-
Purvasandhya (पूर्वसंध्या)
गोंदण, अनोळख, जन्मजान्हवी या कवितासंग्रहानंतर आता शान्ताबाईंचा 'पूर्वसंध्या' हा नवा कवितासंग्रह रसिकांसमोर येत आहे. मराठी कवितेच्या पूर्वपरंपरेशी असलेले आपले नाते जपत असतानाच शान्ताबाईंनी नव्या कवितेश[...]
-
Babulmora(बाबुलमोरा)
ऐतिहासिक व सरंजामशाही वातावरणाला साजेशी खानदानी डौलदार ललितरम्य भाषाशैली, रोमँटिक प्रतिमासृ, आखीव रेखीव नाट्यपूर्ण कथानक. या वैशिष्ठ्यांनी सजलेला हा कथासंग्रह. या संग्रहातील सहा कथा ऐतिहासिक आणि दहा स[...]
-
Thought Leaders (थॉट लिडर्स )
आपण जर चाकोरी बाहेरचे काही करू पहात असाल आणि हे कितपत जमेल असे आपल्याला वाटत असेल तर हे पुस्तक आपण ओळ न् ओळ वाचलेच पाहिजे कारण ह्या पुस्तकात केवळ तात्विक/बौद्धिक दृष्ट्याच नव्हेतर असे केलेल्या एक-दोन नाहीतर तब्बल दोन व्यक्तींचे कार्यच वाचकांपुढे ठेवले आहे ते हे अश्या रीतीने की वाचनाचा कंटाळा तर येणार नाहीच पण असे काही करण्याचे मनातही नसणार्यांच्याही मनात तसे विचार पिंगा घालू लागतील. अनू आगा, रवी खन्ना, राजाभाऊ चितळे, प्रताप पवार, मनोज तिरोडकर असे हे बावीस जग कसे पुढे जात राहिले हे तर प्रत्यक्ष त्यांना भेटूनच लेखकाने जाणून घेतले आहेच न् त्यांच्यातील समान धागे शोधून त्याचेही विस्ताराने विवेचन केले आहे. या पुस्तकात जो आपवादात्मक व्यावसायिक जीवनांचा मूलस्त्रोतसंग्रह आहे तो प्रत्येक तरुणाला (आणि तरूणीलाही) मार्गदर्शकपर वारसालाच आहे.
-
Cheaper by the Dozen (चीपर बाय दी डझन)
चिपर बाय द डझन' हे फ्रँक गिलब्रेथ या गृहस्थावर त्याच्या एका मुलीने व मुलाने लिहिलेले पुस्तक. चरित्रात्मक असूनही अत्यंत मनोवेधक व मनोरंजक आहे. फ्रँक गिलब्रेथ व्यवसायाने इंजिनिअर. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामे कुशलतेने कशी करावी, यावर ते संशोधन करत व त्याचे प्रयोग आपल्या मुलांमुलींवर करत. त्यानी स्वत:ला जाणीवपूर्वक, ठरवून बारा मुले होऊ दिली. आपल्या मुलांना टंकलेखन, मॉर्सकोड, मोठमोठाल्या रकमांचे तोंडी गुणाकार, भागाकार त्यांनी स्वत:च्या पद्धतीने शिकवले. त्याचप्रमाणे फ्रेंच, जर्मन, भाषा, भूगोल, खगोलशास्त्र शिकवून प्रवीण केले होते. मुलांना जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून शिष्टाचार, रीतरिवाज, याबरोबरच मुलांच्या समित्या बनवून त्यांच्यावर वर्षभराची धान्यखरेदी, वस्त्रप्रावरणांची खरेदी, वगैरे कामे सोपवली होती. घरात कोणत्याही गोष्टीत उधळमाधळ व बेजबाबदारपणा होऊ नये म्हणून एक काटकसर समितीही होती. या समितीतली मुले घरभर हिंडून जरूर नसताना पंखे, दिवे, पाणी वाया जात नाही ना हे पहात व चूक करणार्यास दंडही करत. फ्रँक गिलब्रेथ यांच्या सर्व उपक्रमात मानसशास्त्राची पदवीधर असलेली त्यांची पत्नी लिली सहभागी असे. जागतिक पॉवर परिषद व व्यवस्थापन परिषद (आंतरराष्ट्रीय) इंग्लंड व झेकोस्लोव्हाकियात भरणार होत्या. या दोन्ही परिषदात भाषण करण्यासाठी फ्रँक गिलब्रेथ यांना आमंत्रण होते. तिकडे जायला निघालेले असताना त्यांना, स्वत:च्या गावातच टेलिफोनवरून आपल्या पत्नीला काही सुचना देत असतांना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना मृत्यू येतो. त्यानंतर घरच्या कौटुंबिक मंडळाची बैठक घेऊन लिली फ्रँक गिलब्रेथ, पतीच्या जागी आपण या दोन देशात भाषण देण्यास जाण्याचे ठरवते. तिच्या गैरहजेरीत सर्व मुले अगदी दोन वर्षाच्या मुलांपासून सर्व सांभाळण्याचे तिला आश्वासन देतात.
-
The Face of Death(द फेस ऑफ डेथ)
बालपणीचे अत्याचार आणि यंत्रनेतील भ्रष्टाचार देवदूताला सैतान बनवतात...अशा सैतानाला एका अत्याचारीत बालिकेने देवदूत बनून हरविले त्याची ही कथा...
-
Ajichya potditlya goshti (आजीच्या पोतडीतल्या गोष्ट
सुरस आणि चमत्कारिक गोष्टी ऐकायला कुणाला आवडत नाहीत! उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी दिवसा, तर कधी रात्री आजी आपल्या नातवंडांना गोष्टी सांगायला घेऊन बसते. ही नातवंडं आपल्या आजीकडे खेड्यात सुट्टी घालवायला आलेली असतात. आजीने आपल्या गोष्टींची पोतडी उघडल्यावर सगळे जण तिच्याभोवती गोळा होतात. आजीच्या पोतडीतून राजाच्या आणि भामट्यांच्या, माकडांच्या आणि उंदरांच्या, अस्वलाच्या आणि देवाच्या अशा असंख्य गोष्टी निघतात. त्यात एक अस्वल खूप वाईट खीर खाऊन चिडतं, तर कधी गोष्टीतला माणूस इतका आळशी असतो की, समोर आग लागलेली दिसत असूनसुद्धा ती विझवण्याचे कष्ट घेत नाही आणि अखेर स्वत:ची दाढी पेटल्यावर घाबरतो! कधी एका राजकन्येचं कांद्यात रूपांतर होतं, तर कधी एक राणी रेशमी वस्त्र बनवण्याच्या कलेचा शोध लावते. प्राण्यांचे आणि माणसांचे विविध नमुने या गोष्टींमधून आपल्याला भेटतात. आजीच्या या गोष्टी मनोरंजक तर आहेतच; पण त्या मुलांना खूप काही ज्ञान देऊन जातात. चला तर, या गोष्टींचा आनंद लुटू या!
-
Chi Running (ची रनिंग)
कमी श्रमात वेदनारहित धावण्याचा दृष्टीकोन...
-
Ugavatichya Dishela (उगवतीच्या दिशेला)
`EAST OF THE SUN' या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद... तीन जीवलग मैत्रिणींचा सुखाचा शोध....