-
Devachya Navan (देवाच्या नावानं)
श्रद्धाळू माणूस मनातल्या आस्थेपोटी देवदर्शनाला जात असतो. कुठल्याश्या मंदिरात जावं, दोन-चार तास थांबावं, मनोमन प्रार्थना करावी, यथाशक्ती देणगी द्यावी आणि सुखासमाधानाच्या आशेने घरी परतावं, असा त्यांचा नित्यनेम असतो. मात्र त्याच्या या छोट्याशा कृतीमुळे देवस्थान नावाचा एक भला थोरला डोलारा उभा राहतो, याची त्याला कल्पनाही नसते. प्रत्यक्षात त्याच्यासारख्या हजारो भक्तांच्या प्रवाहामुळे देवस्थान प्रसिद्ध पावतं, कोटी-कोटीची उड्डाणं घेऊ लागतं, स्पर्धा-चढाओढ-ताबा मिळण्यासाठीची धडपड अशा मानवी वृत्ती-प्रवृत्तींचा खेळ तिथे सुरू होतो. देवाच्या नावाने बरंच काही घडू लागतं. या सार्याचे व्यापक, सामाजिक-राजकीय परिणामही घडू लागतात. हे सारं कसं होतं याचा महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांचा अभ्यास करून घेतलेला शोध.
-
Asa Ghadala Bharat (।। असा घडला भारत ।।)
भारताचा प्रदीर्घ स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. अनेकविध समस्यांचं ओझं घेऊन आणि मोठी स्वप्नं उराशी बाळगून आपल्या नव स्वतंत्र देशाने वाटचाल सुरू केली. पुढील ६५ वर्षांच्या प्रवासात अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडून गेल्या ज्यामुळे देशाची वाटचाल नियत झाली वा ज्यातून विविध क्षेत्रांतील वळणं दिसून आली. अशा घटनांचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात मूलभूत स्वरूपाच्या कोणत्या गोष्टी घडून आल्या? पुढील काळात राजकारण-समाजकारण कसं बदलत गेलं? अर्थ-उद्योग ते विज्ञान आदी क्षेत्रात कसे बदल संभवत गेले? कितपत विकास साध्य झाला आणि कशा बाबतीत अधोगती संभवली? आपल्या वाटचालीच्या दृष्टीने कोणत्या आंतरराष्ट्रीय घटना अनुकूल वा प्रतिकूल ठरल्या? चित्रकला, नाट्यक्षेत्र ते चित्रपटमाध्यम यातून बदलत्या परिस्थितीचं प्रतिबिंब किती परिणामकारकतेने प्रतीत झालं? क्रीडाविश्वात काय बदल घडले? अशा प्रश्नांची उत्तर देणाऱ्या व जनजीवन घडवणाऱ्या विविध क्षेत्रांतील घटना आणि त्याचप्रमाणे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती-दुर्घटना आदींचाही वेध या ग्रंथातून घेतला आहे. गतकाळातील घटनांचा जास्तीतजास्त तटस्थतेने मागोवा घेण्याचा आम्ही यत्न केला आहे. त्यामागे केवळ स्मृतींना उजाळा द्यावा इतका मर्यादित उद्देश नाही. ज्यांनी हा काळ पाहिला आहे, त्यांना या गतघटनांचं नव्याने आकलन व्हावं ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे उगवत्या पिढीला गतकाळाचं नेमकं भान यावं व समकालीन घटनांचा अन्वयार्थ लागावा, हे अभिप्रेत आहे. एकंदरीत, आपल्या भोवतालाचं समग्र भान देऊ पाहणारा असा हा महद्ग्रंथ असा घडला भारत !
-
Kharekhure Idals ( खरेखुरे आयडॉल्स )
समाजाच्या भल्यासाठी धडपडणा-या कार्यमग्न, प्रेरक व्यक्तिमत्त्वांची ओळख तसेच पथदर्शक अन् प्रेरणादायी प्रयोग-प्रयत्न-प्रकल्पांमधून नवा भारत घडवणा-या लोकांच्या विचारांचा मागोवा घेणारं पुस्तक!
-
Ardhi Mumbai
मुंबईतल्या गरीब, कष्टकरी आणि जगण्याशी रोज झगडा करणा-या वस्त्यांचे नि तिथल्या माणसांच्या जगण्याचे कंगोरे शोधणारं 'युनिक फिचर्स'चं 'हटके' पुस्तक.
-
II
समाजाच्या भल्यासाठी धडपडणा-या ख-याखु-या आयडॉल्सना संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर शेती-पाणी-शिक्षण-आरोग्-र्पावरण-ग्रामविकास-विज्ञान-तंत्रज्ञान आदि क्षेत्रात पथदर्शक कार्य उभारणा-या आणखी काही कार्यरतांची ओळख करून देणारं पुस्तक.