Kay Khau Kiti Khau (काय खाऊ किती खाऊ)
कुठल्याही आजारासाठी उपचारासोबत योग्य तो आहार घेणे अतिशय आवश्यक असते. ह्या त्यांच्या पुस्तकात पचनसंस्थेचे आजार, हृदयविकार व मधुमेह, कावीळ, अतिसार, अतिआम्लता, जीवनसत्त्वे व खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे आजार, गाऊट, मूतखडे, हायपोथायरॉयइडीझम, गरोदरपणातील व स्तनपानाच्या वेळेस योग्य असा आहार, विविध वायोगटातील व्यक्तींसाठी आहार, परीक्षार्थी मुलांसाठीचा आहार व बाजारात मिळणारी प्रथिनांची उत्पादने अशा इतर अनेक आहाराशी निगडीत विषयावर विस्तृत माहिती आहे. या पुस्तकात डॉ. वैशाली जोशी या आहारतज्ज्ञ डॉक्टरांनी अनेक महत्त्वाच्या आहारविषयक प्रश्नांना साध्या व सोप्या भाषेत मुद्देसूद उत्तरे दिली आहेत. पुस्तकाचे प्रथम जाणविणारे वैशिष्ट्य म्हणजे अनेकाविद्य विषयावरील आहारविषयक माहितीचा समावेश. वजन घटविणे, हृदयविकार, बद्धकोष्ठता अशा नेहेमी विचारणा होणाऱ्या विषयांबरोबरच परीक्षार्थीनी काय खावे, मांसाहार कसा असावा, रोजोनिवृत्ती नंतरचा आहार अशा विविध विषयावर डॉ. वैशाली जोशींनी विचार मांडले आहेत. इतक्या विविध विषयावर एकाच पुस्तकातून माहिती दिल्याबद्दल डॉ. वैशाली जोशींचे अभिनंदन करावयास हवे.