-
kunachya khandyavar ( कुणाच्या खांद्यावर ... )
सामाजिक कार्याचा अनुभव, त्याचा अर्थ लावणारी भेदक, शास्त्रपूत मर्मदृष्टी आणि ललित लेखकाची कल्पनाशक्ती यांचा मेळ क्वचितच होतो. त्याला संवेदना भावनाशीलता, मानवी करूना अशा लेखकाला आत्यावश्यक अशा कृतींची जोड विरळा. प्रवीण पाटकरांच्या लेखनात मला हे सर्व गुण जाणवतात आणि मला ते आवडते. - श्री. पु. भागवत
-
Grahakraaja Jaga Ho! ( ग्राहकराजा जागा हो! )
तुटपुंज्या पैशातून वस्तू किंवा सेवा खरेदी करणा-यांपासून ते मोठ्या रकमेतून खरेदी करणा-यांपर्यंत सगळेजण ग्राहक असतात. पण त्यातले किती ग्राहक जागरूक आणि संघटीत असतात? आपल्या हक्कांबाबत, जबाबदारीबाबत ते संघटित झाले पाहिजेत. त्याचप्रमाणे ग्राहकांची सुरक्षितता, निवडीचे हक्क, माहिती व तक्रार निवारण, प्रतिनिधित्व, ग्राहक, शिक्षण, मुलभूत गरजा या बाबतची त्याची मानसिकता प्रगल्भ व्हावी, यासाठी या पुस्तकातून समर्पक माहिती तर मिळेल.
-
Astitvache Dhage ( अस्तित्वाचे धागे )
प्रत्येकाचं आयुष्य ही एक विशिष्ट अर्थाने कादंबरीच असते. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबाचा जसा एक घटक असते, तसाच समाजाचाही. 'पिंडे पिंडे मतीर्भिन्न;' या उक्ती प्रमाणे प्रत्येकजण आयुष्याचा लेखाजोखा आपल्या कुवतीनुसार मांडतो. वेगवेगळ्या संदर्भानुसार आयुष्यात भेटलेल्या व्यक्तींचा, अन्य घटितांचा, श्रेयस आणि प्रेयस अन्वयार्थ जगण्याशी जोडतो. सुखदु:खाचे अनेक सूक्ष्म धागे आयुष्यात वेढलेले असतात. अस्तित्वाचे हे धागे, आपल्या विशिष्ट शैलित गुंफून, कविमनाच्या प्रकाश खरात यांनी या पुस्तकात मांडले आहेत.वाचकांनाही ते नि:संशय गुंतवतील.
-
Nari kayada ( नारी कायदा )
पुरुषांच्या आधाराने शिकणारी, त्यांच्याच प्रेरणेने लिहिणारी, त्यांच्या सहाय्यानं लढणारी पूर्वार्धातील स्त्री; आज स्वत:च्या बळावर सा-या गोष्टी करताना दिसते आहे, तरीही एकूण समाजाचा तिच्याबद्दलचा दृष्टीकोन बदललेला नाही. तिच्यावर अनेक प्रकारे अन्याय होतच आहेत. त्यापासून तिने स्वत:चा बचाव मोठ्या हिमतीने कसा करावा हे कळण्यासाठी आणि तिला आपले मूलभूत स्वातंत्र्य वं अधिकार कळावेत, या दृष्टीने 'नारीकायदा' हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल.
-
Vikaranurup Poushtik Pakkruti ( विकारानुरूप पौष्टि
आपली जीवनशैली, आहार आणि आरोग्य यांचा थेट संबंध असतो का ? तर नक्कीच असतो. त्यामुळे योग्य आहार जसा आरोग्य चांगलं राहायला मदत करतो तसाच चुकीचा आहार अनारोग्याला कारणीभूत ठरतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काही विकारांच्या मुळाशी इतरांच्या तुलनेने काही विशिष्ट पोषक द्रव्यांच्या खूप मोठ्या गरजा असतात. त्या पु-या केल्या गेल्या तर ते विकार टाळता येतात किंवा नियंत्रणात ठेवता येतात; आपला योग्य संतुलित आहार व त्यातील रासायनिक घटक शरीरातील जीन्सच्या कार्यवाहीवर परिणाम करतात. हे एका नवीन संशोधनाद्वारेही सिद्ध झाल्याने, या पुस्तकाची उपयुक्तता अधिक आहे.
-
Kaifi Anee Me (कैफी आणि मी )
'कैफी आणि मी' ही , प्रख्यात नाट्य व चित्रपट अभिनेत्री शौकत आझमी यांची आत्मकथा आहे. अमेरिकेतल्या चौदा विद्यापीठांनी, द. आशियाई विभागांसाठी संदर्भग्रंथ म्हणून नेमलं जाण्याच अनमोल भाग्य या ग्रंथाला लाभल आहे. त्याचं कारण असं आहे, की ही एक अशी कथा आहे; जी व्यक्तीगततेच्या मर्यादा ओलांडून त्या काळातलं सामाजिक - राजकीय वातावरण अचूक कवेत घेते आणि ते ही एका स्त्रीच्या भूमिकेतून! 'कैफी आणि मी' ही शृंगार काव्य, अतिशय बिकट परिस्थितीतही दिसलेल असामान्य धैर्य या सर्वानी परिपूर्ण अशी अदभूत प्रेमकथा आहे;जी तरुण पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहील! त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ही कथा एका स्वतंत्र व्यक्तिमत्व लाभलेल्या स्त्रीची व अभिनेत्रीची कहाणी आहे.
-
Venaa (वेणा)
"स्त्रीचे जगणे, मनाने आणि शरीरानेही, आणि लाक्षणिक अर्थाने तिचे मरणेही, किती क्लेशदायक पद्धतीने चालू असते याचे अस्वस्थ करून टाकणारे आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे दर्शन या कवितांतून घडते. मुलगी वयात येते तेथपासूनचे स्त्रीच्या दु:खी आयुष्याचे एकेक पान आपणांस येथे उलगडताना दिसते..." " ..स्त्रीची विविध रूपे डोळ्यांसमोर येतात. ती सारी एक होऊन त्यांतून एकच स्त्री दिसू लागते. ती संवेदनशील आहे, तिच्या डोळ्यांपुढे आयुष्याची सुंदर स्वप्ने आहेत, तिला तिची अस्मिता आहे, आत्मप्रतिष्ठेची जाणीव आहे , त्या तिच्या स्वप्नांचा चुराडा होतो, ती होरपळते, आकांत करते, दु:खातून प्रवास करते, कोसळते...'स्वतःला चपखल बसवावे असे एकही नाही सापडले नाव, इतिहासाच्या पानावर' असा स्वतःसंबंधी विचार करून निष्कर्ष काढते, पण पुन्हा उभी राहते, बेदरकार बनून झुंजते-सुख प्राप्त झाले असता त्यात मन:पूर्वक रमते. या आयुष्याचा, भोवतालच्या जीवनाचा विचारही करते. आयुष्यातल्या सर्व अनुभवांना काव्यरूप ध्यावे असे तिला वाटते आणि ते ती देते, हे महत्वाचे आहे. म्हणूनच तिच्या वेदना या नुसत्या वेदना न राहता त्या 'वेदनांची मिरवणूक' तयार होते. आजी, आईपासून चालत आलेल्या वारशाला येथे एक नवे वळण प्राप्त होताना दिसत आहे. व्यवहार आणि काव्य या दोन्ही दृष्टींनी हे वळण सुखद वाटते."
-
Bhavnik Aapulakine Karyasanskruti Ghadwu ya! ( भाव
आजच्या धावपळीच्या काळात सर्वं प्रकारच्या लहानमोठ्या संस्थात ,आपली कार्यसंस्कृती भावनिक आपुलकीतून कशी समृद्ध करता येईल, याचे भान देणारे हे पुस्तक
-
Choti Si Baat ( छोटी सी बात )
पालकांना मित्रत्वाच्या नात्याने सुयोग्य सल्ला देणारं व मुलांचे लाडके मित्र असणा-या राजीव तांबे याचं पुस्तक.
-
Sarjanavish ( सर्जनाविष्कार )
सर्जन म्हणजे नवनिर्मिती! सर्जन आणि सादरीकरण यांचा अनोन्यसंबंध असतो. एका मर्यादित अर्थाने प्रत्येक व्यक्तीकडे सर्जनशक्ती असते. त्याला सादरीकरणाची कलाही अवगत असते. मात्र प्रतिभेचा दैवी स्पर्श झाल्याखेरीज ख-या अर्थाने 'नवसर्जन' होत नाही. सर्जन म्हणजे जर प्रतिभेची नवनिर्मितीअसेल तर सादरीकरण म्हणजे उच्च गुणात्मक आणि कलात्मक मूल्य यांचं यथार्थ प्रकटीकरण! या दोन्ही बाबींचा थोडक्यात परामर्श घेतलेले हे पुस्तक म्हणजेच सर्जनाविष्कार!
-
Manatal... Manapasun ( मनातलं ... मनापासून )
जीवनातील वाटा - वळणांवर पावलं टाकताना, प्रत्येकाच्या वाटयाला, कळत-नकळत नकोसा वाटणारा प्रवासही येतो. त्याला ब-याचवेळा आपणच जबाबदार असतो. हे न कळल्यामुळे त्यातून निर्माण होणा-या मानसिक संघर्षात, बुद्धी आणि भावना यांचा समतोल बिघडतो. आणि संभ्रम उत्पन्न होतो. अशा वेळी आपल्याला गरज असते ती, 'मनातलं, मनापासून' समजून घेणा-याची! ती गरज हे पुस्तक पूर्ण तर करीलच, शिवाय 'मनातलं सांगा आणि मनापासून जगा', हेही जाणवून देईल!
-
Chandrat ( चांदरात)
चित्रपटांविषयी सबकुछ म्हणजे 'बाबू मोशाय' हे समीकरण रसिकांच्या मनात कायम ठसलेलं आहे. कारण चित्रपटांचा इतिहास, कलाकार, तंत्रज्ञ,वितरक,अशा, चित्रपटांशी संबंधित अनेकानेक घटकांकडे पाहण्याची त्यांची मार्मिक आणि रसज्ञ वृत्ती! या सर्वांविषयी लिहिताना ते अभ्यासपूर्ण तर लिहितातच;शिवाय वाचकांना उत्तम रसास्वाद कसा घेता येईल याकडेही कटाक्षाने पाहतात. 'चांदरात' या बाबू मोशाय यांच्या लालीतरम्य शैलीतील पुस्तकाला, त्यातल्या अनमोल अशा खानिज्याला म्हणूनच संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे. त्यांच्या भाषेची ताकद वाचकांना बांधून तर ठेवतेच, शिवाय त्यांच्या वाचनश्रीमंतीत भरही घालते.
-
Shirkamal Amar Jahle (शिरकमल अमर जाहले)
स्वातंत्र्य सेनानी बापू गोखलेंच्या जीवनावरील कादंबरी.