Devachya Navan (देवाच्या नावानं)

श्रद्धाळू माणूस मनातल्या आस्थेपोटी देवदर्शनाला जात असतो. कुठल्याश्या मंदिरात जावं, दोन-चार तास थांबावं, मनोमन प्रार्थना करावी, यथाशक्ती देणगी द्यावी आणि सुखासमाधानाच्या आशेने घरी परतावं, असा त्यांचा नित्यनेम असतो. मात्र त्याच्या या छोट्याशा कृतीमुळे देवस्थान नावाचा एक भला थोरला डोलारा उभा राहतो, याची त्याला कल्पनाही नसते. प्रत्यक्षात त्याच्यासारख्या हजारो भक्तांच्या प्रवाहामुळे देवस्थान प्रसिद्ध पावतं, कोटी-कोटीची उड्डाणं घेऊ लागतं, स्पर्धा-चढाओढ-ताबा मिळण्यासाठीची धडपड अशा मानवी वृत्ती-प्रवृत्तींचा खेळ तिथे सुरू होतो. देवाच्या नावाने बरंच काही घडू लागतं. या सार्‍याचे व्यापक, सामाजिक-राजकीय परिणामही घडू लागतात. हे सारं कसं होतं याचा महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांचा अभ्यास करून घेतलेला शोध.

Book Details

ADD TO BAG