-
Shulpaniche Adbhut Vishwa (शूलपाणीचे अद्भुत विश्व)
शूलपाणीच्या झाडीत | प्रवेश करण्यापूर्वी... शूलपाणी हे नर्मदेचे हृदय आहे. परिक्रमावासींची खरी कसोटी शूलपाणीच्या झाडीत लागते. पण झाडी हे नाव फार फसवे आहे. झाडी म्हणावे तर झाडी सोडाच हो, पण उन्हापासून डोक्याचे संरक्षण करायला सावलीलासुद्धा झाड नाही. येथे आहेत फक्त डोंगर. उघड्या नागड्या, वैराण व एकांत डोंगरांचा अनंत विस्तार. दुर्गम रस्ता आणि भयानक निर्जनता. नर्मदेच्या प्रदक्षिणेतील हा सर्वात कठीण भाग आहे. यातून कोणीही परिक्रमावासी लुटल्याशिवाय जाऊ शकत नाही. भिल्लांच्या भीतीने अधिकांश परिक्रमावासी झाडी सोडतात, किंवा मग थंडीत जातात. उन्हाळ्यात खडक एवढे तापलेले असतात, की त्यावरून अनवाणी चालणे अतिशय कष्टदायक असते. तहान लागते ती निराळीच. डोंगरामागून डोंगर, वळणामागून वळणे, डोंगरांच्या दाटीवाटीतून रस्ता शोधत निघालेली वेडीवाकडी अरुंद नर्मदा, ही आहे शूलपाणीची झाडी. निसर्गाने जणू नर्मदेच्या धाग्यात डोंगराचा गजरा गुंफायला घेतलेला आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन प्रांतांच्या मिलनस्थळावर पसरलेल्या नर्मदेच्या या ऐंशी मैल लांबलचक विस्तीर्ण जागेला 'शूलपाणीची झाडी' असे संबोधले जाते.
-
Sone Aani Mati (सोने आणि माती)
गीतारामायणकार, मराठीचे वाल्मीकी, पद्मश्री, कथा, चित्रकथा, नाटक, कांदबरी, आत्मचरित्रलेखक म्हणून गदिमा आपणास परिचित आहेत. मात्र जनमानसात त्यांची ओळख झाली ती गीतलेखनामुळे. अध्यात्माचा उत्कट स्पर्श असलेली गीते, भक्तिगीते, सवाल-जवाबांची ठसकेदार रचना, निर्भर शृंगाराच्या लावणीरचना, निर्व्याज भावनांनी नटलेली बालगीते, गंगाकाठी, कन्याकुमारीसारखी कथाकाव्ये आणि गीतरामायणासारखी प्रासादिक, भावसंपन्न, मराठी मनांना सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ हे विरुद्ध महाराष्ट्रातील जनतेने त्यांना मोठ्या आदराने बहाल केले. गदिमा नावाची एक प्रतिभेचे देणे घेऊन आलेली माती त्या संस्कारात लेखक, देशभक्त, कवी, कथाकार, नट असे सुरेख आकार आणि नक्षी घेत घडली. आत्मचरित्र, व्यक्तिचित्र, ललितलेख, लघुकथा, दीर्घकथा, प्रवासवर्णन, चित्रपटकथा, काव्य आदी साहित्यकृती वाचकांच्या मनाची ठाव घेणारी आहे, हे निश्चित!
-
Operation Sindoor Aani Tyanantar (ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर)
दि. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी आतंकी हल्ला करून, २६ निरपराध प्रवाशांना धर्म विचारून ठार मारले. त्या निर्घृण आतंकी हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ भारतीय सशस्त्र सेनादलांनी 'ऑपरेशन सिंदूर' ची कारवाई केली. पाकिस्तान आणि पाक- व्याप्त काश्मिरमधील नऊ आतंकी तळ नष्ट करणे; पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टिम (प्रणाली) चा नाश करणे; पंधरा भारतीय विमानतळांवर केलेल्या पाकिस्तानी हलूयांचा प्रतिरोध करून एकही पाकिस्तानी क्षेपणास्त्र अथवा ड्रोन लक्ष्यापर्यंत पोहोचवू न देणे; आणि अकरा पाकिस्तानी सैनिकी तळांचा तेथील कमांड तथा कण्ट्रोल सेंटर्स सहित नाश करणे, या सर्व घटना भारतीय सशस्त्र सेनादलांनी केवळ ८८ तासांमध्ये (दि. ६ ते १० मे २०२५) यशस्वीरीत्या घडवल्या. परिणामतः पाकिस्तानला युध्दविरामाची याचना करण्यास भाग पाडले. हे अत्यंत कठीण कार्य करून सैनिकी दृष्ट्या प्रचंड यश संपादन केले. त्यामुळे भारतीय सशस्त्र सेनादलांचे, विशेषतः भारतीय वायुसेनेचे, स्थान विश्वामधील अपराजित सेनादलांमध्ये दृढ झालेले आहे. अर्थात 'ऑपरेशन सिंदूर' च्या अतुलनीय यशाच्या मागे भारतीय राजकीय इच्छाशक्ति, सशस्त्र सेनादलांना प्रदान केलेली स्वायत्तता, आत्मनिर्भरता, सशस्त्र सेनादलांचा उत्कृष्ट समन्वय आणि पराक्रम, तसेच त्यांना असलेला डी. आर. डी. ओ., इस्त्रो, आदी संस्थांचा अप्रतिम सहयोग, अशा घटकांमुळे हे अप्रतिम यश प्राप्त झाले. त्याचे विश्लेषण येथे दिलेले आहे.
-
Harit Hindutva (हरित हिंदुत्व)
हिंदुत्वा'ची दोन मूलभूत वैशिष्ट्यं म्हणजे आध्यात्मिक जीवनदृष्टी, आणि त्यातून घडणारी संयमित उपभोगाची जीवनशैली. तसं जगणं, म्हणजेच खऱ्या अर्थानं 'धर्मपालन'; कारण, त्यातूनच पर्यावरणाची 'धारणा' सुनिश्चित होऊ शकते. पश्चिमी विचार-आचारांच्या प्रभावामुळे आपणच त्याला सोडचिट्ठी दिलेली आहे! त्यामुळे, साऱ्या जगाप्रमाणेच आपल्यालाही पर्यावरणाच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा काळात, सध्याचं भरकटलेलं हिंदुत्व नाकारत, निसर्गरक्षणासाठी उपयोगी ठरणाऱ्या मूळ हिंदुत्वाची युगानुकूल मांडणी करणारं, आणि त्याच्या आचरणाचा आग्रह धरणारं हे पुस्तक : स्वतः तसं जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अभ्यासू आणि तळमळीच्या कार्यकर्त्यानं लिहिलेलं.
-
Nadishta (नदिष्ट)
विषय चाकोरीबाहेरचा आहे .शैली पहिल्या धारेची आहे .थेट कोंडूरा किंवा बनगरवाडीची आठवण करून देणारे लिखाण आहे .'नदीष्ट ' ही मनोज बोरगावकर यांची केवळ कादंबरी नाही . तो आहे त्यांच्या प्रत्यक्षदर्शी आणि अनुभवसिद्ध घटनांचा कसदार ललित गद्य हुंकार. 'नदीष्ट ' ही मराठी कादंबरीविश्वातील अकरावी दिशा आहे.
-
99 Ganesha Chintan (९९ गणेश चिंतन)
क्रिकेटच्या खेळात, ९९ धावा काढल्यानंतर, जेव्हा एक फलंदाज त्या प्रतिष्ठित शतकाच्या उंबरठ्यावर उभा राहतो, तेव्हा तो गणेशाशी संबंधित असलेल्या क्षणाचा अनुभव घेतो . भीती आणि अनिश्चितता त्याला वेढून टाकते; त्याच्या आणि त्याच्या यशामध्ये वास्तविक आणि काल्पनिक दोन्ही प्रकारचे अडथळे असतात: गोलंदाजाचा संभाव्य फिरकी त्याला व्यापून टाकू शकतो, त्याची स्वतःची चिंता त्याला लकवा देऊ शकते, जयजयकार करणारे चाहते त्याचे लक्ष विचलित करू शकतात . तेव्हा त्याला दैवी हस्तक्षेपाची आवश्यकता असते. त्याला लक्ष केंद्रित करावे लागते, सर्व अडथळ्यांपासून मुक्त व्हावे लागते, कामगिरी करावी लागते, अंतिम धाव घ्यावी लागते आणि त्याला जे हवे आहे ते साध्य करावे लागते. दुसऱ्या शब्दांत, त्याला गणपतीचा विचार करावा लागतो. अडथळे दूर करून समृद्धी आणि शांती आणणाऱ्या त्या आराध्य हत्तीच्या डोक्याच्या हिंदू देवाच्या कथा, चिन्हे आणि विधी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हे पुस्तक ९९ ध्यान एकत्र करते . गणपती, गजानन, विनायक किंवा पिल्लयार म्हणून ओळखले जाणारे , तो आपल्या सर्वांना जीवन नावाच्या खेळात शतक झळकावण्यास मदत करू शकतो .
-
That Neight (दॅट नाइट)
काय होईल, जेव्हा एखादा साधासा खेळ एका भयंकर गुन्ह्यात बदलेल? नताशा, रिया, अंजली आणि कॅथरीन, कॉलेजमधल्या एकमेकींच्या जिवाभावाच्या मैत्रिणी. एकमेकांपासून भिन्न; तरी एकमेकांसोबत असलेल्या... निदान त्या रात्रीपर्यंत तरी... तीच ती रात्र, जी त्यांच्या आयुष्यात आली होती. जिची सुरुवात तर एका व्हिस्कीच्या बाटलीने आणि औईजाच्या खेळाने झाली होती; पण ती संपली मात्र त्यांच्याच वसतिगृहात राहणाऱ्या त्यांच्या एका नकोशा मैत्रिणीच्या मृत्यूने...सानियाच्या मृत्यूने. त्यानंतर त्या मैत्रिणींनी त्या भयंकर रात्रीची पुन्हा उभ्या आयुष्यात कधीही चर्चा न करण्याचे वचन एकमेकींना दिलं. जणू ते वचन एक करार होता, ज्याने त्यांची मैत्री आणि तो अपराध गेल्या वीस वर्षांपासून दडपून ठेवला होता. मात्र, आता कोणीतरी त्या सगळ्यांशी नवा खेळ खेळायला सुरू केले होते. जे सत्य फक्त सानियालाच माहीत होते, ते उघडकीस आणण्याची सरळ सरळ धमकीच त्यांना दिली होती. कोण होतं ते... एखादा हॅकर त्यांच्या या अपराधी मानसिकतेशी खेळत होता की सानियाचे भूत खरोखरच तिच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी परतले होते? चेहरा नसलेला शत्रू त्यांच्या खूप जवळ पोहोचला असताना, त्या रात्री खरोखर काय घडले होते ते जाणून घेण्यासाठी त्या चार मैत्रिणी पुन्हा एकदा एकत्र येतात. पण जेव्हा त्यांच्यापैकी प्रत्येक जण आपापली कथा पुन्हा सांगतं, तेव्हा त्या रात्रीचे सगळे विस्कळीत तुकडे नीट जुळत नाहीत. कारण त्यांच्यापैकी कुणीही त्या रात्रीचं संपूर्ण सत्य सांगत नसतं. 'ती रात्र' ही मैत्रीची आणि विश्वासघाताची एक गडद, प्रचंड गुंतागुंत असलेली कथा आहे, जी तुम्हाला तिच्या हरएक वळणावर संमोहित करेल आणि गोंधळात टाकेल.
-
Parkiyanchya Najaretun Chatrapati Shivaji Maharaj (परकीयांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज)
Foreign Biographies of Chhatrapati Shivaji परकीयांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज Parkiyanchya Najaretun Chhatrapati Shivaji Maharaj By Surendranath Sen छत्रपती शिवाजी महाराज असतानाच त्यांची कीर्ती युरोप पर्यंत पोचली होती. महाराजांचे ऐतिहासिक कर्तृत्व, साहसी कृत्य व चतुर युद्धनीती यांना तत्कालीन इंग्रजी, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि फ्रेंच इतिहासामध्ये उचित स्थान प्राप्त झाले होते. Cosme da Guarda, Jean de Thevenot, Barthelmy Carre, François Martin, François Valentine यांनी शिवाजी महाराजांचे लिहिलेले संक्षिप्त चरित्र तसेच डच रेकॉर्ड्स मध्ये महाराजांचे उल्लेख देखील ह्या पुस्तकात वाचायला मिळेल..
-
Hi Medha Kon (ही मेधा कोण)
जनुकीय विज्ञानात महत्त्वपूर्ण संशोधन करणारी एक नामांकित कंपनी, सदर्न जेनेटिक्सचे सर्वेसर्वा हर्ष मित्तल आपल्या संशोधनाच्या गुप्ततेसाठी विलक्षण जागरूक असतात. त्यांनी या संशोधनाच्या सुरक्षिततेची जबाबदारी 'एआय'वर कृत्रिम बुद्धिमत्तेवरसोपवली. अभेद्य वाटणारी ही सुरक्षाव्यवस्था कोणी मोडली ? हर्ष मित्तल यांच्या हत्येतून सुरू झालेली दुर्घटनांची साखळी कोणत्या दिशेने गेली ? एआय अयशस्वी ठरण्यामागे कोणाचा हात होता ? कोणी केली एआयवर मात करणारी खेळी ? मानव आणि एआय यांच्यात निर्माण होत असलेल्या गुंतागुंतीच्या नात्यातील विविध पैलूंचा वेध घेणारी 'अनपुटडाउनेबल' थरारक कादंबरी.
-
Rayari (रायरी)
एकविसाच्या शतकातील युवक नेमका कशाच्या आहारी जातोय ? महापुरूषांबद्दल तो काय विचार करतोय ? गाव पातळीवरील राजकारणात त्याचे अस्तित्व काय आहे ? महिलांवरील अत्याचार कसे पाठीशी घातले जातात ? युवाशक्तीचा वापर कोण व कसा करून घेतोय ? महापुरूषांच्या अस्मितांचा वापर स्वार्थासाठी कसा होतोय ? शेतकऱ्यांना राजा मानणाऱ्या समाजात सध्या त्याचे स्थान कुठे आहे ? सर्वसामान्य जनतेवर अन्याय का केला जातोय ? राजकारण नावाचे शस्त्र रयतेच्या संहारासाठी का संरक्षणासाठी ? रयतेला नासवायचे आणि नागवायचे पाप कुणाचे ? लोकशाहीतली खुर्ची कोण ठरवत ? खर प्रेम काय ? सामान्य जनतेने ठरवले तर काय होऊ शकतं ? काळ बदलण्याचे सामर्थ्य कुणामध्ये आहे ? खरे शिवभक्त कोण ? या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे 'रायरी' आहे.
-
Venkatesha(वेंकटेशा)
प्रेम, विरह, ओढ, माया, काळजी, सुख-दुःख, करुणा, कर्तव्य आणि वचनपूर्ती ह्या भावभावना साक्षात नारायणालाही चुकल्या नाहीत. तो देखील ह्या भावना जगतो, अनुभवतो आणि निभावतो. परंतू जेव्हा तो निभावतो तेव्हा समस्त संसारासाठी तो एक आदर्श ठेवतो. ही गोष्ट आहे अश्याच भावभावनांची, नात्यांची, प्रेमाची, प्रतिक्षेची…. वेंकटेशाची ! वाचा वेंकटेश अवताराची संपूर्ण कथा.