-
Akashvanitil Divas (आकाशवाणीतील दिवस)
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विस्ताराच्या मोठ्या जबाबदार्या त्यांच्यावर टाकल्या गेल्या. ज्या केंद्रातून गैरव्यवहाराच्या, भ्रष्टाचाराच्या तक्रारी येतील तेथे भोळे यांना पाठवले जाऊ लागले. भोळे यांनी ही कामगिरी निर्भीडपणे व नि:पक्षपातीपणे बजावली व मोठे नाव कमावले.
-
Eka Yakshache Akshaygan (एक यक्षाचे अक्षयगान)
अविनाश टिळक यांची आई कर्करोगाशी झुंज देऊन १७ सप्टेंबर १९७४ रोजी कालवश झाली. त्यांचे वडील-दादा - त्यानंतर अकरा वर्षांनी, २१ जुलै १९८५ रोजी निधन पावले. दादांनी स्वतःचा मृत्यू होईपर्यंत आपल्या स्वर्गस्थ पत्नीशी रोजच्या रोज जो लिखित पत्रसंवाद साधला त्याचे मूर्तरूप म्हणजे हे पुस्तक. दादांनी दोनशे पाणी वह्यांचे एकूण चोवीस भाग लिहिले. त्यात चार हजार पृष्ठे भरतील एवढा मजकूर आहे. माहिती, हकीगत, मुक्तचिंतन, व्याकुळता, विरहभाव, पश्चात्तापदग्धता अशा विविध विचार-भावनांनी भरलेल्या या संवादपुस्तिका म्हणजे पत्नीवियोगाने भारावलेल्या पतीचा स्मृतीयज्ञच होय; त्यात यक्षाच्या विरहगानाची आर्तता आहे...
-
Gwahi Ani Vegli Nasaleli Gosht (ग्वाही आणि वेगळी न
प्रत्येक बाईला स्वत:चं मन असतं. स्वत:च्या इच्छा असतात. स्वत:चे विचार असतात. बर्याचदा होतं असं की, स्वत:च्या मनानं, इच्छेनं, विचारानं जगू पाहणारी माणसं परिस्थितीच्या दुष्टचक्रात अडकतात. बाई पण माणूसच असते. तीही दुष्टचक्रात अडकू शकते. पण एकदा ती दुष्टचक्रात अडकली तर बाई म्हणून तिला त्यातून सुटणं मोठं मुश्किल होऊन बसतं. बाई म्हणून तिला दुष्टचक्राचे काही वेगळे भाग भोगावे लागतात. स्वत:च्या जगण्याचे चुकीचे अथवा बरोबर निर्णय घेऊन जगू पाहणा बायकांना अनुभवाव्या लागणार्या परिणामांची कथा-व्यथा व्यक्त करणार्या या दोन कादंबर्या – ‘ग्वाही’ आणि ‘वेगळी नसलेली गोष्ट’. बाई, तिचं कुटुंब आणि समाजस्थिती यांच्या गुंफणीचं विविधांगी बारकाव्यांसह चित्रण या दोन्ही कादंबर्यांमध्ये आहे.
-
Samikshecha Antaswar (समीक्षेचा अंत:स्वर)
‘समीक्षेचा अंत:स्वर’ हा प्रा. देवानंद सोनटक्के यांचा ‘सामर्थ्याचा स्वर’ या ग्रंथानंतरचा दुसरा समीक्षाग्रंथ. ग्रंथात एकूण १७ लेख असून ते पूर्वी विविध चर्चासत्र आणि नियतकालिके यांतून प्रसिध्द झाले आहेत. या ग्रंथात साहित्यविचार आणि उपयोजित समीक्षा अशा दोन प्रकारांचे लेख आहेत. कुसुमावती देशपांडे, बा. सी. मर्ढेकर, भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याविचारांची, वसंत आबाजी डहाके यांच्या समीक्षेच्या सांस्कृतिक दृष्टीची चर्चा करणारे तात्विक लेख आहेत तर मर्ढेकर, करंदीकर, अरुण कोलटकर,श्रीधर शनवारे, ग्रेस अरुण काळे, दीपक रंगारी यांच्या कविता आणि श्याम मनोहर (शीतयुद्ध सदानंद), ह. मो. मराठे (काळेशार पाणी) आसाराम लोमटे (इडा पीडा टळो) यांच्या साहित्यकृतींची आस्वादक समीक्षा केली आहे.
-
Dhyas Ani Pravas (ध्यास आणि प्रवास)
सुलभा वर्दे १९६२ साली मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये मेडिकल सोशल वर्कर म्हणून रुजू झाल्या. विविध प्रकारच्या रुग्णांची काळजी वाहताना तिथल्या अतिविकलांग रुग्णांची दारुण अवस्था त्यांच्या मनाचा ठाव घेत होती. जगण्याची आस हरवलेल्या या रुग्णांमध्ये आत्मनिर्भरतेतून आत्मविश्वासाची ऊर्जा निर्माण करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्यातूनच सुरु झाला पॅराप्लेजिक फौंडेशनचा प्रवास.