-
Jallianwala Bagh 13 April 1919 (जालियनवाला बाग १३
मराठी साहित्यात पहिल्यांदाच उलगडणार... जालियनवाला बाग : इतिहासात अजरामर झालेल्या 'घटनेचा' लेखाजोगा 13 एप्रिल 1919, अमृतसरमध्ये जालियनवाला बागेत सभेसाठी जमलेल्या सामान्य लोकांवर ब्रिटिश लष्करी अधिकारी ब्रिगेडियर जनरल डायरच्या शिपायांनी केलेला निर्दयी गोळीबार हा इतिहासातील एक अजरामर प्रसंग ! या शोकांतिकेने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राण फुंकले. भारतातील ब्रिटिश राजवटीच्या अखेरीची ही सुरूवात ठरली. भगतसिंग, उधमसिंग या क्रांतिकारकांना जन्म देणार्या, समाजाच्या तळापर्यंत स्वातंत्र्याची उर्मी चेतवणार्या या ऐतिहासिक घटनेचा संपूर्ण लेखाजोखा मराठी साहित्यात प्रथमच या पुस्तकात ओघवत्या शैलीत मांडला आहे.
-
Devachya Navan (देवाच्या नावानं)
श्रद्धाळू माणूस मनातल्या आस्थेपोटी देवदर्शनाला जात असतो. कुठल्याश्या मंदिरात जावं, दोन-चार तास थांबावं, मनोमन प्रार्थना करावी, यथाशक्ती देणगी द्यावी आणि सुखासमाधानाच्या आशेने घरी परतावं, असा त्यांचा नित्यनेम असतो. मात्र त्याच्या या छोट्याशा कृतीमुळे देवस्थान नावाचा एक भला थोरला डोलारा उभा राहतो, याची त्याला कल्पनाही नसते. प्रत्यक्षात त्याच्यासारख्या हजारो भक्तांच्या प्रवाहामुळे देवस्थान प्रसिद्ध पावतं, कोटी-कोटीची उड्डाणं घेऊ लागतं, स्पर्धा-चढाओढ-ताबा मिळण्यासाठीची धडपड अशा मानवी वृत्ती-प्रवृत्तींचा खेळ तिथे सुरू होतो. देवाच्या नावाने बरंच काही घडू लागतं. या सार्याचे व्यापक, सामाजिक-राजकीय परिणामही घडू लागतात. हे सारं कसं होतं याचा महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांचा अभ्यास करून घेतलेला शोध.
-
Brand Factory (ब्रँड फॅक्टरी)
‘ब्रँड फॅक्टरी’ या आजच्या काळाचा वेध घेणार्या कथा आहेत. आजच्या काळातील सामान्य माणसांच्या या कथा आहेत. जागतिकीकरणातून अवतरलेल्या बाजारयुगाच्या भूलभुलैय्यात माणसं हरवली आहेत. एकीकडे स्वप्नांची झगमगती दुनिया आहे, चमकदार जगण्याची मोहिनी पडली आहे. जगण्याचं मान बदललेलं आहे आणि त्यात जगण्याचं भान हरवून गेलं आहे. जणू तारा अगदी हाताशी आहे, पण तो हातात येत नाहीये, अशी अवस्था! त्यासाठी जीवघेणी स्पर्धा, प्रचंड दमछाक आणि घुसमट! जगण्याचा झगडा तीव्र झाला आहे आणि त्यात केवळ फरफट दिसत आहे. या सगळ्या उलथापालथीत माणसातून हरवत चाललेला ‘माणूस’ या कथा अधोरेखित करीत आहेत. या कथा विचारत आहेत, आपण अजून ‘माणूस’ आहोत ना? आपला ‘ब्रँडेड रोबो’ तर झाला नाही ना? मनोहर सोनवणे यांच्या लिखाणात प्रचारकी थिल्लरपणा नाही. ते तटस्थ आहेत अन संवेदनशीलही. त्यामुळे ‘ब्रँड फॅक्टरी’ला कलात्मक मूल्य प्राप्त झालंय, यात शंका नाही. – अंबरीश मिश्र मनोहर सोनवणे यांचं लिखाण म्हणजे एका संवेदनशील मनाने आपला भोवताल टिपल्यानंतरची स्पंदनं आहेत. त्यात आपल्या भोवतालाचं सूक्ष्म निरीक्षण आहे आणि त्या भोवतालात गुंतलेल्या आर्थिक-सांस्कृतिक धाग्यांची खोल जाणीवही आहे. – वसंत आबाजी डहाके
-
Tumhich Bana Tumchya Asamanya Jivnache Shilpkar (त
मनःशांती, चिंतामुक्त जीवन, निरोगी शरीर, चांगलं उत्पन्न आणि त्याचबरोबर चांगले नातेसंबंध या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी मनाला कशाप्रकारे प्रशिक्षण द्यायचं हे या पुस्तकात अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. या पुस्तकात दिलेल्या साध्या सोप्या स्वयंसूचनांचा वापर करून तुम्ही सहजपणे तुमचं आनंदी आणि असामान्य जीवन घडवू शकाल. अगदी सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय विचार मनाला द्यायला हवेत, ते हे पुस्तक तुम्हाला सांगतं. या पुस्तकात अनेक प्रकारच्या स्वयंसूचना सांगितलेल्या आहेत ज्या दैनंदिन जीवनात तुम्हाला निश्चितच उपयोगी पडतील. उदा. आजारातून बरं होण्याकरता, दिवसाची सुरुवात करताना, अडचणींचा सामना करताना, काम करताना, समृद्धीकरता, गाडी चालवताना... अगदी जीवनाच्या अंतिम क्षणाची तयारी करताना काय स्वयंसूचना द्याव्यात इथपर्यंत.
-
Tirupati (तिरुपती)
जगभरातल्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजीच्या अवतार-कार्याविषयीचे हे पुस्तक. लेखकद्वयींच्या व्यासंगी, अभ्यासपूर्ण आणि सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक. देवांच्या गोष्टींमधील मानवी भावभावनांचा आविष्कार व त्यातील अद्भुतता – अतर्क्यता यांसह अभिव्यक्त होणारे पुस्तक. जनमानसातील श्रद्धा-भक्तिभावाच्या संचिताचे पावित्र्य जपत, कलात्मक उंचीद्वारे ओघवत्या शैलीत साकारलेले भारतीय सांस्कृतिक समन्वयाचा धागा जपणारे वाचनीय पुस्तक.