-
Mala kahi Sangaychae ! (मला काही सांगायचंय!)
डॉ. संजय ओक यांचे हे अडतिसावे पुस्तक. वेगवेगळ्या अशा चोवीस विषयांवर डॉक्टरांनी आपली मते व्यक्त केली आहेत. "अनेक वर्षे हे विषय मनात घोळत होते; पण प्रत्यक्ष लिहायला बसल्यावर एका आठवड्यात हे लेखन झाले,' असे डॉक्टरांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे. वेगळ्या आकारातील हे छोटेखानी पुस्तक विचार करायला भाग पाडते. माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे. या पुस्तकातून मिळणारे सर्व उत्पन्न रा. ए. स्मारक रुग्णालयाच्या गरीब रुग्ण सहायता निधीस दिले जाणार आहे.
-
Mirasdari (मिरासदारी )
मराठीतले प्रसिद्ध विनोदी लेखक द.मा. मिरासदार यांच्या खास विनोदी शैलीतल्या निवडक कथांचा अत्यंत सुरस संग्रह म्हणजे मिरासदारी हे पुस्तक. गेल्या काही वर्षांत मराठी ग्रामीण कथेच्या उदयाबरोबर ग्रामीण वातावरणाशी संलग्न असणारी हास्यजनक कथा जन्माला आली. तिच्यात वृत्तीची विविधता आहे, केवळ एकसुरीपणा नाही. मिरासदारांच्या या कथांतून एक अनोखी मिश्किलपणाची, चमत्कृतीपूर्ण वळणांची व गमतीदार विक्षिप्तपणाची झाक वाचकाला अतिशय भावेल.