Jwel Thief (ज्वेल थीफ)

सकाळी साडेसात वाजता तो उठला. तोसुद्धा धडधडा जिना चढल्याच्या आवाजाने. बघतो तो पेनेलपी धावत त्याच्याकडे येत होती. 'पपा, पपा, हिरा चोरीला गेलाय !' ती किंचाळली. 'काय वेड लागलंय का तुला ?' 'अहो, खरंच सांगते, गेलाय. अजिबात दिसत नाहीये तिथे तो. कसा गेला, कुठे गेला, कुणी नेला, कुणालाच माहिती नाही.' तिनं त्याला रेचेलच्या सिटिंग रुममध्ये ओढत नेलं. बेडरुमच्या दरवाजातच ती उभी होती. तिचा चेहरा पांढराफटक पडला होता. तिच्या इंडियन कॅबिनेटचे दोन्ही दरवाजे सताड उघडे होते. त्यातला एक ड्रॉवरही बाहेर खेचलेला होता. 'हे खरं आहे, मिस ?' बेटरएजने विचारलं. तिनं निर्जीवपणे मान हलवली. 'होय, तो हिरा गेलाय !' हे बोलून ती बेडरुममध्ये गेली आणि तिनं दरवाजा आतून घट्ट बंद करुन घेतला.

Book Details

ADD TO BAG