Tuzi Katha-Maze Shabda (तुझी कथा-माझे शब्द)

By (author) Mahadev More Publisher Mehta Publishing House

शेतातील पिकांचं नुकसान करणार्‍या गायरांनी गावातल्या तरुणांच्या मेहनतीवर फिरवलेला बोळा...गॅरेजमालक वसंत मेस्त्री, त्याच्याच गॅरेजमध्ये काम करणारे शंकर आणि सद्या, मेस्त्रीची ठेवलेली बाई शारी, शारीचा निष्क्रिय नवरा इ. व्यक्तींचं दिशाहीन जीवन...एका विहिरीवर उलगडणारे काही लोकांच्या जीवनाचे तुकडे...त्याच्या आणि तिच्या प्रेमाची रखरखीत, अनिश्चित वाट...नवर्‍याला सोडून आलेली, दत्तूबरोबर लग्नाशिवाय राहणारी, दत्तूच्या मृत्यूनंतर कुणाचा तरी हात धरून पळून जाणारी काशी...विजूबरोबर प्रेमबंध निर्माण होऊ पाहत असतानाच कमलबरोबरच्या चोरट्या भेटीगाठींचं स्मरण होऊन स्वत:ला सावरणारा तरुण...पाळण्यातच लग्न लागलेलं असल्याने मनाला भावलेल्या तरुणाला नकार देणारी हौसा...दोनदा प्रेमभंग झालेल्या तरुणाला त्याच्या वाग्दत्त वधूच्या संदर्भात एक निनावी पत्र मिळतं...मानवी मन आणि जीवन यांचं वास्तव, तरल चित्रण करणार्‍या कथांचा भावस्पर्शी संग्रह

Book Details

ADD TO BAG