-
Polisatil Prabhavi Netrutvachi Kala (पोलिसातील प्र
लेखकाने या पुस्तकात असे प्रतिपादित केले आहे की , समाज पोलिसांना स्वतः होऊन नेतृत्वाची भूमिका प्रदान करतो आणि अधिकार देतो . हेतू हा कि , पोलिसांनी त्या भूमिकेतून नागरिकांना अभय द्यावे आणि संकटांत सापडले त्यांना उचित मदत करावी .
-
Tirupati (तिरुपती)
जगभरातल्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजीच्या अवतार-कार्याविषयीचे हे पुस्तक. लेखकद्वयींच्या व्यासंगी, अभ्यासपूर्ण आणि सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक. देवांच्या गोष्टींमधील मानवी भावभावनांचा आविष्कार व त्यातील अद्भुतता – अतर्क्यता यांसह अभिव्यक्त होणारे पुस्तक. जनमानसातील श्रद्धा-भक्तिभावाच्या संचिताचे पावित्र्य जपत, कलात्मक उंचीद्वारे ओघवत्या शैलीत साकारलेले भारतीय सांस्कृतिक समन्वयाचा धागा जपणारे वाचनीय पुस्तक.
-
Zebunisa (झेबुन्निसा)
रुचिर गुप्ता यांच्या ‘द हिडन वन’ या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. कवयित्री व कवींच्या गुप्त मंडळाची संस्थापक आणि औरंगजेबाची कन्या, बंडखोर शहजादी झेबुन्निसा हिची ही कहाणी आहे. औरंगजेब-काळातील कटकारस्थानं, सत्ता मिळवण्यासाठीचे डावपेच, कुरघोड्या या पार्श्वभूमीवर न्याय्य भूमिका घेणाऱ्या झेबुन्निसाची कथा या पुस्तकात वाचकांसमोर येते. रोमांचक घटना आणि व्यक्तिरेखांनी परिपूर्ण अशी कादंबरी. झेबुन्निसाची ऐतिहासिक कहाणी मराठीत प्रथमच.
-
Pratekachi Najar Tumchya Pakitavar Aahe Ka (प्रत्य
वैयक्तिक अर्थव्यवस्थेवरील अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे. वाचण्यास अतिशय सोपे, शब्दकोशीय भाषा नसणारे, तरीही मनोरंजक उदाहरणांनी परिपूर्ण असे हे पुस्तक आहे. बचतीची सवय लावणे, तसेच सद्य:स्थितीतील गरजा भागवण्यापासून ते निवृत्तीपर्यंतचे नियोजन अशा अनेक विषयांचा पट उलगडणारे पुस्तक. समग्र अर्थव्यवस्थेविषयीचे सखोल ज्ञान देणारे आणि एकूणच अंतर्दृष्टी देणारे मार्गदर्शनपर पुस्तक.