Vyavasay Sutra (व्यवसाय सूत्र)
व्यवसाय व्यवस्थापनातील भारतीय दृष्टिकोनास अधोरेखित करणाऱ्या या पुस्तकात नेतृत्व प्रशिक्षक आणि पौराणिक कथांचे अभ्यासक देवदत्त पट्टनायक यांनी या विषयातील वस्तुनिष्ठतेच्या दिखाव्यास बाजूला सारले आहे. पाश्चिमात्य श्रद्धांमध्ये रुतलेले आधुनिक व्यवसाय व्यवस्थापनाचे निकष, त्यातील उद्दिष्टपूर्तींबाबत त्यांची असलेली कठोर आसक्ती आणि भागधारकांचे वाढते महत्त्व हे देवदत्त यांनी या पुस्तकात विस्तृत मांडलेले आहे. उलटपक्षी, व्यवसाय करण्यातील भारतीय पद्धत – जी भारतीय पौराणिक कथांमध्ये तर दिसून येते, पण प्रत्यक्ष व्यवस्थापनात मात्र तिचा उपयोग केला जात नाही – ही पद्धत कशारीतीने सर्वसमावेशकतेचा पुरस्कार करणारी आहे, सापेक्षता आणि वैविध्य बाळगणारी आहे आणि ध्येयपूर्तीतीच्या प्रत्येक स्तरावरील सर्वंकष यशप्राप्तीचा ती कशा प्रकारे विचार करते, हे विशद केलेलं आहे.