Dapur te Delhi (दापूर ते दिल्ली)
एकनाथ आव्हाड हे सिद्धहस्त बालसाहित्यकार असून साहित्यातील अतिशय प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार - २०२३ त्यांना मिळाला आहे. त्यांची पुस्तके मुलांबरोबरच शिक्षक आणि पालकांसाठी अतिशय मनोरंजक, उपयुक्त आणि ज्ञानवर्धक आहेत. आव्हाड यांचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील दापूर हे असून त्यांच्या बालपणात डोकावून पाहिले तर एक होतकरू, परिस्थितीवर मात करणारा मुलगा, खाऊच्या पैशात किंवा भाजी विकून मिळालेल्या पैशात पुस्तके विकत घेऊन वाचणारा, गुरुजनांचा लाडका विद्यार्थी ते पुढे मुलांचे आवडते बालसाहित्यकार, कथाकथनकार अशा अनेक रूपांनी आव्हाड वाचकांना भावणारे आहेत. त्यांच्या बालसाहित्यावर दिल्ली दरबारी साहित्य अकादमीची मोहर उमटली, ही आम्हा वाचकांसाठीसुद्धा आनंदाची गोष्ट ठरली. एकंदरीतच दापूर ते दिल्ली असा उल्लेखनीय प्रवास करणाऱ्या आव्हाड यांच्या लेखनाचा आवाका जाणून घेण्यासाठी, त्यांच्या पुस्तकांची अधिक माहिती होण्यासाठी तसेच त्यांचा साहित्यप्रवास आपल्या सर्वांसमोर एकत्रितपणे मांडण्यासाठी केलेला अभ्यासपूर्ण प्रयत्न म्हणजे हे पुस्तक होय.