Tumachi Mule-Pratibhasampann Bale (तुमची मुले-प्रत
हुशार, गुणी मुल हवे असे प्रत्येक आईवडिलांना वाटत असते, पण यासाठी पण यासाठी मुलांचे संगोपन योग्य पद्धतीने होते कि नाही, हे पाहणे आवश्यक ठरते. कारण स्वतःच पालनपोषण जसे झाले त्यानुसार मुलांना वाढवले जाते. यात मुलांच्या विकासाकडे दुर्लक्ष होते. असे होऊ नये व बौद्धिक, मानसिक विकास पुरेपूर होऊन तेजस्वी मुलांच्या निर्मितीसाठी काय करावे, याविषयी वनराज मालवी यांनी 'तुमची मुले प्रतिभासंपन्न बाळे' या पुस्तकातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या प्रारंभिक काळातील शिक्षण हे त्याला आयुष्यभर पुरणारे असते. जन्मानंतर अठरा महिने, बाळाच्या जीवनाचे पहिले सहा महिने, एक ते दीड वर्ष या काळात त्याची ग्रहणशक्ती अफाट असते. त्याचा वापर करून वाचनक्षमता, अंक ओळख, दुसऱ्या भाषेचे शिक्षण, विज्ञानाची गोडी मुलांना लावणे, त्यांना पूरक, पोषक वातावरण उपलब्ध करून देणे पालकांच्या हातात आहे. त्या दृष्टीने मुलांना वाढविल्यास प्रत्येक मुल प्रतिभासंपन्न होईल, हे निश्चित.