-
Pratibhecha Indradhanu (प्रतिभेचा इंद्रधनू)
कल्पनाशक्ती ही दैवी देणगी नसून, तिला विज्ञानाचा आधार आहे, हाच विषय चर्चिला गेला आहे ‘प्रतिभेचा इंद्रधनू’ या पुस्तकातून. सुबक वैज्ञानिक प्रयोग आणि अभ्यासांतून, हा विषय स्पष्ट केला आहे. शिवाय, वास्तव जगात क्रिएटिव्हिटीचे पडसाद कसे उमटतात, बॉब डिलनची लिखाणाची पद्धत आणि कवींच्या अमली पदार्थांच्या सवयी, रसायनशास्त्रज्ञासारखा विचार करणारा बार टेंडर, ऑटिस्टिक असलेला भन्नाट सर्फर, अशक्यप्राय वाटणाऱ्या समस्या सोडविणारी वेबसाईट, पिक्सार स्टुडिओजच्या पडद्यामागच्या गमती याकडेही लक्ष वेधलं आहे. यो-यो मा ‘इम्प्रूव्हाइज’ कसं करतो आणि सतत नवनवीन कल्पनांना वास्तवात आणणाऱ्या कंपन्यांचं गुपित काय, याचंही विवेचन केलं आहे. न्यूरॉन ते घासूनपुसून तयार झालेली सिम्फनी आणि मेंदूतलं सर्किट ते एखादं यशस्वी प्रॉडक्ट– यादरम्यान असलेले असंख्य पदर या पुस्तकातून उलगडून दाखवले आहेत.
-
Cheharyamagchi Reshma (चेहऱ्यामागची रेश्मा)
सतरा वर्षांच्या नाजूक देखण्या रेश्मा कुरेशीला तिच्या एका नातलगानं भर रस्त्यात पकडून जमिनीवर पाडून तिच्या चेहऱ्यावर अॅसिड ओतलं. जिवंत प्रेताप्रमाणे काही क्षणांतच तिचं शरीर जळू लागलं. पण ते अॅसिड तिच्या हृदयातील जगण्याची ठिणगी मात्र विझवू शकलं नाही. दुर्दैवाच्या गर्तेतून रेश्माने झेप घेतली ते थेट जागतिक सन्मानाच्या पातळीवर. न्यू यॉर्क फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक करणारी, अॅसिड हल्ल्यातून वाचलेली पहिली मुलगी म्हणून तिचं नाव जगभरात गाजलं. रेश्माच्या जिद्दीची प्रेरणादायी आणि सकारात्मक जीवनसंदेश देणारी ही कहाणी.
-
Aahe Kattar Tari (आहे कट्टर तरी)
धार्मिक मूलतत्त्ववादाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात ‘द गुड मुस्लिम’ची कथा आकार घेते. सोहेलच्या जीवनात एक बलात्कारपीडित महिला येते आणि अचानक गायब होते. त्याची डॉक्टर बहीण माया युद्धपीडित महिलांवर उपचार करत असते. जेव्हा दशकभरानंतर ती घरी परतते तेव्हा सोहेल त्याच्या क्रांतिकारक आदर्शांपासून दूर गेल्याचे तिच्या लक्षात येते. युद्धात नवरा मारला गेलेल्या सिल्व्हीशी त्याने केलेला विवाह, तिच्या धार्मिक गोष्टींचा सोहेलवर पडलेला प्रभाव, तिच्यापासून झालेल्या सोहेलच्या झैदी या छोट्या मुलावरही कडव्या धर्मांधतेचा असलेला अंमल, सिल्व्हीच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर सोहेलचा झैदला मदरसामध्ये पाठवण्याचा निर्णय, यातून बहीण-भावामध्ये उभा राहतो संघर्ष, त्यात मायाच्या आईला झालेला कॅन्सर. जॉय हा सोहेलचा मित्र मायाशी लग्न करू इच्छितो. या सगळ्या परिस्थितीत माया जॉयशी लग्न करते का? झैदचं काय होतं? युद्धाच्या पार्श्वभूमीवरील एक जबरदस्त कादंबरी.
-
Twelve Red Herrings (ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज).
तुरुंगात खितपत पडलेल्या एका कैद्याची खात्री असते की, ज्याच्या खुनाचा त्याच्यावर आरोप आहे, तो माणूस जिवंत आहे... एक चंचल सुंदरी चतुराईनं नवरा आणि नवीन धनिक सावजाकडून वाढदिवसाची भेट मिळवते... वडिलांच्या सांगण्याप्रमाणे नौकानयनपटूने बोटक्लब हाउसला भेट म्हणून दिलेल्या ऐतिहासिक वस्तूचीच चोरी होते... कथा-कादंबरी लेखकाला स्तंभलेखन करणारा त्याचा मित्र भोजनादरम्यान जी कल्पना ऐकवतो त्यावर लेखकाने आधीच कादंबरी लिहिलेली असते... एक धोकादायक वाटणारा माणूस एका महिला-ड्रायव्हरचा हायवेवर पाठलाग करतो... एका तरुण कलावतीला आयुष्यातली सर्वांत मोठी संधी मिळते... चतुर मांडणी, अनोखी व्यक्तिमत्त्वं, कल्पक कथानक आणि अनपेक्षित शेवट असलेल्या बारा कथांचा संग्रह ‘ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज.’
-
Aage Badho (आगे बढो)
नॅट अर्थात बो-डिचची ही जीवनकहाणी. लहानपणापासूनच गणित विषयाच्या आवडीमुळे त्याच्यात हार्वर्ड विद्यापीठात शिकून पदवी मिळवण्याची इच्छा रूजलेली. पण घरच्या परिस्थितीमुळे त्याला शाळा सोडावी लागते. जहाजावर हिशेबनीस म्हणून काम करताना सागरी प्रवासाच्या अनुभवविश्वाशी नॅटची ओळख होते. या प्रवासात त्यानं मिळवलेलं ज्ञान आणि त्याची अपार इच्छाशक्ती त्याला त्याच्या इच्छित साध्यापर्यंत पोहोचवते. नौकानयन शास्त्रात नॅटनं केलेल्या विलक्षण कामाचा हा एक अर्थी साहित्यिक दस्ताऐवजच होय.
-
Eka Lalasene (एकालालसेने)
तीन मुलांची आई असलेली स्त्री लग्नापूर्वीच्या तिच्या प्रियकराबरोबर संबंध ठेवून आहे, तिच्या तरुण मुलीला आईचा हा व्यभिचार बघवत नाही...एक नेपाळी नोकर ज्या कुटुंबात काम करत असतो, त्या कुटुंबातील चौघांचा खून करून पळून जातो आणि कसं बदलतं त्याचं जीवन... धरणाच्या बांधकामाच्या एका साइटवरच्या कंत्राटदाराच्या मनामध्ये एका आदिवासी स्त्रीबद्दल जबरदस्त लालसा निर्माण होते, तो तिला घरी आणून आपल्या निगराणीखाली ठेवतो – ती `दुसऱ्याची बायको` असते तरी. अभिलाषा, जवळीक व प्रेमावर आधारित, मनोव्यापाराचे सूक्ष्म विभ्रम दर्शविणाऱ्या आणि भारताच्या विविध भागांत घडणाऱ्या वेगवेगळ्या प्रांतांतील वैशिष्ट्यांचा, सामाजिक रूढी-परंपरांचा अचूक मागोवा म्हणजे ‘एका लालसेने’ हा कथासंग्रह.
-
Anup
‘अनू’प ही विलक्षण आत्मकथा आहे अनू अगरवाल यांची. दिल्लीहून मुंबईला आलेल्या अनूचं अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय मॉडेल बनणं...पहिल्याच `आशिकी` या सुपरडुपरहिट चित्रपटाद्वारे रातोरात `स्टार` बनणं...त्यानंतर ग्लॅमरचा त्याग करून योगाश्रमात राहणं... तिथून मुंबईला परत आल्यानंतर दुर्दैवी कार अपघात होणं... कोमात गेलेल्या आणि छिन्नविच्छिन्न झालेल्या अनू पुन्हा बऱ्या होणं... त्यांनी परत आत्मशोधासाठी सज्ज होणं... संन्यास घेणं आणि त्यानंतर मुंबईत योगाचे धडे द्यायला लागणं... अनू यांच्या आत्मशोधाची... मृत्यूचा उंबरठा शिवण्याच्या अनुभवाची आणि पुन्हा जीवनरसानं फुलणाऱ्या चमत्काराची ही कहाणी.
-
UTTARKAND (उत्तरकांड)
‘उत्तरकांड’ ही रामायणावर आधारित कादंबरी साकारली आहे सीतेच्या प्रथमपुरुषी निवेदनातून.. त्यामुळे रामायणातील घटना/प्रसंग तिच्या दृष्टिकोनातून उलगडतात. रामाची पत्नी म्हणून तिच्या वाट्याला जे भोग आले, त्याचं मनोविश्लेषणात्मक चित्रण या कादंबरीत केलं गेलं आहे. त्यामुळे राम-सीता-लक्ष्मणाबरोबरच रामायणातील अन्य व्यक्तिरेखाही पारंपरिक चौकट भेदताना दिसतात. सीतेच्या प्रथमपुरुषी निवेदनामुळे या कादंबरीत नाट्य निर्माण झालं आहे. या कादंबरीमुळे रामायणाचा एक नवा अन्वयार्थ समोर येतो.
-
PIZZA TIGER
टॉम मोनाघन... डॉमिनोज पिझ्झा या आज जगभर विस्तारलेल्या पिझ्झाच्या फास्ट फूड साखळीचा संस्थापक... टॉमचं कष्टमय बालपण... ‘मरिन कोअर’मधील निवृत्तीनंतर झालेली आर्थिक फसवणूक... त्याच्या भावाने आणलेला पिझ्झा स्टोअर चालवण्याचा प्रस्ताव... हा व्यवसाय करतानाही अनंत अडचणींचा करावा लागलेला सामना... मात्र, त्या अडचणींना तोंड देत सुरू केलेलं पिझ्झा स्टोअर... त्यातून एका मोठ्या पिझ्झा-साखळीची झालेली निर्मिती...दर तीन तासांनी जगात कुठेतरी सुरू होणारी ‘डॉमिनोज’ची शाखा... अशा प्रकारे जगभर झालेला विस्तार... तर अशी आहे टॉमची यशोगाथा ‘पिझ्झा टायगर’... प्रेरणादायक आणि वाचनीय