Pashchimatya Samajshastradnya (पाश्चिमात्य समाजशास
समाजशास्त्रीय सिद्धांत व सिद्धांतकार यांच्या अभ्यासाला समाजशास्त्रात खूप महत्त्व आहे. त्यांनी मांडलेल्या संज्ञा, संकल्पना, सिद्धांत व दृष्टिकोन या सर्वांची अभ्यासकांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. समाजशास्त्रातील लहानात लहान संज्ञा असो वा वापरलेले शब्द असो ते यादृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात. समाजशास्त्राच्या प्रारंभीच्या बांधणीत ज्या समाजशास्त्रज्ञांनी योगदान दिले त्या काहींचा येथे समावेश केला आहे. ज्यामध्ये ऑगस्त कॉम्त, कार्ल मार्क्स, हर्बर्ट स्पेन्सर, ए. आर. रॅडक्लिफ ब्राऊन, एमिल डर्कहेम, मॅक्स वेबर, टॉलकॉट पार्सन्स आणि रॉबर्ट मर्टन या विचारवंतांचा समाजशास्त्राला शास्त्राचा दर्जा देण्यात मोलाचा वाटा आहे. अनेक अभ्यासक व शास्त्रज्ञांनी अनेक संज्ञा, संकल्पना, सिद्धांत व दृष्टिकोनांची मांडणी करून या विषयाला लोकप्रिय बनविले. समाजशास्त्र या विषयाची आवश्यकता लक्षात घेत आज जगभरातील लाखो अभ्यासक, विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ अध्ययन करीत आहेत ही एक महत्त्वाची बाब आहे. ‘पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ’ या अभ्यासपूर्ण ग्रंथामध्ये जगभरातील काही महत्त्वाच्या समाजशास्त्रज्ञांच्या सिद्धांताचे विस्ताराने विश्लेषण करण्यात आले आहे, ज्याचा फायदा विद्यार्थी, अभ्यासक व प्राध्यापक या सर्वांना निश्चितच होईल असा आम्हाला विश्वास वाटतो.