-
Majhi Khadyabhramanti (माझी खाद्यभ्रमंती)
जगाचा पाठीवर सर्व देश भिन्न-भिन्न संस्कृतीने नटलेले आहेत. हि संस्कृती म्हणजे त्या देशाचा इतिहास,कला,भाषा,पाकशैली अशा अनेक दृश-अदृश गोष्टीचे मिश्रण असते. प्रत्येक देशाच्या संस्कृतीचा एक भाग म्हणजे तिथली खाद्यसंस्कृती; जी त्या देशाचे भौगोलिक स्थान, हवामान,त्या देशातील परंपरा, लोकांची जीवनशैली असा विविध गोष्टीवरून तयार झालेली असते. सकाळचा न्हारीपासून ते रात्रीचा जेवणापर्यंत कोणते पदार्थ खायचे ते प्रत्येक देशात साधारणपणे ठरलेले असते. सणासुदीचे पदार्थ वेगळे तर निरनिराळा ऋतूततले प्रदार्थ वेगळे ते कसे करयाचे, कसे खायचे, केव्हा खायचे ह्याचेदेखील काही संकेत असतात. आपण जर त्या देशाचा खाद्यसंस्कृतीकडे लक्ष देवून बघितलं तर; आपल्याला त्यातील अनेक नवनवीन पैलू व खास गोष्टी समजतात. ज्या देशात जायचा त्या देशातील खाद्यसंस्कृती डोकावून पाह्यला, तिचे निरीक्षण करयाला, त्यामागचे लोकजीवन समजावून घ्यायला. तिथले नवनवीन पदार्थ बनवायला लेखिकेला मनापासून आवडत; म्हणूनच लेखिकेने केलेले पन्नासाहून अधिक देशाचे प्रवास हे नुसती भ्रमती न राहता खाद्यभ्रमंती होऊन जातात...