You Happier (यू हॅपिअर)
न्यूयॉर्क टाईम्सचे बेस्टसेलिंग लेखक डॉ. डॅनिअल आमेन यांनी न्यूरोसायन्सच्या सात रहस्यांचा उलगडा केला आहे. या रहस्यांच्या माध्यमातून एखादी व्यक्ती 30 दिवसांमध्ये 30 टक्के जास्त आनंदी राहू शकते. तुमचं वय किती आहे, तुमची वाढ कशा पद्धतीने झाली आहे, तसंच तुमची आनुवंशिक वैशिष्ट्ये किंवा तुमचा वर्तमान कसाही असला तरीही ही रहस्यं तुम्हाला आनंदी राहण्यात मदत करतात. b. आनंद हे मेंदूचं कार्य आहे. जर मेंदू निरोगी असेल तर आयुष्य आनंदाने जगता येऊ शकतं. डॉ. आमेन यांनी 155 देशांमधील 200000 पेक्षाही जास्त मेंदूंच्या स्कॅन्सचा अभ्यास केला. त्या अभ्यासाद्वारेच त्यांनी आनंदासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या मेंदूच्या पाच प्राथमिक प्रकारांचा आणि न्यूरोसायन्समधील सात रहस्यांचा शोध लावला. ‘यू हॅपिअर’मध्ये त्यांनी याची सविस्तर माहिती दिली आहे. तुम्ही आनंदी होण्यासाठी यात काही शास्त्रशुद्ध आणि व्यावहारिक उपाय सांगितले आहेत. जसे की : 1) तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार तुमच्या मेंदूचा प्रकार कसा ओळखायचा आणि स्वतःसाठी उपयुक्त असलेले आनंदी होण्यासाठीचे उपाय कसे करायचे 2) स्वतःची मनःस्थिती सतत चांगली ठेवण्यासाठी स्वतःच्या मेंदूचे सर्वांगीण आरोग्य कसे सुधारायचे 3) मेंदूत सुरू असणाऱ्या गोंधळापासून स्वतःला वेगळे करून स्वतःच्या आनंदाचे रक्षण कसे करायचे 4) स्वतःच्या आनंदात वाढ करण्यासाठी घ्यायचे सात सोपे निर्णय आणि विचारायचे सात प्रश्न कोणते c. स्वतःचा आनंद सतत कायम ठेवणं हा एक रोज चालणारा प्रवास आहे. ‘यू हॅपिअर’मध्ये डॉ. आमेन तुम्हाला न्यूरोसायन्सवर आधारित काही सवयी, पद्धती आणि पर्यायांबद्दल सांगतात. यामुळे तुमची मनःस्थिती तर चांगली राहतेच, शिवाय तुम्ही रोज स्पष्टपणे ठरवलेली मूल्ये, उद्देश्य आणि ध्येयांवर आधारित आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होते.