-
Mruyushi Sharyat
हि कथा आहे, सर डग्लस मॉसन यांच्या अॅन्टाक्रिट खंडावरच्या साहसी मोहिमांची … त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी अनुभवलेली थरारांची… आणि मृत्यूच्या करल दाढेतून जिवलगांची जिद्धीने केलेल्या सुटकेची … हि कथा आहे. मानवी स्वभावातील कंगोरयांनची… राज्य विस्तारासाठीच्या संघर्षाची …. आणि पृथ्वीवरचे जैववैविध्य राखण्यासाठी झटनाऱ्यांची … हि कथा आहे, अथक मानवी प्रयत्नाची…ज्ञानलालसेची आणि कल्पनेपलीकडे असलेल्या निसर्गाची विलोभनीय; पण अकराळ रुपाची; त्याच्या दर्शनाची; त्याच्या साक्षात्काराची!
-
Chand Bagecha (छंद बागेचा )
बंगल्यात अंगणात किंवा दारासमोरच्या लहानशा जागेत छोटीशी बाग असेल तर छान वाटत इतकच काय, तर अगदी फ्ल्याटमधल्या ग्यालरीत खिडकांच्या ग्रिलमध्ये किंवा घरच्या एखाद्या कोपऱ्यात, जागेनुसार एखादे रोप किंवा फुलझाडं लावल्यास घराची शोभा तर वाढतेच व प्रफुल्लितही वाटत. पण मग प्रश्न पडतो की , जागेनुसार बाग तयार करायची कशी ? त्यासाठी काय तयारी करायची? आणि एकदा का बाग तयारी करायची झाली की, ती नीट कशी ठेवयाची, तिची काळजी कशी घ्यायची? वरील सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पुस्तकात मिळतील. यात बागांचे विविध प्रकार, जागेनुसर झाडांची निवड कशी करावी, बोन्साय कसे करावे, खतं-कीटनाशक कशी वापरावीत, पुष्परचनेचे विविध प्रकार कोणते इत्यादी विषयांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे निसर्गप्रेमीसाठी, तसेच जिज्ञासूसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.
-
Swapnanche Indradhanu (स्वप्नांचे इंद्रधनू )
आव्हान स्वीकारण्याचं धाडस करणा-या २५ असाधारण स्त्रियांच्या कर्तृत्वाचा आलेख म्हणजे हे पुस्तक. या स्त्रियांनी त्यांच्या कुटुंबाच आणि त्यांनी स्थापन केलेल्या उद्योगांच प्रेमानं लालनपालन केलं. हे काम त्यांनी मोठ्या प्रेमानं, हसत-खेळत आणि सहन शीलतेनं केलं. ना कधी हार मानली! या काहण्या एकच सत्य सांगत्ताहेत : स्त्रिया वेगळ्या प्रकारे विचार करतात; आणि वेगळ्या प्रकारे वागतात, परंतु त्या तेवढ्याच यशस्वी होऊ शकतात. या यशस्वी उदोयोजिकांच्या कहाण्या प्ररेक तर आहेतच. पण त्या तुमच्यात दडलेल्या उदयो जिकेलाही साद घालतात. इतकंच नव्हे, पुरुषांनाही काहीतरी करून दाखवण्याची उर्मी देतात.
-
kavita doghanchi (कविता दोघांची )
सामान्य माणसाला जीवन जगत असताना जो अनुभव प्रकष्राने येतो, तो साध्या शब्दांत ग्रथित केला आहे. कविता वाचताना रसिकाला वाटले की, 'अरेच्चा! मलाही असंच वाटत होतं, मलाही असंच म्हणाचं होतं'. हेच या कवितांचे गुण विशेष आहे, म्हणून ही 'दोघांची कविता!'
-
Tibetchya Vatevar (तिबेटच्या वाटेवर )
चिनी आणि आशियाई संस्कृतीचा अभ्यास करत असताना तिबेटमधील अंध मुलांची दारूण स्थिती सब्रिएला समाजल्यावर तिला धक्का बसतो! ती निर्णय घेते - ना कारलेल्या, धिक्कारलेल्या आणि हीन दर्जाची वागणूक मिलनाऱ्या तिबेट मधल्या अंध मुलांना मदत करण्याचा! निष्टा आणि निर्धार एवढयाच पुंजीवर ती एकहाती तिबेट भाषेत ब्रेल बाराखडी तयार करते… अगदी मोजक्या मुलांसह अंधासाठी पहेली शाळा उघडते… अर्थातच तिला यासाठी असंख्य समस्यांवर धैर्याने मात करावी लागते… आणि एका छोट्या प्रयत्ना पासून सुरु झालेल्या या प्रयोगरुपी बीजाचे सर्व वयोगटातील अंधासाठी काम करण्याऱ्या एका भव्य संस्थारुपी वटवृक्षात रुपांतर होते...
-
Mohandas (मोहनदास )
भारतीय इतिहासातील सर्वाधिक प्रभावी व्यक्ती मात्वांपैकी एक. या व्यक्तिमत्वावर आजवर विपुल लेखन, तसेच ग्रंथनिर्मिती झाली आहे. परंतु या पुस्तकात भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या आणि जगाला सदसदविवेकाचा मार्गदर्शवणाऱ्या या व्यक्ति मत्वाबद्द्लच्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रमाणिक प्रयत्न करण्यात आला आहे - गांधीचे दैनंदिन आयुष्य व जवळच्या लोकांशी नातेसंबंध कसे होते? त्यांनी इंग्रजी सत्तेशी, फूट पडलेल्या त्यांच्याच लोकांशी, त्यांच्या शत्रूशी आणि अगदी स्वतःशी कसा सामना केला? आणि हे करताना अतिप्रसिद्धी, मिथक-कथा आणि अख्खायिका यांच्या वलयामध्ये अडकलेल्या खऱ्या गांधी या पुस्तकातून जगासमोर मांडण्यचा प्रयत्न करण्यात आला आहे
-
Soniya Gandhi Ek Annanyasadharan Jeevanpravas ( सो
भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर सोनियांचा उदय कसा झाला आणि त्यांनी लक्षावधी भारतीयांची हृदये कशी जिंकली, याची ही मनोवेधक कहाणी. सोनियांची हि कहाणी गेल्या चार दशकांमधील कोणत्याही जागतिक पातळीवरील नेत्याच्या परिवर्तनाच्या प्रवासाचे प्रतिनिधित्व करणारी आहे. वैयक्तिक स्वरूपाच्या राजकीय महत्वकांक्षेपेक्षा प्राप्त परिस्थिती आणि आयुष्यात घडलेली दारूण शोकांतिका या दोन गोष्टीमुळे राजकारणाच्या मार्गावर सोनियांची वाटचाल सुरु झाली. एक परंपराप्रिय, मध्यमवर्गीय, इटालियन कुटुंबात वाढलेल्या सोनिया, केंब्रिजला येऊन इग्रंजी शिकता- शिकता राजीव गांधीच्या प्रेमात पडल्या. हे राजीव गांधी म्हणजे जवाहरलाल यांचे नातू इंदीरा गांधी यांचे सुपुत्र होते. आपल्या सासूबाई - इंदीराजी आणि पती राजीव गांधी यांच्या अमानुष हत्येनंतर सोनियांचे व्यक्ती महत्व बदलून गेले. त्या खंबीर, कणखर व ठाम विचारांनच्या बनल्या, पण त्या पूर्वीपासून अत्यंत मितभाषी होत्या आणि तशाच राहिल्या. आत्ता त्या आघाडी सरकारच्या अध्यक्ष बनल्या आणि सर्वांत मोठया लोकशाही राष्ट्राच्या जनतेच्या मनावर अधिराज्य करू लागल्या आहेत. सरकारमधील वरिष्ट पदाधिकारी ( माजी आणि आत्ताचे), सोनियाचे पक्षातील सहकारी, राजकीय विरोधक आणि त्यांच्या परिवारचे निकटवर्तीय यांच्या मुलाखती आणि संशोधनामधून राणी सिंग यांनी सोनियांवर एक नवीन प्रकाशझोत टाकला आहे. लेखिकेने समर्थ lekhanimadhun धीरोदत्त आणि आकर्षक व्यक्तीमहत्व असणा-या सोनियांच्या आयुष्याचा प्रवास वाचकांसमोर मांडला आहे. सोनियांचे संपूर्ण जीवन आणि त्याचा वारसा याचे भारताच्या दृष्टीने काय महत्व आहे, याचेही विश्लेषण केले आहे .
-
Swabhavala Aushad Ahae (स्वभावाला औषध आहे)
सध्या सभोवतालच्या सर्वच क्षेत्रांत जीवघेणी स्पर्धा चालू आहे. त्यामुळं अनेक जण चिंतेनं आणि काळजीनं ग्रासलेले आहेत.यामुळं मानसिक व्यथा आणि विकार उद्भवतातच; पण ज्यांना सायकोसोमॅटिक डिसीजीस् (Psychosomati[...]
-
Hach Maza Marg...(हाच माझा मार्ग...)
बालकलाकार ‘मास्टर सचिन’... सहजसुंदर अभिनय करणारा ‘हिरो’... जबरदस्त परफॉर्मन्स देणारा... नवोदितांना आपुलकीने मार्गदर्शन करणारा ‘महागुरू’... हिंदी चित्रपटसृष्टीत अभिमानाने ‘मराठी मुद्रा’ उमटवणारा कलावंत... आजवर आपण सचिनला अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार, नृत्यदिग्दर्शक, संकलक, निर्माता, गायक, संगीतकार अशा भूमिकांमध्ये मोठ्या, तसेच छोट्या पडद्यावर पाहिलं आहे. अशा विविध क्षेत्रांत काम करताना त्याला कोणकोणते अनुभव आले, त्याची सुवर्णमहोत्सवी कारकिर्द कशी बहरली, मुलगा-भाऊ-पती-वडील-मित्र या भूमिका त्याने कशा पार पाडल्या, त्याचं पडद्यामागचं आयुष्य कसं आहे, याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल! म्हणूनच सचिन शरद पिळगांवकर याच्या आयुष्याच्या प्रवासाची ही पटकथा...