Manoj Bajpeyee - Jidda Kahi Milavnyachi (मनोज बाजप
प्रत्येकासाठी नायक झालेला 'फॅमिली मॅन' ! मनोज बाजपेयी यांच्याविषयी खूप काही लिहिलं गेलं आहे; पण या मुरलेल्या कलाकाराच्या आयुष्याचे अनेक पैलू आजही अपरिचित आहेत. कुणीही गॉडफादर नसताना या कलाकारानं बॉलिवूडमध्ये केवळ स्वतःचं स्थानच निर्माण केलं नाही, तर आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपट समीक्षकांना आपलं श्रेष्ठत्व मान्य करायला भाग पाडलं. मनोज बाजपेयी आज स्वतःच अभिनयाची कार्यशाळा झाले आहेत. खास त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची पावलं चित्रपटगृहांकडे वळू लागली आहेत. 'मनोज बाजपेयी' ही त्यांच्या वडलांच्या गावाची बेलवाची मुख्य ओळख झाली आहे. गँग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटातील त्यांच्या देशी रूपानं एक इतिहास घडवला आहे; तर सत्या, राजनीती आणि अलीगढ अशा चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून मनोज बाजपेयींशी संबंधित असलेले वरिष्ठ पत्रकार पीयूष पांडे यांनी लिहिलेलं हे चरित्र म्हणजे मनोज बाजपेयींच्या जिद्दीची, धडपडीची कथा आहे. रोचक किस्से सांगत लिहिलेलं हे चरित्र मनोज बाजपेयींना जाणून घेण्यासाठी आणि त्यांचा सिनेप्रवास समजून घेण्यासाठी आवश्यक पुस्तक आहे.