-
Shiv Chatrapatinche Armar (शिवछत्रपतींचे आरमार )
शिवाजी महाराजांना शुन्यातून आपले आरमार निर्माण करायचे होते. सर्व उद्योग मुघलांना व आदिलशाहीला तोंड देत असताना जमिनीवरील युद्धाच्या सर्व गरजा भागवून करायचा होत. या सर्व अडचणींमधून मार्ग काढून शिवाजी महाराजांनी आपले आरमार निर्माण केले. आपल्या 'हलक्या व क्षुद्र' (इंग्रजांचे शब्द) नावांचाच वापर करून समुद्राचा अजिबात अनुभव नसलेल्या या माणसांनीच खांदेरीच्या मोहिमेत इंग्रजांसारख्या कुशल दर्यावर्दी लोकांच्या विरोधाला न जुमानता खांदेरीच्या किल्ल्याचे काम तडीस नेले.
-
Chandramukhi (चंद्रमुखी )
दौलतराव - एक ध्येयधुरंधर राजकारणी. आपला ’संसार’ सांभाळत लोककलेची कदर करणारा रसिक. ती - चंद्रमुखी! नावाप्रमाणेच देखणी. तमाशातली शुक्राची चांदणी. नृत्यकौशल्य, सौंदर्याबरोबरच ’बाई’पणाचा शाप घेऊन आलेली कलावंतीण. मग ’लाल दिवा’ आणि ’घुंघरा’च्या गुंतावळीतून निर्माण झाली ही रशिली कहाणी.
-
Nagnasatya ( नग्नसत्य )
स्त्री शरीरावरील अतिशय घृणास्पद व टोकाच्या अत्याचाराचा 'बलात्कार' हा एकच पैलू मी उचलला होता, त्यामुळे कथांमध्ये तोचतोचपणा तर येणार नाही याची मला सतत धास्ती होती. त्यासाठीही काळाचे संदर्भ, बदलतं समाज जीवन व त्यातही ठाण मांडून बसलेला अत्याचाराचा भाग याची गुंफण करणं शक्य झालं. ज्या सामाजिक संबंधांच्या मुशीत बलात्कार घडताहेत, त्या सामाजिक संबंधांचा संदर्भ घेतल्याशिवाय बलात्काराचं धगधगतं वास्तव आपल्याला उलगडणार नाही, हे नक्की. म्हणूनच एका व्यापक सामाजिक संदर्भात हा प्रश्न मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. - मुक्ता मनोहर