Rajani Te Rajiya (रजनी ते रजिया)

By (author) Rajiya Sultana Publisher Manovikas

आत्मकथन लिहिणं ही लेखकाला एक प्रकारची शिक्षाच असते, स्थिरावलेलं आयुष्य ढवळून काढावं लागतं. हे जखमेवर मीठ चोळणंच असतं. सुखद आठवणींचं काही वाटत नाही, दु:खाची बेरीज-वजाबाकी करतांनी मात्र वेदनांचा आकडा पार होतो. ‘संसारसंन्यासी’ नवर्‍याबरोबर मी गेली कित्येक वर्षं राहते आहे. मनाचा खूप कोंडमारा होतो. पण त्यावर मात करत जिद्दीने मी माझा अस्तित्व आणि अस्मितेचा लढा लढले. वेदनांचं भांडवल नाही, पण संकटं आली तरी स्त्री आयुष्यात ठामपणे उभी राहू शकते, हे मला दाखवून द्यायचं आहे. त्यात कार्यकर्ती म्हणून माझं क्षेत्रही असंच, जे सहजासहजी कोणी स्वीकारत नाही. महिलांच्या लैंगिक अधिकारांबरोबरच सेक्सवर्कर, कैदी, किन्नर, समलिंगी यांच्या मानवाधिकारावर काम करतांनी जखमही माझीच नि उपचारही माझेच! हे सगळं आयुष्य कोणताही आडपडदा न ठेवता मी या पुस्तकात कथन केलं आहे.

Book Details

ADD TO BAG