा झाला की, 1990 मध्ये माझं नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ मध्ये नोंदवलं गेलं. अन् तेही आजवरच्या इतिहासात कुणी कधी मिळवला नसेल इतका भरगच्च नफा मिळवण्यासाठी. माझे अनुभव आणि जिंकेपर्यंत लढण्यासाठी वापरलेली शस्त्रे या पुस्तकरुपाने मांडली आहेत. * निराशेच्या क्षणांवर मात * अपयश कायमस्वरूपी नसतं * धाडस म्हणजे भीतीवर विजय * समस्यांमधल्या संधी शोधा * तोट्यातील व्यवसाय त्वरित बंद करा * 6 वर्षांचा प्रकल्प 6 महिन्यांत * कधीतरी नवीन सुरुवात करावीच लागते * फजितीचे प्रसंग * अल्पसंतुष्ट राहू नका * बदलाला विरोध हा होतोच * फ्रेड ट्रम्प यांची ‘यशाची चतुःसूत्री’ * स्वतःचे गुण लोकांपुढे मांडण्याची कला * हल्ला करणार्यांना धडा शिकवा * आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसायाचा विचार करा * इतरांची हार, तुम्हाला संधी
-
Paisa Aani Samrudhichi Master Key (पैसा आणि समृद्ध
यश आणि समृद्धी मिळवण्यासाठी मनाला तयार करण्याची सोपी पद्धत लेखक नेपोलियन हिल यांनी या पुस्तकात सांगितली आहे. इच्छाशक्ती, स्वयंशिस्त आणि सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करून कोणत्याही वयाची, कोणत्याही क्षेत्रातील आणि कोणत्याही परिस्थितीतील व्यक्ती हे सिद्धांत वापरून यशस्वी होऊ शकते. * जीवनातील खर्या 12 संपत्ती * करिअरमधील, नातेसंबंधातील आणि व्यावसायिक यश * अॅन्ड्र्यू कार्नेगी, हेन्री फोर्ड, थॉमस एडिसन यांच्या यशाची सूत्रे * सवयीच्या वैश्विक शक्तीचा सिद्धांत * कार्नेगी यांची ‘मनांची युती’ * एक पाऊल पुढे जाण्याची जादू नेपोलियन हिल हे जगप्रसिद्ध लेखक असून त्यांनी व्यक्तिमत्त्व विकासावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांमधून सकारात्मकतेची आणि हवं ते साध्य करण्याची गुरूकिल्लीच मिळते. नेपोलियन हिल हे ‘थिंक अॅन्ड ग्रो रिच’, ‘कीज टू पॉझिटिव्ह थिंकिंग’, ‘52 लेसन्स फॉर लाईफ’ या सुप्रसिद्ध पुस्तकांचे लेखक आहेत.
-
Neuro Linguistic Programming Part 1 (न्युरो लिंग्व
बदल घडवणं सोपं नाही हा विचारच बदल घडण्यामधील सर्वात मोठी बाधा आहे. तुम्ही जो विचार करता तो कदाचित सत्य नसेल. पण तुम्ही जो विचार करता ते सत्यात नक्कीच उतरतं. आपल्याकडे नेहमीच खालील दोन पर्याय असतात : 1. भूतकाळाचा विचार करून भविष्याला बंधनात टाकणं. किंवा 2. भूतकाळातून धडा घेऊन चांगल्या भविष्याची निर्मिती करणं. एनएलपीचे सहनिर्माते रिचर्ड बँडलर यांच्या एनएलपी या विषयावरील 35 वर्षांच्या अभ्यासानंतर या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. हे पुस्तक एक कार्यशाळा असून या कार्यशाळेमधून आपल्याला खालील विषयांवर मार्गदर्शन मिळणार आहे : * भीती, निराशा आणि दु:खापासून स्वातंत्र्य कसे मिळवावे * स्वसंवाद म्हणजे काय आणि तो कसा बदलायचा * मनावर ताबा कसा मिळवायचा * मान्यता कशा बदलायच्या * भूतकाळापासून मुक्ती * योग्य प्रश्नांची किमया
-
Datta Anubhuti (दत्त अनुभूति)
स्वामी कृपेने घडलेल्या 11 गिरनार वार्यांमधील चमत्कारिक अनुभव ||श्री|| सद्गुरू शरण झाल्यावर काहीही शक्य आहे. या भक्तांनी अकरा वेळा श्री. गिरनार दर्शन घेतले. - त्यांच्या श्रद्धेला माझे प्रणाम. तुम्ही श्रद्धा ठेवा, त्याची पावती मिळतेच हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. भक्ती फार कसोटीला लावावी लागते. चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. याचा अनुभव यांनी घेतला. पुस्तक वाचल्यावर इतरांनीही अनुकरण करावे. या सर्वांना माझ्या शुभेच्छा. अवधुतानंद (जगन्नाथ कुंटे) सोसाट्याचा वारा, रात्रीचे भयाण जंगल, काळजाला चिरणारा भयानक श्वापदांचा आवाज, अशातच गिरनार वारीचा प्रत्यक्ष अनुभव, साक्षात महाराजांच्या आदेशांनुसार 11 गिरनार वारीचा अमूल्य ठेवा, तसेच महाराजांचे अनेक अनुभव झोळीत सांभाळून आणीत अंती साक्षात दत्त महाराजांच्या परवानगीने प्रकाशित केलेले पुस्तक. ‘हम गया नहीं, जिंदा है’ची प्रचिती समस्यांची झळ लागू दिली नाही गिरनारची अविस्मरणीय वारी अघोरी शक्तीही झाली वश अजब पण गजब दर्शन स्वामींनी हट्ट पुरविला प्रचिती दिलीच
-
Swayamprerit Jeevan Kase Jagave (स्वयंप्रेरित जीवन
समृद्धी प्राप्तीचा मार्ग विचारांना दिशा देण्याची कला स्वयंप्रेरणेसाठी स्वयंसूचनांचा वापर स्वयंप्रेरणेतून संकेत कसे मिळवाल? स्वयंप्रेरणेतून मनाच्या सीमा, बंधनं ओलांडा अहंकार कसा ओळखाल आणि तो कसा दूर कराल भावना, निसर्ग आणि घटनांशी एकरूपता कशी साधाल शांत, आनंददायी, साधं-सोपं, उत्साहपूर्ण जीवन जगण्याच्या पायर्या
-
Dasha Badlaychi Asel Tar Disha Badala (दशा बदलायची
या पुस्तकात.... रेफरन्स ऑफ सक्सेस तंत्र नकारात्मकतेवर विजय मिळविण्याचे विचारांचा गोंधळ कसा कमी कराल? मनाला शांत करण्याचा हुकमी उपाय योग्य निर्णय घेण्याची कला पैसे आकर्षित का होतील? रहस्य व्यक्तिमत्त्वाचे उताविळपणाला लगाम दिशा कशी बदलाल? अजून दहा ओव्हर्स बाकी आहेत या आणि अशा अनेक छोट्या छोट्या पैलूंद्वारे जीवनाला दिशा देणारे पुस्तक