-
Walking On The Edge (वॉकिंग ऑन द एज)
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांवर प्रेम करणारा एक भटक्या. त्याने ध्यास घेतला, सह्याद्री घाटमाथ्याच्या धारेवरून उभा महाराष्ट्र चालत जायचं, उत्तरेहून दक्षिणेकडे. कडेकपारीतले तब्बल हजार किलोमीटर ! हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी तो ७५ दिवस एकट्याने चालत राहिला. रोज २०-२५ किलोमीटरची तंगडतोड केल्यावर जे गाव लागेल तिथे मुक्काम करायचा, जे घर आस्थेने विचारपूस करेल तिथे राहायचं आणि जे पानात वाढलं जाईल ते खायचं. रात्री पाठ टेकायची, की दुसऱ्या दिवशी पुन्हा पुढचा प्रवास सुरू. अशा पायपिटीची ही गोष्ट. या भ्रमंतीत जसं सह्याद्रीचं रौद्र रूप सामोरं आलं, तसंच दऱ्याखोऱ्यांमध्ये- पठारांवर राहणारी माणसं आणि त्यांच्यातली माणुसकी भेटली. त्याच वेळी रोजच्या अनिश्चिततेमुळे मनात खोलवर दडून बसलेल्या भीतीशीही सामना करावा लागला. पठाराचा काठ आणि आव्हानं अशा दोन्ही अर्थाने 'एज्'वरून केलेल्या भटकंतीतल्या अनुभवांची ही शिदोरी.. बॉकिंग ऑन द एज्.
-
Navi Pidhi Navya Vata (नवी पिढी नव्या वाटा )
प्रकाशवाटा' या पुस्तकात आमच्या पिढीने भामरागडच्या जंगलात अंधाराकडून प्रकाशाकडे कशी वाटचाल केली याची गोष्ट मी सांगितली होती. 'नवी पिढी, नव्या वाटा'मध्ये गोष्ट आहे त्यानंतरच्या भरारीची. आदिवासींना सजग, सक्षम आणि सुदृढ बनवण्याचं बाबा आमटेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उचललेल्या पुढच्या पावलांची. दिगंत-अनघा, अनिकेत - समीक्षा यांनी सोबतीला नवे कार्यकर्ते घेऊन हेमलकशातल्या 'लोकबिरादरी' प्रकल्पाचं काम वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. या सर्वांना एकदिलाने काम करताना बघून आम्हा जुन्या कार्यकर्त्यांचं मन समाधानाने भरून येतं. प्रकल्पाच्या भवितव्याची आता तीळमात्रही काळजी नाही. - डॉ. प्रकाश आमटे
-
Laingiktevar Bolu Kahi (लैंगिकतेवार बोलू काही)
लैंगिकता किंवा सेक्स हा विषय माणसाला अनादि काळापासून व्यापून आहे. या विषयाबद्दल सर्वांनाच प्रचंड उत्सुकता असते; पण त्याबद्दचं ज्ञान फारच कमी असतं. माणसाचं लैंगिक वर्तन जसं असतं तसं ते का असतं, लैंगिक वर्तनाची उत्क्रांती कशी होत गेली आहे, आदिम समाजांमध्ये लैंगिकतेकडे कसं पाहिलं जात होतं, जगभरात या विषयाबाबत कोणते समज-अपसमज-अंधश्रद्धा प्रचलित आहेत, त्या अंधश्रद्धांबद्दल समाजशास्त्रज्ञांच-लैंगिक तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे, या विषयात कोणकोणती संशोधनं झाली आहेत याचा आढावा घेणार पुस्तक. ज्येष्ठ विज्ञान लेखक निरंजन घाटे यांनी त्यांच्या व्यासंगाच्या आधारे लिहिलेलं.
-
Ghost Writer Ani Itar Vidnyankatha (घोस्ट रायटर आण
विज्ञान संशोधनाची नवनवी क्षेत्रं विकसित होत असताना विज्ञानकथा लेखनानेही नव्या कल्पना धुंडाळाव्यात, अशी अस्सल विज्ञानप्रेमी वाचकांची अपेक्षा असते. या संग्रहातल्या कथा ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करतात. विज्ञानकथावाचनाची आपली इयत्ता वाढवतात. माणूस नव्या तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक अधीन होत असताना क्षणभर थांबून त्याच्या योग्यायोग्यतेवर विचार करण्याची गरज अधोरेखित करणाऱ्या विज्ञानकथा.
-
Devachya Navan (देवाच्या नावानं)
श्रद्धाळू माणूस मनातल्या आस्थेपोटी देवदर्शनाला जात असतो. कुठल्याश्या मंदिरात जावं, दोन-चार तास थांबावं, मनोमन प्रार्थना करावी, यथाशक्ती देणगी द्यावी आणि सुखासमाधानाच्या आशेने घरी परतावं, असा त्यांचा नित्यनेम असतो. मात्र त्याच्या या छोट्याशा कृतीमुळे देवस्थान नावाचा एक भला थोरला डोलारा उभा राहतो, याची त्याला कल्पनाही नसते. प्रत्यक्षात त्याच्यासारख्या हजारो भक्तांच्या प्रवाहामुळे देवस्थान प्रसिद्ध पावतं, कोटी-कोटीची उड्डाणं घेऊ लागतं, स्पर्धा-चढाओढ-ताबा मिळण्यासाठीची धडपड अशा मानवी वृत्ती-प्रवृत्तींचा खेळ तिथे सुरू होतो. देवाच्या नावाने बरंच काही घडू लागतं. या सार्याचे व्यापक, सामाजिक-राजकीय परिणामही घडू लागतात. हे सारं कसं होतं याचा महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांचा अभ्यास करून घेतलेला शोध.