Shaheed Bhagat Singh Yanchi Jail Dairy (शाहिद भगत
या डायरीमध्ये भगतसिंह विविध विषयांना हात घालतात आणि प्रत्येक मुद्द्याची तर्कसंगत मीमांसा करतात. मानवाच्या उत्पत्तीपासून, कुटुंबसंस्था तयार होण्यापासून ते राज्यसंस्थेच्या उगमापर्यंत, सामंतशाहीच्या उदय आणि पाडावापासून ते साम्राज्यवाद आणि भांडवलदारांच्या वर्तमानापर्यंत, धर्माच्या विवेचनापासून ते नास्तिकतेच्या तर्कापर्यंत, गुलामगिरीपासून क्रांती आणि अराजकतेच्या भीतीपर्यंत, कायद्याच्या अभ्यासापासून ते मृत्युदंडाच्या शिक्षेपर्यंत आणि फ्रेंच राज्यक्रांतीपासून रशियन राज्यक्रांतीपर्यंत, प्लेटो-सॉक्रेटिसच्या तत्त्वज्ञानापासून बर्ट्रान्ड रसेलच्या चिकित्सेपर्यंत ते सर्व मुद्द्यांचा अभ्यास करताना दिसतात. समाजातील स्त्रियांची दयनीय अवस्था, बालकामगारांची समस्या, तुरुंगातील एकाकीपणा, मातृभूमीसाठी केलेल्या बलिदानांचे महात्म्य या सर्व विषयांवर त्यांनी भरभरून लिहिले आहे.