-
Sukhad Balsangopan (सुखद बालसंगोपन)
बाललीलांतून बाळाचे मनोगत जाणून घ्या. बाळाची भाषा समजून घेऊन शिका. बाळाचे संगोपन सुखद करा. बाळासाठी आणि तुमच्यासाठीही!
-
Karvalo (कर्वालो)
सह्याद्रीच्या दक्षिण टोकाकडील निबिड अरण्यात चाललेल्या अद्भुतरम्य शोधयात्रेची रोमहर्षक कथा ! उडता सरडा ! एक दुर्मिळ प्राणी ! निसर्गाच्या कोट्यावधी वर्षांच्या वाटचालीत घडलेला एक 'अपघात' ! या उडत्या सरड्याच्या शोधयात्रेतील विविध स्तरावरचे यात्री ! गावंढळ मंदण्णा, इरसाल यंग्टा, चलाख 'किवी' कुत्रा पासून ते महान शास्त्रज्ञ कर्वालो ! निसर्गरम्य पाश्र्वभूमीवरील सशक्त, जिवंत, रसरशीत, नर्मविनोदी लेखन शैलीतून साकारलेली... कर्नाटकातील वेगळाच निसर्ग सामोरा आणणारी, पर्यावरणवादी, वैशिष्ट्यपूर्ण, बहुचर्चित कलाकृती !
-
Lajja (लज्जा)
लज्जा’ ही तसलिमा नासरिन यांची वास्तवावर आधारलेली कादंबरी. बांगलादेशातील मुसलमानांनी हिंदूंचा केलेला छळ आणि बांगलादेशावर प्रेम करणार्या हिंदूंची केलेली कोंडी असा या कादंबरीचा विषय आहे. कडव्या मुसलमानांनी लेखिकेची हत्या करण्याचा फतवा काढला. तिच्या बंडखोर वृत्तीचे यथार्थ दर्शन या कादंबरीत घडले आहे. बांगलादेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रप्रेमाने लढलेले सुधामयबाबू, त्यांचा मुलगा सुरंजन, त्यांची कन्या माया (निलोचना), त्यांची पत्नी किरणमयी अशा चारजणांच्या कुटुंबावर कोसळलेल्या संकटाची ही कथा आहे. धर्म आणि देश या गोष्टींमधून काय पसंत करायचे असा मूलभूत प्रश्न उपस्थित करून या कादंबरीने तत्त्वज्ञानालाच हात घातला आहे. मूलतत्त्ववादी आपल्या कुटुंबाचा छळ करतात तरीही देशप्रेमाने, आदर्शवादाने भारावलेले हे कुटुंब जातीय सलोखा व्हावा म्हणून प्रयत्न करते. पण परिस्थिती विकोपाला गेली, हिंदूंची मानखंडना पाहिली आणि अखेर बांगलादेश सोडून भारतात येण्याचा निर्णय घ्यावा लागला. हा प्रकार लज्जास्पद होता.
-
Fera (फेरा)
या अखंड देशातच कल्याणीचा जन्म झाला होता. भारतानं ब्रिटिशांना हाकललं, पण स्वत:चे तुकडे करून हाकललं... ह्या देशातून उर्दू बोलणार्या मुसलमानांना हाकलताना हिंदूंना सर्व गाशा गुडाळून स्वत:च्याच देशातून बाहेर का जावं लागलं ? मुसलमानांची मायभूमी न हाता, हा देश तर शेवटपर्यंत बंगाल्यांचाच राहिला. तीस लाख बंगाल्यांनी स्वत:च्या रक्तातून हा देश उभा केलाय. ज्यांनी भारताचे तुकड केले आणि या देशाला मुसलमानांची मायभूमी केली, ज्यांच्या दुपणामुळं या देशातील लोकांना आपला देश सोडावा लागला, त्यांना एकाहत्तरच्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात चांगलीच चपराक बसली. हा देश बंगाल्यांचा आहे, मुसमानांचा नाही; इथं भाषा महात्ताची आहे, धर्म नाही; हेच या युद्धानं सिद्ध केलं. कल्याणीला वाटलं, रिक्षा थांबवून खाली उतारावं, सर्व अंगावर माती माखावी. ह्या मातीचं प्रेम तिला दुसर्या कुठल्याच मातीत आपलं म्हणू देत नव्हतं. माणूस एकाच मातीवर प्रेम करू शकतो, तर! कल्याणी आज तिच्या जन्मगावच्या मातीचा वास घ्यायला आली होती. ह्या मातीतूनच तिचा जन्म झाला होता- कोणा स्त्रीच्या गर्भातून नाही, तर ह्या मातीतून....