Sange geeta (सांगे गीता)
* या पुस्तकात प्रत्येक अध्यायाचा गद्यात आणि पद्यात आशय मांडण्याचा, तोही प्रभावीपणे मांडण्याचा उपक्रम आशा भिडे यांनी 'सांगे गीता' या आपल्या पुस्तकात केला आहे. गीतेच्या जीवनोपयोगी तत्त्वज्ञानाचा तळागाळापर्यंत प्रचार नि प्रसार व्हायला हवा, या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी हा ग्रंथ लिहिला आणि त्याचबरोबर गीता प्रवचनाचा उपक्रमही आरंभला आहे. - लोकसत्ता * घरातल्या सर्वांसाठी 'गीता' तीही साध्या सरळ भाषेत सहज सुलभपद्यात व गद्यात लिहिण्याचे मोलाचे कार्य आशा भिडे यांनी केले आहे. मूळ गीतेशी प्रामाणिकपणा राखून पद्याची शब्द रचना करणे कठीण असते. परंतु आशा भिडे यांना ते सहज जमून गेल्याचे दिसते. गीता आधीचे पूर्वसूत्र व निवेदनही रसपरिपोषक व गीता इतकेच समर्पक आहे. गीता नंतर गीतेवर केलेले भाष्यही वाचनीय आणि मार्गदर्शक आहे. - तरुण भारत * 'सांगे गीता' या पुस्तकात लेखिका आशा भिडे यांनी अध्यायामधला मुख्य आशय गीतरुपाने मांडला असून नंतर सूरस विवेचन केले आहे. इतर देशात भगवंतांचे प्रेषित येतात पण आपल्या भारत देशात भगवंतच अवतरतात या सूत्राला अनुसरून संपूर्ण महाभारतातील श्रीकृष्णाचे गीतापर्व उलगडून दाखवले आहे. व यात नवसंजीवनी देणारे गीता तत्त्वज्ञान हे गीतासूक्त आपल्या अंतविश्वात चैतन्य निर्माण करणारे आहे. नवशक्ती ★ गीतेवर आजपर्यंत अनेक लेखकांनी लिहिले आहे. आशा भिडे यांचे सदर लेखन ही या गीता साहित्यातील महत्त्वाची भर म्हणावी लागेल. विनोबांनी गीताईतून समश्लोकी भाषांतर केले. त्यानंतरही इतरांनी असे भाषांतर केले परंतु अध्यायाचे सार सांगणाऱ्या कविता आजवर वाचनात नव्हत्या. म्हणूनच या कविता हा या ग्रंथाचा विशेष आहे. प्रत्येक गीता प्रेमी वाचकांच्या संग्रहात व शैक्षणिक ग्रंथालयात हा ग्रंथ असायलाच हवा. सन्मित्र * 'सर्व घराघरांसाठी, घरातील सर्वांसाठी' असे एखाद्या जाहिरातीत यावे तसे, परंतु अत्यंत सार्थपणे तसेच असणारे पुस्तक ही आजच्या काळाची गरज आहे. या लेखनाची आधीच्या कोणत्याही लेखनाशी तुलना करू नये. ज्ञानेश्वरी, गीताई यांचे मोठेपण मान्य असले तरी, म्हणूनच 'सांगे गीता'चे यथार्थ प्रकाशन झाले. सामाजिक प्रबोधनाचा योग्य मार्ग चोखाळला गेलाय, त्याबद्दल लेखिका आणि प्रकाशकांचे अभिनंदन - ललित