-
Swabhavala Aushad Ahae (स्वभावाला औषध आहे)
सध्या सभोवतालच्या सर्वच क्षेत्रांत जीवघेणी स्पर्धा चालू आहे. त्यामुळं अनेक जण चिंतेनं आणि काळजीनं ग्रासलेले आहेत.यामुळं मानसिक व्यथा आणि विकार उद्भवतातच; पण ज्यांना सायकोसोमॅटिक डिसीजीस् (Psychosomati[...]
-
Hach Maza Marg...(हाच माझा मार्ग...)
बालकलाकार ‘मास्टर सचिन’... सहजसुंदर अभिनय करणारा ‘हिरो’... जबरदस्त परफॉर्मन्स देणारा... नवोदितांना आपुलकीने मार्गदर्शन करणारा ‘महागुरू’... हिंदी चित्रपटसृष्टीत अभिमानाने ‘मराठी मुद्रा’ उमटवणारा कलावंत... आजवर आपण सचिनला अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार, नृत्यदिग्दर्शक, संकलक, निर्माता, गायक, संगीतकार अशा भूमिकांमध्ये मोठ्या, तसेच छोट्या पडद्यावर पाहिलं आहे. अशा विविध क्षेत्रांत काम करताना त्याला कोणकोणते अनुभव आले, त्याची सुवर्णमहोत्सवी कारकिर्द कशी बहरली, मुलगा-भाऊ-पती-वडील-मित्र या भूमिका त्याने कशा पार पाडल्या, त्याचं पडद्यामागचं आयुष्य कसं आहे, याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल! म्हणूनच सचिन शरद पिळगांवकर याच्या आयुष्याच्या प्रवासाची ही पटकथा...
-
Smart Mull (स्मार्ट मूल )
डॉ. सुनील गोडबोले, डॉ. अश्विनी गोडबोले यांनी लिहिलेलं "स्मार्ट मूल' हे पुस्तक आजच्या काळाशी अतिशय सुसंगत आहे. मुलांमध्ये किमान आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता लपलेल्या असतात. त्या शोधणं हे पालकांचं आणि शिक[...]
-
Kuthe Na Kuthe (कुठे ना कुठे)
'कुठे ना कुठे' नित्यनूतन अनुभवांनी भरलेलं हे जीवन प्रवाही असतं. ते एका ठिकाणी न थांबता वळणावळणाने पुढे, पुढे जात असतं. अशाच ब-याचशा वळणांवर भेटलेले जाणवलेले आणि भावलेले हे माझ स्मरणबंध खचितच तुम्हालाही, आयुष्यातील वाटांवर घेऊन जातील. आपण सदर पुस्तकात निश्चत भावेल, असा विश्वास वाटतो.
-
Thembatl Abhal (थेंबातलं आभाळ)
आजच्या सुखवस्तू जगात, वस्तू सुखी आहेत, आणि माणसं मात्र दु:खी; नेमकं काय चुकतंय? आंनदी असणं आणि आनंदाचा मेकअप यातला फरक माणसं विसरली आहेत का? अविरत परिश्रमाने, आई- बाबांनी जे आयुष्य उभ केलं, त्याची किंमत रेडीमेड चंगळवादी युगातल्या मुलांना केव्हा कळणार आहे? सुखामागे धावता धावता दमून गेलेली आजची घरं कधीतरी अंतर्मुख होणार आहेत की नाही ? संवेदनांना साद घालणारा एक तरल अनुभव - 'थेंबातल आभाळ !"
-
Ekantacha Doh (एकांताचा डोह)
कोलाहातून कधीतरी दूरच्या आतल्या गावात जावसं वाटतं ना ? शहरी गजबजाटातून मनातल्यालाल कौलारु घरात नारळी पोफळीच्या बागेत बिलगणा-या गारव्यात कधीतरी सर्वांच्या नकळत गुणगुणावसं वाटतं न द्या टाळी! अशाच मनाच्या गार सावलतीच असतो तो एकांताचा डोह! तिथे कविता, गाणं, नृत्य, चित्र इतकंच काय ह्या एकांत डोहाकाठीच आपण आपल्याला नव्याने सुचत जातो.
-
Jivhalyachae Aarse (जिव्हाळयाचे आरसे)
ज्यांच्यावर अगदी मनापासून प्रेम करावं अशी काही माणसं आयुष्यात येतात, म्हणून तर व्यवहाराच्या डांबरी सडकवाटेला हिरवंगार वळण फुटतं. उन्हाचे रुक्ष क्षणही ही मनं आल्हाददायी करतात. जगण्याला एक सुरेल प्रयोजन देतात. ह्या अनामिक नात्याला खरंच कुठलंही नाव नसतं. नाव नसतं तर म्हणून तर ती चिरंतन सोबतही देतात. हि मनं कधी तुमच्या कचेरीत, कधी वर्गात, कधी अंगणात, कधी घरात अगदी कुठेही भेटतात… कुणाच्याही नकळत ह्या पारदर्शी क्षणांमध्ये आपलं रूप पाहणं हा वेगळाच विरंगुळा होतो… म्हणून हे एकमेकांचे जिव्हाळाचे आरसे !