-
Hi Rajbhasha Ase! (ही राजभाषा असे)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवडक भाषणांचा हा संग्रह. थेट रोखठोक, धारधार भाष हे त्यांचं वैशिष्ट्य. त्यांचे विचार उत्स्फूर्त आहेत आणि ते मांडण्याची प्रभावी हातोटी त्यांच्याकडे आहे. पक्षस्थापनेनंतर त्यांनी पहिली सभा शिवतीर्थावर घेतली २००६मधील ते पहिले भाषण अर्थात पुस्तकाच्या प्रारंभीच वाचायला मिळते. याच वर्षी महाराष्ट्राने शरमेने मान खाली घालावी, अशी घटना खैरलांजी येथे घडली. या घटनेच्या निषेधार्थ राज ठाकरे यांनी अत्यंत परखड विचार मांडणारी सभा घेतली. कोकण महोत्सवानिमित्त २००८ मध्ये त्यांनी मुंबईत भाषण केले होते. राज ठाकरे यांना रत्नागिरीत अटक करण्यात आली होती. या अटक आणि सुटकेनंतर त्यांनी ठाणे येथे सभा घेतली. आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ त्यांनी घेतलेल्या सभेतील भाषणाचा सामावेशही पुस्तकात करण्यात आला आहे.
-
Tuziya Jateecha Milo Aamha Koni ( तुझिया जातीचा। म
पु. ल. देशपांडे यांच्यासंबंधी लिहून आलेल्या लेखांचे संकलन यामध्ये आहे. पु. ल. देशपांडे हे किती मोठे व्यक्तिमत्त्व होते हे कळण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांची आस्वादक आणि अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना आहे. पुलं'बरोबरच्या अनेक आठवणी यामध्ये त्यांनी सांगितल्या आहेत. या लेखांचे संकलन भाऊ मराठे व अप्पा परचुरे यांनी केले आहे. अरुण फडके यांचं संहितासंपादन आहे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, कुसुमाग्रज, बाळासाहेब ठाकरे, मोहन वाघ, भक्ती बर्वे-इनामदार आदी अनेक मान्यवरांनी लिहिलेले लेख या ग्रंथात आहेत. अनेकांनी वेगवेगळ्या कारणांनी हे लेख लिहिले आहेत. एकत्रितपणे हे लेख वाचताना खूप मजा येते. "पुलं'च्या चाहत्यांसाठी तर हे पुस्तक पर्वणी ठरावे इतके चांगले आहे.