-
Muktai (मुक्ताई )
उत्कृष्ट लेखन आणि वाचकांना वाचनात बेधुंद करणारे लेखन हीच मंदाताईंची खासियत, मुक्ताई बद्धल ताई जे बोलल्या त्यातील हे चार शब्द... मुक्ताई लिहिताना मी त्यात इतकी रंगून गेले होते कि वाटायचं, मी या चार [...]
-
Superstar Rajesh Khanna (सुपरस्टार राजेश खन्ना)
काकाने दत्तक घेतल्यानंतर तो मुंबईत आला व शाळेत जाऊ लागला. महाविद्यालयात स्नेहसंमेलन त्याने गाजविले. त्यातून तो चित्रपटाकडे वळला आणि मग इतिहास घडला. तो चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार बनला. तो म्हणजे राजेश खन्ना. राजेश खन्नाने संपूर्ण चित्रपटसृष्टी व्यापून टाकली. त्याने चित्रपटात रंगविलेला प्रेमवीर अनेकींच्या स्वप्नातील राजकुमार ठरला. 'दो रास्ते ', 'आराधना', 'हाथी मेरे साथी', 'बावर्ची ', 'सफर ', 'खामोशी'मधून त्याने वेगवेगळ्या भूमिका केल्या. त्या लोकांना आवडल्या. त्याच्या चित्रपटांची कथा, संगीत, गाणी हे सर्वच अप्रतिम होते. किशोरकुमार, राजेश खन्ना व राहुल देव बर्मन हे त्रिकुट जमले होते. तो यशाच्या शिखरावर असताना अमिताभ बच्चन याचा शिरकाव चित्रपटसृष्टीत झाला आणि नंतर राजेश खन्नाचा करिष्मा कमी होऊ लागला. तो का झाला, त्याचे वागणे - बोलणे, त्याच्या नायिका, त्याचे पत्रकारांशी संबंध, इतर सहकलाकारांचे त्याच्याविषयीचे विचार, अन्य क्षेत्रांतील महनीय व्यक्तींच्या प्रतिक्रिया, हे सर्व संजीव पाध्ये यांच्या 'एकमेव सुपरस्टार'मधून वाचायला मिळते. डिंपल व त्याचा विवाह, नंतरचे सहजीवन व दुरावा, त्याच्या 'आशीर्वाद ' बंगल्याची कहाणी यात आहे.
-
Rukhamani Dawarket Aali ( रुख्मिणी द्वारकेत आली)
सीतेच्या आठवणीतून रामायण ‘स्मृतिगंध’ (आवृत्ती संपली), द्रौपदीची कहाणी ‘अग्निपुष्प’ यानंतर ‘डोंबिवलीच्या बहिणाबाई’ मंदा खापरे यांची आणखी एक अतिशय वाचनीय पौराणिक कादंबरी!