Trump 101 (ट्रम्प 101)
‘‘न आवडणार्या गोष्टी करण्यात तुमचं आयुष्य वाया घालवू नका; तुमची महत्त्वाकांक्षाच तुम्हाला सर्वोत्तम काम करायला प्रवृत्त करेल.’’ ‘‘मला अशी लोकं माहिती आहेत ज्यांच्याकडे कल्पना तर विलक्षण असतात, परंतु ते त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवू शकत नाहीत. कारण कृती करण्यात ते मागे पडतात. त्यांना वाटतं की आपली कल्पना आपोआपच झेप घेईल आणि प्रत्यक्षात उतरेल. तर काही जण मला किती चांगली कल्पना सुचली या आनंदातच हरवून जातात आणि कृती करत नाहीत. मी तुम्हाला निक्षून सांगेन की, फक्त कल्पना ही काहीच कामाची नसते. तर त्यावर कृती करणंच आवश्यक असतं. कृती करण्याची प्रेरणा आणि उत्साह तुमच्याकडे नसेल तर तुमची महान आयडिया तुमच्या टेबलावर किंवा तुमच्याकडेच पडून राहील, प्रत्यक्षात कधीच उतरणार नाही. कृती करण्याची जिद्द, पॅशन नसणं हाच यश आणि अपयश यामधील फरक असतो.’’